प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना कृषिदुतांनी दिले मैदानी खेळांचे धडे
फलटण : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत येथील श्रीमंत शिवाजीराजे उद्यान विद्या महाविद्यालयातील कृषिदुतांनी मलवडी ता. फलटण येथे ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे मैदानी खेळ व स्पर्धांचे प्रात्यक्षिकांसह धडे दिले.
'ग्रामीण कार्यानुभव' या कार्यक्रमांतर्गत कृषिदुत हे ग्रामीण भागात विविध उपक्रम राबवित आहेत. याचाच एक भाग म्हणून धावणे, लंगडी, खो-खो यासह इतर मैदानी खेळाचे महत्त्व व त्याची गरज शालेय विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी प्रात्यक्षिकांद्वारे विविध खेळाचे धडे देऊन ग्रामीण भागाचे आरोग्य, पाणी, आणि खेळ यासह शेती विषयक महत्वपूर्ण माहिती देणारे विविध उपक्रम राबवित आहेत. सदर उपक्रमाला स्थानिक ग्रामस्थ, विद्यार्थी, स्थानिक स्वराज्य संस्थाचे पदाधिकारी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत.

'ग्रामीण कार्यानुभव' कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषिदुत गौरव कापसे, दिग्विजय गायकवाड, क्षितीज काकडे, दिग्विजय गोडसे, मयूर जगताप, अर्जुन मांजरे, शुभम कुंभार आदी मेहनत घेत आहेत.
Sponsored
संबंधित बातम्या
वखार महामंडळाच्या सुविधांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा
चालू रब्बी हंगामातील शेतमाल विकण्याची घाई शेतकरीवर्गाने करू नये. उत्पादित शेतमाल वाळवून व स्वच्छ करून वखार महामंडळाच्या गोदामात आणून ठेवावा. बाजारातील शेतमालाचे भाव वाढल्यानंतर शासकीय...
पर्यावरण संवर्धनासाठी 'एक कुटुंब-एक झाड' मोहीम
एकता दर्शन, सातारा : पर्यावरण संवर्धनामध्ये पुरवठा विभागाचा महत्वपूर्ण सहभाग असावा या उद्देशाने सन २०२३ मध्ये पुणे विभागातील पुरवठा विभागामार्फत धान्याचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक ग्रामीण...
शेतकरी महिला उद्योजकांनी घेतली कृषी योजनांची माहिती
एकता दर्शन, सातारा : शेतकरी महिला उद्योजकांना प्रोत्साहन देणे, शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योगाला चालना देणे, शेती संदर्भातील शासनाच्या विविध विकास योजनांची माहिती महिलांपर्यंत...
कालवा अस्तरीकरणास शेतकऱ्यांचा विरोध
एकता दर्शन : नीरा उजवा कालवा अस्तरीकरणाला शेतकरी, ग्रामस्थांचा असलेला विरोध दिवसेंदिवस वाढत असून मंगळवार दि.१८ रोजी फलटण तालुक्यातील २२ गावांमधील शेतकरी व नागरिकांनी येथील जलसंपदा...
फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिक विम्याचा लाभ घ्यावा
एकदा दर्शन : फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील बाजरी, कांदा व अन्य पिकांचा पिक विमा केवळ एक रुपयात उतरवावा. दि.३१ जुलैपर्यंत शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून पिक विमा...
