बौद्ध समाजाच्या उमेदवारीला माझा विरोध नाही ; पक्षाकडे रीतसर मागणी करा
आगामी विधानसभा निवडणुकीत फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघात बौध्द समाजाला उमेदवारी देण्याची मागणी 'फलटण संविधान समर्थन समिती'च्यावतीने विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
दरम्यान, माझा बौद्ध समाजाच्या उमेदवारीला विरोध नसून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आपण रीतसर उमेदवारीची मागणी करावी त्या मागणीस सहकार्य राहील, अशी भूमिका श्रीमंत रामराजे यांनी यावेळी स्पष्ट केली.
फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघात अनुसूचित जातीत सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या बौद्ध समाजाने "एकच निर्धार...बौद्ध आमदार..." अशी प्रतिज्ञा घेत तालुक्यात संवाद अभियान सुरू केले आहे. या अभियानास तालुक्यातील सर्वचं गावांत उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून बौद्ध समाजाला उमेदवारी द्यावी, या मागणीच्या पार्श्वभूमीवर दि. ८ रोजी विधान परिषदेचे माजी सभापती व आमदार श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याकडे संविधान समर्थन समितीच्यावतीने उमेदवारीची मागणी करण्यात आली.
या मागणीला उत्तर देताना श्रीमंत रामराजे म्हणाले, माझ्या हातात काय आहे. उमेदवारी देणारा मी कोण आहे. पक्षाकडे आपण रीतसर मागणी करावी. त्या मागणीस माझे सहकार्य राहील.
Sponsored
संबंधित बातम्या
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
एकता दर्शन (बारामती) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीजवळ विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग...
समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन
एकता दर्शन (फलटण) : फलटण शहराच्या विकासासाठी जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला जाईल, असे सांगत फलटण शहराच्या...
षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही
एकता दर्शन (फलटण) : गेल्या ३४ वर्षांच्या सत्ताकाळात फलटणच्या विकासाऐवजी शहराच्या मातीचे नुकसान झाले असल्याने षडयंत्रकारी प्रवृत्तीला तालुक्यातील सत्तेतून दूर ठेवण्याची गरज होती, अशी...
ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी आज, गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील गजानन चौकात...
ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणूकीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेचा घोडा रोखत ऐतिहासिक विजय मिळवून भाजप-राष्ट्रवादी युतीने पालिकेवर सत्ता...
