कामगार कल्याण मंडळाच्या कवी संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद
एकता दर्शन : महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र (सातारा), सातारा हॉस्पिटल अँड डायग्नोस्टिक सेंटर, एम.डी. शिंदे चॅरिटेबल अँड मेडिकल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा येथे आयोजित केलेल्या कवी संमेलनात सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यातील कवींनी सहभाग घेत सामाजिक विषयावरील कवितांचे वैशिष्ट्यपूर्ण शैलीत सादरीकरण करून कवी संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
औद्योगिक क्षेत्रातील कामगार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी कामगार कल्याण मंडळ विविध उपक्रम राबवत असते, याचाच एक भाग म्हणून केंद्र संचालक संदीप कांबळे यांनी कवी संमेलनाचे आयोजन सातारा डायग्नोस्टिक सेंटरच्या सभागृहात केले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.सुरेश शिंदे, डॉ.जयश्री शिंदे, संमेलनाचे अध्यक्ष कवी व लेखक प्रदीप कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी अमोल मांढरे, सुहास चव्हाण, किशोर धारपाडे, रमाकांत देशपांडे, प्रवीण कोळपे, श्रीकांत देशमुख, मनोज हातेकर, संगीता भोईटे, राजकुमार किर्दत, संजय बडेकर यांच्यासह अनेक कवींनी आपल्या कवितांचे सादरीकरण केले.

डॉ.सुरेश शिंदे, डॉ.जयश्री शिंदे, प्रदीप कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त करीत कवी संमेलनातील सहभागी कवींचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
संमेलनास प्रा.चंद्रकांत नलवडे, विक्रमसिंह शिंदे, कामगार कल्याण मंडळाचे सोमनाथ चोरगे, डॉ.विकास जाधव, डॉ. दीपक जाधव, डॉ.निलेश साबळे, बाळासाहेब गवळी, धनंजय यादव, गौरव गोरे यांच्यासह विविध संस्थाचे पदाधिकारी, राजमाता नर्सिंग स्कूल, कामगार कल्याण मंडळ चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्ट सातारा हॉस्पिटल कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
Sponsored
संबंधित बातम्या
लेखणी, वाणी आणि कृतीचा दुर्मीळ संगम : प्रा. रमेश आढाव
ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, लेखक आणि सामाजिक चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते प्रा. रमेश तुकाराम आढाव यांची १ ऑगस्ट रोजी साजरी होणारी जयंती म्हणजे त्यांच्या कार्याचा, विचारांचा आणि समाजासाठी...
लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे
एकता दर्शन (फलटण) : पत्रकारिता क्षेत्रात येणार्या नव्या पिढीतील पत्रकारांचा अभ्यास प्रगल्भ असणे आवश्यक आहे. आपल्या परिसराची ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक पार्श्वभूमी यांची सखोल...
डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान
एकता दर्शन (फलटण) : शिक्षण क्षेत्रातील प्रतिथयश व्यक्तिमत्त्व डॉ.वैशाली विजय शिंदे यांची भारत गौरव रत्न श्री सन्मान कौन्सिल (भारत सरकारमान्य संस्था) यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या...
पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन
एकता दर्शन (फलटण) : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस...
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम
एकता दर्शन (फलटण) : श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग असलेल्या (आळंदी-पुणे-पंढरपूर-मोहोळ राष्ट्रीय महामार्ग) सातारा-सोलापूर जिल्हा सरहद्दीवरील साधूबुवा ओढ्यानजिक पुणे...
