तापमान वाढ नियंत्रणावर वृक्ष लागवड प्रभावी उपाय : श्रीमंत रामराजे
एकता दर्शन : वृक्ष लागवड व संवर्धन हे जागतिक तापमान वाढीवर नियंत्रण करणारा प्रभावी उपाय आहे. झाडे लावावीत, जगवावीत. मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यासाठी वृक्ष लागवड अभियान व्यापक प्रमाणात राबवावे असे सांगत वृक्ष लागवड मोहिमेत सर्वांनीच सक्रिय सहभागी होण्याची आवश्यकता असल्याचे मत महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
लोकसंख्या दिन व माजी वसुंधरा अभियानाचे औचित्य साधून फलटण बिल्डर्स असोसिएशन, वॉकर्स ग्रुप, व सगुनामाता कन्स्ट्रक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील न्यायालय व विमानतळ परिसरात ३५० वृक्ष लागवडीचा उपक्रम आयोजित केला होता. या उपक्रमाचा शुभारंभ श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते करण्यात आला, याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, नगरपालिका मुख्याधिकारी संजय गायकवाड, वनाधिकारी जाधव, मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य बाळासाहेब गंगावणे, श्रीराम कारखाना चेअरमन डॉ.बाळासाहेब शेंडे, माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे आदी प्रमुख उपस्थित होते.
कुठे पाऊस आहे, कुठे नाही. काही ठिकाणी तर पावसाने थैमान घातले आहे. तर, अन्य ठिकाणी पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. पर्यावरण संतुलित राहण्यासाठी, जागतिक तापमान वाढ नियंत्रणात राहण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड होणे व त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे. वृक्ष लागवडीची तरुणांनी हाती घेतलेली मोहीम भविष्यकाळाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे श्रीमंत रामराजे यांनी यावेळी सांगितले.

आमदार चव्हाण म्हणाले, झाडे अनेक लावली जातात मात्र त्याकडे पुन्हा लक्ष दिले जात नाही. झाडे लावली पाहिजेत आणि जपली पाहिजेत तरच वृक्ष लागवडीचं सार्थक होईल.
दरम्यान डॉ.महेश बर्वे यांनी वृक्ष लागवडीचे महत्त्व विशद केले. यावेळी प्रमोद निंबाळकर, तुषार निंबाळकर, राजीव निंबाळकर, रणधीर भोईटे, विक्रम झांजूर्णे, सुनील सस्ते, स्वीकार मेहता, आशिष गडकरी, महेश गरवालीया, जावेद तांबोळी यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी विद्यार्थी उपस्थित होते.
युवकांनी सहभाग घ्यावा
लोकसंख्या ज्याप्रमाणे वाढत आहे त्या पटीत झाडांची संख्या वाढावी. भविष्याच्या दृष्टीने वृक्ष लागवड करणे क्रमप्राप्त झाले आहे. युवकांनी व सामाजिक संस्थांनी वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीमंत संजीवराजे यांनी यावेळी केले.
Sponsored
संबंधित बातम्या
वखार महामंडळाच्या सुविधांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा
चालू रब्बी हंगामातील शेतमाल विकण्याची घाई शेतकरीवर्गाने करू नये. उत्पादित शेतमाल वाळवून व स्वच्छ करून वखार महामंडळाच्या गोदामात आणून ठेवावा. बाजारातील शेतमालाचे भाव वाढल्यानंतर शासकीय...
पर्यावरण संवर्धनासाठी 'एक कुटुंब-एक झाड' मोहीम
एकता दर्शन, सातारा : पर्यावरण संवर्धनामध्ये पुरवठा विभागाचा महत्वपूर्ण सहभाग असावा या उद्देशाने सन २०२३ मध्ये पुणे विभागातील पुरवठा विभागामार्फत धान्याचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक ग्रामीण...
शेतकरी महिला उद्योजकांनी घेतली कृषी योजनांची माहिती
एकता दर्शन, सातारा : शेतकरी महिला उद्योजकांना प्रोत्साहन देणे, शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योगाला चालना देणे, शेती संदर्भातील शासनाच्या विविध विकास योजनांची माहिती महिलांपर्यंत...
कालवा अस्तरीकरणास शेतकऱ्यांचा विरोध
एकता दर्शन : नीरा उजवा कालवा अस्तरीकरणाला शेतकरी, ग्रामस्थांचा असलेला विरोध दिवसेंदिवस वाढत असून मंगळवार दि.१८ रोजी फलटण तालुक्यातील २२ गावांमधील शेतकरी व नागरिकांनी येथील जलसंपदा...
फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिक विम्याचा लाभ घ्यावा
एकदा दर्शन : फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील बाजरी, कांदा व अन्य पिकांचा पिक विमा केवळ एक रुपयात उतरवावा. दि.३१ जुलैपर्यंत शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून पिक विमा...
