सुरक्षारक्षक भरतीस बेरोजगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
फलटण : येथील मुधोजी महाविद्यालयामध्ये गेली दोन दिवसांपासुन सुरू असलेल्या सुरक्षारक्षक भरतीला फलटण तालुक्यातील बेरोजगार युवकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. या भरती मेळाव्यात अनेक पात्र बेरोजगार युवकांना प्रत्यक्ष भरती झाल्याचे अधिकृत नियुक्ती पत्रं देण्यात आली असुन नोकरीची संधी मिळाली असल्याचे दृश्य चित्र आहे. ३१ जुलै भरती प्रक्रियेचा अखेरचा दिवस असुन तालुक्यातील गरजू इच्छूक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिव स्वराज्य सेक्युरीटी अँड मॅन पॉवर सर्विसेस प्रा.लि. कंपनीच्यावतीने करण्यात आले आहे.
सुक्ष्म लघू मंत्रालय भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत आणि भारत सरकारच्या पसारा अॅक्ट २००५ च्या नियमानुसार स्थानिक बेरोजगार युवकांसाठी नोकरी देण्यात येते. आयएसओ मान्यताप्राप्त शिव स्वराज्य सेक्युरीटी अँड मॅन पॉवर सर्विसेस प्रा.लि. आणि फलटण एज्युकेशन सोसायटीचे मुधोजी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सुरक्षारक्षक भरती प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले आहे. ही प्रक्रिया मुधोजी महाविद्यालयामध्ये दि. २९ जुलै पासुन सुरू आहे. दि. ३१ जुलै भरतीचा अखेरचा दिवस आहे. सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत भरती सुरू राहणार आहे.
गेली दोन दिवस सुरक्षारक्षक भरती प्रक्रियेस बेरोजगार तरुणांचा उत्तम प्रतिसाद मिळत असुन तालुक्यातील बेरोजगार युवकांनी या संधीचा फायदा घ्यावा, असे सांगत अधिक माहितीसाठी ९५५२२३८०५७ / ९५६९७२१६४० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन भरती अधिकारी चंद्रशेखर सिंग, महेश सरतापे यांनी केले आहे.
Sponsored
संबंधित बातम्या
लेखणी, वाणी आणि कृतीचा दुर्मीळ संगम : प्रा. रमेश आढाव
ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, लेखक आणि सामाजिक चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते प्रा. रमेश तुकाराम आढाव यांची १ ऑगस्ट रोजी साजरी होणारी जयंती म्हणजे त्यांच्या कार्याचा, विचारांचा आणि समाजासाठी...
लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे
एकता दर्शन (फलटण) : पत्रकारिता क्षेत्रात येणार्या नव्या पिढीतील पत्रकारांचा अभ्यास प्रगल्भ असणे आवश्यक आहे. आपल्या परिसराची ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक पार्श्वभूमी यांची सखोल...
डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान
एकता दर्शन (फलटण) : शिक्षण क्षेत्रातील प्रतिथयश व्यक्तिमत्त्व डॉ.वैशाली विजय शिंदे यांची भारत गौरव रत्न श्री सन्मान कौन्सिल (भारत सरकारमान्य संस्था) यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या...
पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन
एकता दर्शन (फलटण) : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस...
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम
एकता दर्शन (फलटण) : श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग असलेल्या (आळंदी-पुणे-पंढरपूर-मोहोळ राष्ट्रीय महामार्ग) सातारा-सोलापूर जिल्हा सरहद्दीवरील साधूबुवा ओढ्यानजिक पुणे...
