स्व.हणमंतराव पवारांमुळे श्रीराम बझारचा लौकिक सर्वदूर
एकता दर्शन : श्रीराम बझारचे व्यवस्थापन व कामगार यांच्यात योग्य समन्वयाचा सहकार महर्षी स्व.हणमंतराव पवार (आण्णा) यांनी घालून दिलेला आदर्श आजही संस्था कारभारात दिसत असल्याने श्रीराम बझारचा लौकिक सर्वदूर गेला असल्याचे सांगत अण्णांच्या सहकार व अन्य संस्थात्मक कामांची जाणीव आजही प्रकर्षाने होत असल्याचे मत श्रीराम बझारचे व्हाईस चेअरमन दिलीपसिंह भोसले यांनी व्यक्त केले.
स्व.हणमंतराव पवार यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित श्रीराम बझार येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित केला होता, याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बझारचे माजी चेअरमन महादेव पवार होते. यावेळी विद्यमान चेअरमन जितेंद्र पवार, ज्येष्ठ पत्रकार व संचालक रविंद्र बेडकिहाळ, जयकुमार शिंदे, शिवनेरी कुक्कुटपालन संस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले, धनंजय पवार, व्यवस्थापक अनंत पाटील यांच्यासह आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
एखादी संस्था मोठी करण्यासाठी कामगार हा घटक महत्त्वाचा असतो. कामगारांची एकी व कार्यक्षमता संस्थेची प्रगती, विस्तार करणारी शक्ती आहे. कामगारांनी त्या शक्तीचा उपयोग संस्थेच्या विकासासाठी करावा, असे आवाहन महादेव पवार यांनी यावेळी केले.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय हणमंतराव पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
दरम्यान, श्रीराम बझारच्या वतीने 'आदर्श शाखा पुरस्कार', 'आदर्श सेवक पुरस्कार' यांचे वितरण करण्यात आले. शिष्यवृत्तीधारक, गुणवंत विद्यार्थी, व इयत्ता पहिली ते दहावी मधील कामगारांच्या मुलांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. आयोजित रक्तदान शिबीरात १०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. संस्थेच्या वतीने रक्तदात्यांना भेटवस्तू देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अंनत पाटील यांनी केले. आभार मारुती गावडे यांनी मानले. कार्यक्रमास भोसले सर, अशोक पवार, कि.मा. शिंदे, अमोल सस्ते, बापूराव गावडे, आनंद शिंदे, राजाराम फणसे, आनंद बेलदार, महादेव पोकळे, शीतल अहिवळे, सुभाष कर्णे, तुषार गांधी, सौ.प्रभावती गरुड, अनिल रणवरे, नितीन भोसले, शेखर खलाटे यांच्यासह बाझारचे अधिकारी व कर्मचारी, पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Sponsored
संबंधित बातम्या
सचिन यादव यांना "शरद कृषी उद्योजक" पुरस्कार जाहिर
के.बी. ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक सचिन बबनराव यादव यांना या वर्षीचा शरद कृषी उद्योजक पुरस्कार जाहिर झाला असुन दि. २ फेब्रुवारी रोजी या पुरस्काराचे वितरण लोणंद येथे आयोजित केलेल्या कृषी...
गॅलेक्सी संस्थेच्या कार्यक्षेत्र विस्तारास परवानगी
केबी उद्योग समूहातील कर्मचारी, शेतकरी, शेतमजूर, व्यवसायिक यांच्या आर्थिक विकासासाठी युवा उद्योजक सचिन यादव यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी...
भारत सरकारच्या स्टार्टअप योजनेचा लाभ नवउद्योजकांनी घ्यावा
देशातील बेरोजगार युवकांची आर्थिक प्रगती व्यवसायनिर्मितीच्या माध्यमातून व्हावी यासाठी पद्मश्री डॉ.मिलिंद कांबळे यांनी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की) द्वारे भारत...
धीरज आढाव एक्सलन्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट पुरस्काराने सन्मानित
गुणवरे गावचे सुपुत्र धीरज अशोक आढाव यांना महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड एक्सलन्स इन ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट (एच.आर.) हा पुरस्कार शिवाजीनगर पुणे येथील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन...
के.बी.कंपनीची उत्पादने शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरतील
भारतामध्ये सेंद्रिय शेती करण्याचे प्रमाण वाढत आहे. शेतकरी रसायनमुक्त उत्पादनांच्या खरेदीला पसंती देत आहे. शेतकऱ्यांची हीच गरज ओळखून पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यासाठी व...
