सचिन यादव यांना "शरद कृषी उद्योजक" पुरस्कार जाहिर
के.बी. ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक सचिन बबनराव यादव यांना या वर्षीचा शरद कृषी उद्योजक पुरस्कार जाहिर झाला असुन दि. २ फेब्रुवारी रोजी या पुरस्काराचे वितरण लोणंद येथे आयोजित केलेल्या कृषी महोत्सवात माजी केंद्रीय कृषीमंत्री शरदचंद्र पवार यांचे हस्ते होणार असल्याची माहिती कंपनीचे असिस्टंट जनरल मॅनेजर हेमंत खलाटे-पाटील यांनी दिली. प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी लोणंद येथे होणाऱ्या शरद कृषी महोत्सवात शरद कृषी उद्योजक पुरस्काराने सचिन यादव यांना समारंभपूरक गौरविण्यात येणार आहे. के.बी.एक्सपोर्ट कंपनी स्थापना, के.बी. बायो ऑरगेनिक्स, रेसिड्यू फ्री कृषीमाल विदेश निर्यात, रसायनमुक्त पालेभाज्या, फळे निर्यात, कंपनीचा विविध राज्यात विस्तार, मध्य प्रदेश व दिल्ली येथील कंपनीची अद्ययावत कार्यालये, १०० एक्स आयुर्वेदा फार्मासुटीकल कंपनी, दोन हजार लोकांना रोजगार, आदी वैशिष्ट्यपूर्ण काम केल्याच्या पाश्र्वभूमीवर यादव यांना सदरचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सचिन यादव यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल कंपनीतील अधिकारी, कर्मचारी, तालुक्यातील शेतकरीवर्ग आदींनी त्यांचे अभिनंदन केले असून सातारा जिल्ह्यासह विविध स्तरातून यादव यांचे कौतुक केले जात आहे.
Sponsored
संबंधित बातम्या
गॅलेक्सी संस्थेच्या कार्यक्षेत्र विस्तारास परवानगी
केबी उद्योग समूहातील कर्मचारी, शेतकरी, शेतमजूर, व्यवसायिक यांच्या आर्थिक विकासासाठी युवा उद्योजक सचिन यादव यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी...
भारत सरकारच्या स्टार्टअप योजनेचा लाभ नवउद्योजकांनी घ्यावा
देशातील बेरोजगार युवकांची आर्थिक प्रगती व्यवसायनिर्मितीच्या माध्यमातून व्हावी यासाठी पद्मश्री डॉ.मिलिंद कांबळे यांनी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की) द्वारे भारत...
धीरज आढाव एक्सलन्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट पुरस्काराने सन्मानित
गुणवरे गावचे सुपुत्र धीरज अशोक आढाव यांना महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड एक्सलन्स इन ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट (एच.आर.) हा पुरस्कार शिवाजीनगर पुणे येथील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन...
स्व.हणमंतराव पवारांमुळे श्रीराम बझारचा लौकिक सर्वदूर
एकता दर्शन : श्रीराम बझारचे व्यवस्थापन व कामगार यांच्यात योग्य समन्वयाचा सहकार महर्षी स्व.हणमंतराव पवार (आण्णा) यांनी घालून दिलेला आदर्श आजही संस्था कारभारात दिसत असल्याने श्रीराम बझारचा...
के.बी.कंपनीची उत्पादने शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरतील
भारतामध्ये सेंद्रिय शेती करण्याचे प्रमाण वाढत आहे. शेतकरी रसायनमुक्त उत्पादनांच्या खरेदीला पसंती देत आहे. शेतकऱ्यांची हीच गरज ओळखून पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यासाठी व...
