केबी कंपनीच्या कार्याचा विस्तार देश-विदेशात करणार : उद्योजक सचिन यादव
एकता दर्शन : देशाच्या उद्योग नगरीतील स्पर्धात्मक प्रगतीमध्ये दमदार पाऊल टाकणाऱ्या फलटण सारख्या ग्रामीण भागातील सस्तेवाडी येथील केबी एक्स्पोर्ट या कंपनीचा देशातील विविध भागात विस्तार करणारे कल्पक संचालक सचिन यादव यांचा वाढदिवस आणि गॅलक्सी कॉ-ऑप. क्रेडिट सोसायटीचा चौथा वर्धापन दिन या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर कंपनीस्थळी शानदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला, क्रीडा, साहित्य, सहकार, कृषी, विज्ञान, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी सचिन यादव यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.
केबी कंपनीच्या आवारामध्ये सचिन यादव यांना शुभेच्छा देण्यासाठी रांगा लागल्याचे चित्र होते. यामध्ये छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेचे व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रामभाऊ लेंभे, फलटण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, भारतीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अच्युतराव खलाटे (दादा) यांची विशेष उपस्थिती होती. विशेषतः कंपनीचे कामगार व शेतकरी वर्ग यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होता. दरम्यान, रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ११० रक्तदात्यांनी रक्तदान केले. याप्रसंगी गॅलक्सी दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. १००x आयुर्वेदा कंपनीच्या पहिल्या तुकडीचे (बॅच) व कंपनीसंबंधित माहितीच्या अद्ययावत कार्यालयाचेही उदघाटन यावेळी करण्यात आले.

कंपनी व्यवस्थापन व प्रशासन यांच्या योग्य समन्वयातून पारदर्शी कारभार होत असल्याने कंपनीच्या आर्थिक प्रगती बरोबरच कार्याचा विस्तारही यथावकाश होत असल्याचे सांगत भविष्यात कंपनीचा विस्तार देश व विदेशाच्या विविध भागात होणार असल्याचा विश्वास सचिन यादव यांनी व्यक्त केला. देशातील बेरोजगारीची भयावह समस्या काही अंशी का होईना या कंपनीतील विविध रोजगाराच्या उपलब्धतेतून कमी करण्याचा आपला मानस आहे. आगामी काळात कंपनीच्या माध्यमातून शिक्षण व आरोग्य क्षेत्रात नाविन्यपूर्ण व समाजोपयोगी उपक्रम राबवण्याला आपण प्राधान्य देणार असून उद्योग व उद्योजक तयार होतील अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
Sponsored
संबंधित बातम्या
सचिन यादव यांना "शरद कृषी उद्योजक" पुरस्कार जाहिर
के.बी. ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक सचिन बबनराव यादव यांना या वर्षीचा शरद कृषी उद्योजक पुरस्कार जाहिर झाला असुन दि. २ फेब्रुवारी रोजी या पुरस्काराचे वितरण लोणंद येथे आयोजित केलेल्या कृषी...
गॅलेक्सी संस्थेच्या कार्यक्षेत्र विस्तारास परवानगी
केबी उद्योग समूहातील कर्मचारी, शेतकरी, शेतमजूर, व्यवसायिक यांच्या आर्थिक विकासासाठी युवा उद्योजक सचिन यादव यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी...
भारत सरकारच्या स्टार्टअप योजनेचा लाभ नवउद्योजकांनी घ्यावा
देशातील बेरोजगार युवकांची आर्थिक प्रगती व्यवसायनिर्मितीच्या माध्यमातून व्हावी यासाठी पद्मश्री डॉ.मिलिंद कांबळे यांनी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की) द्वारे भारत...
धीरज आढाव एक्सलन्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट पुरस्काराने सन्मानित
गुणवरे गावचे सुपुत्र धीरज अशोक आढाव यांना महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड एक्सलन्स इन ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट (एच.आर.) हा पुरस्कार शिवाजीनगर पुणे येथील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन...
स्व.हणमंतराव पवारांमुळे श्रीराम बझारचा लौकिक सर्वदूर
एकता दर्शन : श्रीराम बझारचे व्यवस्थापन व कामगार यांच्यात योग्य समन्वयाचा सहकार महर्षी स्व.हणमंतराव पवार (आण्णा) यांनी घालून दिलेला आदर्श आजही संस्था कारभारात दिसत असल्याने श्रीराम बझारचा...
