फलटणच्या जयदीपची मुंबई आयआयटीत इंट्री
गिरीधर सायन्स अकॅडमीतील जयदीप अभिनव कदम या विद्यार्थ्याची मॅकेनिकल इंजिनिअरींगसाठी मुंबई येथील आयआयटीमध्ये प्रवेश मिळाला असल्याची माहिती अकॅडमीचे संचालक शिवराज भोईटे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
आयआयटीत प्रवेश मिळविणे प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वप्न असते. अशा प्रतिष्ठीत संस्थेत प्रवेश मिळणे गौरवास्पद असल्याचे मानले जाते. JEE, CET परीक्षेसाठी विद्यार्थी खुप मेहनत घेतात. कष्टप्रद अभ्यासातुन यश मिळते, याला जयदीपची मेहनत अपवाद नसल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
गिरीधर सायन्स अकॅडमीतील अनेक विद्यार्थ्यांनी सीओइपी पुणे, पीआयसीटी, व्हिआयटी, व्हिजेटीआय, वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींग यासारख्या प्रतिष्ठीत अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतले. चांगल्या गुणांनी ते विद्यार्थी उत्तीर्णही झाले असून यशस्वीतांच्या यादीत आता जयदीपचे नाव आले आहे. शिवराज भोईटे, मयुर भोईटे, वडील अभिनव कदम यांच्या मार्गदर्शनामुळे जयदीपला प्रेरणा मिळाली, यातुन त्यास यश प्राप्त झाले.
जयदीपच्या नेत्रदिपक यशाबदल आयडीयल इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या संस्थापक अध्यक्षा डॉ.वैशालीताई शिंदे, मनोहर भोईटे यांनी त्यांचा सत्कार केला. जयदीपच्या यशाबद्दल सर्व स्तरातुन त्याचे अभिनंदन होत आहे.
Sponsored
संबंधित बातम्या
महत्मा फुले ज्ञानविकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा.रमेश आढाव
फलटण: सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महात्मा फुले ज्ञान विकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश तुकाराम आढाव यांची संस्थेच्या विशेष सर्वसाधारण सभेत...
दहावी परीक्षेत कै.संजय गांधी विद्यालयाचा ९२ टक्के निकाल
फलटण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत गुणवरे (ता.फलटण) येथील श्री.भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित...
दहावी परीक्षेत प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचा शंभर टक्के निकाल
फलटण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड...
फलटण तालुक्यातील दहावीचा निकाल ९४.९६ टक्के
फलटण: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून फलटण तालुक्यातील इयत्ता दहावीचा निकाल ९४.९६% लागला...
आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयातील दहावीचा निकाल शंभर टक्के
फलटण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत महात्मा एज्युकेशन सोसायटी संचलित आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक...
