शिक्षण, आरोग्य क्षेत्रात जिल्हा अग्रेसर बनवू : पालकमंत्री शंभूराज देसाई
एकता दर्शन : विद्यार्थी घडवण्याचा पाया हा प्राथमिक शाळेत रचला जातो त्यामुळे शालेय वातावरण पोषक असणे गरजेचे आहे. पोषक वातावरणात अभ्यासपूर्ण विद्यार्थी घडतात, असे मत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले.
येथील जिल्हा परिषदेच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते 'माझी शाळा आदर्श शाळा' या उपक्रमाचा शुभारंभ झाला, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, नितीन धायगुडे आदी प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री देसाई म्हणाले, प्राथमिक शाळा सर्व सुविधांयुक्त असणे गरजेचे आहे, त्यासाठी शाळांना आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. आपली शाळा आदर्श करण्यासाठी पालक, ग्रामस्थ, सरपंच, मुख्याध्यापक, शिक्षक यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहभाग घेणे गरजेचे असल्याचे सांगत पहिल्या टप्प्यात ५० शाळांची निवड करण्यात आली असून जिल्ह्यात किमान ४०० आदर्श शाळा तयार करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री देसाई यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आपल्या जिल्ह्याकडे विशेष लक्ष आहे. 'माझी शाळा आदर्श शाळा' हा उपक्रम चांगला असून यामध्ये लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी सहकार्याने काम करावे. आदर्श शाळांसोबतच 'आदर्श प्राथमिक आरोग्य केंद्र'ही जिल्ह्यात उभारण्यात यावीत. खासगी रुग्णालयांच्या धर्तीवर त्यांचा विकास करावा. शिक्षण व आरोग्य क्षेत्रात आपला जिल्हा अग्रेसर बनवू असे सांगत ग्रामीण जनतेला सर्व सोयी सुविधा पुरवण्याच्या प्रत्येक कामात शासन आपल्या सोबत राहील अशी ग्वाही पालकमंत्री देसाई यांनी यावेळी दिली.
खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळणे गरजेचे असल्यामुळे अशा आदर्श शाळा उभारण्यात येत आहेत. या उपक्रमात लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी गावातील दानशूर व्यक्तींना आवाहन करावे. सर्वांनी एकत्र काम करून हा उपक्रम यशस्वी राबवू.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या उपक्रमाची सविस्तर माहिती संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून देत आदर्श शाळांमध्ये संगणक कक्ष, ग्रंथालय, प्रयोगशाळा, किचन गार्डन, संरक्षक भिंत, क्रीडांगण, ई लर्निंग स्टुडिओ, सौर ऊर्जेचा अंतर्भाव यासह अन्य सुविधांचा समावेश असून विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासोबत शैक्षणिक गुणवत्ता वाढीकडेही विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान ई लर्निंग व ई-कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, आदर्श शाळा उपक्रम सुरू करण्यात आलेल्या ५० गावांमधील सरपंच, जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Sponsored
संबंधित बातम्या
फलटणच्या जयदीपची मुंबई आयआयटीत इंट्री
गिरीधर सायन्स अकॅडमीतील जयदीप अभिनव कदम या विद्यार्थ्याची मॅकेनिकल इंजिनिअरींगसाठी मुंबई येथील आयआयटीमध्ये प्रवेश मिळाला असल्याची माहिती अकॅडमीचे संचालक शिवराज भोईटे यांनी एका...
महत्मा फुले ज्ञानविकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा.रमेश आढाव
फलटण: सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महात्मा फुले ज्ञान विकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश तुकाराम आढाव यांची संस्थेच्या विशेष सर्वसाधारण सभेत...
दहावी परीक्षेत कै.संजय गांधी विद्यालयाचा ९२ टक्के निकाल
फलटण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत गुणवरे (ता.फलटण) येथील श्री.भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित...
दहावी परीक्षेत प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचा शंभर टक्के निकाल
फलटण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड...
फलटण तालुक्यातील दहावीचा निकाल ९४.९६ टक्के
फलटण: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून फलटण तालुक्यातील इयत्ता दहावीचा निकाल ९४.९६% लागला...
