शेतकरी महिला उद्योजकांनी घेतली कृषी योजनांची माहिती
एकता दर्शन, सातारा : शेतकरी महिला उद्योजकांना प्रोत्साहन देणे, शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योगाला चालना देणे, शेती संदर्भातील शासनाच्या विविध विकास योजनांची माहिती महिलांपर्यंत पोहचविणे या उद्देशाने शेऱ्याचीवाडी ग्रामपंचायत, कृषी विभाग, व प्रगती ग्रामसंघाच्या वतीने शेऱ्याचीवाडी (ता.फलटण) येथे शेतकरी महिला प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी मंडल कृषी अधिकारी सतीश निंबाळकर, कृषी पर्यवेक्षक राहुल कांबळे, फलटण उपविभागीय कृषी अधिकारी कैलास धुमाळ, फलटण तालुका कृषी अधिकारी सागर डांगे यांच्यासह आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रशिक्षणासाठी उपस्थित असलेल्या महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना मंडल कृषी अधिकारी सतीश निंबाळकर म्हणाले, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान योजनेत स्वयंसहायता समूहांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. पीक उत्पादनावरील खर्च कमी करून अधिकाधिक नफा मिळविण्यासाठी सेंद्रिय शेती काळाची गरज आहे. एक रुपयात पीक विमा घेऊन 'प्रधानमंत्री पीक विमा योजने'त सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन करीत 'डॉ.पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन', व 'परंपरागत शेती विकास योजने'ची सविस्तर माहिती निंबाळकर यांनी यावेळी दिली.

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना, शेतमाल प्रक्रियायुक्त उत्पादने व अर्थसहाय्याच्या शासकीय योजना, फळं व कडधान्य प्रक्रिया, अल्प खर्चिक सेंद्रिय निविष्ठा निर्मिती, प्रधानमंत्री पीक विमा योजना यासंदर्भात सविस्तर माहिती कृषी पर्यवेक्षक राहुल कांबळे यांनी यावेळी दिली.
दरम्यान, उपविभागीय कृषी अधिकारी कैलास धुमाळ व तालुका कृषी अधिकारी सागर डांगे यांनी प्रशिक्षणातील उपस्थित महिला शेतकरी व उद्योजकांना मार्गदर्शन केले. यावेळी शेऱ्याचीवाडी ग्रामपंचायत परिसरातील शेतकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Sponsored
संबंधित बातम्या
वखार महामंडळाच्या सुविधांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा
चालू रब्बी हंगामातील शेतमाल विकण्याची घाई शेतकरीवर्गाने करू नये. उत्पादित शेतमाल वाळवून व स्वच्छ करून वखार महामंडळाच्या गोदामात आणून ठेवावा. बाजारातील शेतमालाचे भाव वाढल्यानंतर शासकीय...
पर्यावरण संवर्धनासाठी 'एक कुटुंब-एक झाड' मोहीम
एकता दर्शन, सातारा : पर्यावरण संवर्धनामध्ये पुरवठा विभागाचा महत्वपूर्ण सहभाग असावा या उद्देशाने सन २०२३ मध्ये पुणे विभागातील पुरवठा विभागामार्फत धान्याचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक ग्रामीण...
कालवा अस्तरीकरणास शेतकऱ्यांचा विरोध
एकता दर्शन : नीरा उजवा कालवा अस्तरीकरणाला शेतकरी, ग्रामस्थांचा असलेला विरोध दिवसेंदिवस वाढत असून मंगळवार दि.१८ रोजी फलटण तालुक्यातील २२ गावांमधील शेतकरी व नागरिकांनी येथील जलसंपदा...
फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिक विम्याचा लाभ घ्यावा
एकदा दर्शन : फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील बाजरी, कांदा व अन्य पिकांचा पिक विमा केवळ एक रुपयात उतरवावा. दि.३१ जुलैपर्यंत शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून पिक विमा...
तापमान वाढ नियंत्रणावर वृक्ष लागवड प्रभावी उपाय : श्रीमंत रामराजे
एकता दर्शन : वृक्ष लागवड व संवर्धन हे जागतिक तापमान वाढीवर नियंत्रण करणारा प्रभावी उपाय आहे. झाडे लावावीत, जगवावीत. मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यासाठी वृक्ष लागवड अभियान व्यापक...
