ब्लूम स्कुलच्या दिंडी सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
गुणवरे (ता. फलटण) : ज्ञानोबा माऊली...तुकाराम...झाडे लावा झाडे जगवा...असा विठ्ठल नामाचा गजर व विविध सामाजिक संदेश देत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त गुणवरे (ता. फलटण) येथील ब्लूम इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी वारकऱ्यांनी काढलेल्या दिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
याप्रसंगी शाळेतील बालचमू विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई आदी संतांच्या केलेल्या आकर्षक वेशभूषा ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेत होत्या. विद्यार्थ्यांनी खांद्यावर घेतलेली पालखी, पताका, मृदुंग, टाळ, तुलसी या सर्वांमुळे साक्षात पालखी सोहळ्याचा ग्रामस्थांनी अनुभव घेतला. आपल्या सांस्कृतिक परंपरेचे महत्व विद्यार्थ्यांना कळावे, समाजात एकोपा वाढावा या उद्देशाने शाळेतील नर्सरी ते इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांना घेऊन हा दिंडी सोहळा आयोजित केला होता.
शाळेपासून भैरवनाथ मंदिर ते विठ्ठल रुक्मिणी मंदिर, ते पुन्हा भैरवनाथ मंदिर असा दिंडीचा प्रवास सुरु असताना शाळेचे प्राचार्य गिरिधर गावडे व जाधव सर यांनी वारकरी संप्रदायाचा हरिपाठ म्हणून दिंडी सोहळ्याची शोभा वाढवली. भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी पारंपारिक फुगडी, काठवट आदी खेळ खेळले. या खेळामध्ये विद्यार्थ्यांच्या बरोबर संस्थेचे अध्यक्ष ईश्वर तात्या गावडे, संस्थेच्या सचिव साधनाताई गावडे, प्राचार्य, शिक्षक, शिक्षिका, व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही सहभाग घेतला.
याप्रसंगी बालचमू विद्यार्थ्यांची दिंडी काढल्याबद्दल गुणवरे गावातील बारा गाड्यांचे मानकरी दत्तात्रय गौंड यांनी संस्थेच्या सचिव साधनाताई गावडे व अध्यक्ष ईश्वर यांचे श्रीफळ पुष्प देऊन स्वागत करून दिंडीचा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. शाळेचे उपप्राचार्य रमेश सस्ते, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी हा दिंडी सोहळा यशस्वी केला.

प्रबोधन जनजागृतीचा पालखी सोहळा
विद्यार्थ्यांनी विठ्ठल नामाचा गजर करत संपूर्ण परिसर भक्तिमय केला. दिंडीतील हरिपाठ, भक्तिगीते यासह झाडे लावा झाडे जगवा, मुली वाचवा मुली शिकवा, पर्यावरणाचे रक्षण करा, स्वच्छता ठेवा असे संदेश देणारे फलक हातात घेऊन जनजागृतीपर पालखी सोहळा गुणवरे गावात फिरला. गावात ठिकठिकाणी बालचमूंच्या पालखी सोहळ्यातील दिंडीचे व वारकऱ्यांचे स्वागत ग्रामस्थ करत होते.
Sponsored
संबंधित बातम्या
लेखणी, वाणी आणि कृतीचा दुर्मीळ संगम : प्रा. रमेश आढाव
ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, लेखक आणि सामाजिक चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते प्रा. रमेश तुकाराम आढाव यांची १ ऑगस्ट रोजी साजरी होणारी जयंती म्हणजे त्यांच्या कार्याचा, विचारांचा आणि समाजासाठी...
लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे
एकता दर्शन (फलटण) : पत्रकारिता क्षेत्रात येणार्या नव्या पिढीतील पत्रकारांचा अभ्यास प्रगल्भ असणे आवश्यक आहे. आपल्या परिसराची ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक पार्श्वभूमी यांची सखोल...
डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान
एकता दर्शन (फलटण) : शिक्षण क्षेत्रातील प्रतिथयश व्यक्तिमत्त्व डॉ.वैशाली विजय शिंदे यांची भारत गौरव रत्न श्री सन्मान कौन्सिल (भारत सरकारमान्य संस्था) यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या...
पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन
एकता दर्शन (फलटण) : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस...
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम
एकता दर्शन (फलटण) : श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग असलेल्या (आळंदी-पुणे-पंढरपूर-मोहोळ राष्ट्रीय महामार्ग) सातारा-सोलापूर जिल्हा सरहद्दीवरील साधूबुवा ओढ्यानजिक पुणे...
