डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी पत्रकारांच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन
फलटण : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त फलटण शहर व तालुक्यातील पत्रकारांच्यावतीने येथील प्रशासकीय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती फलटण तालुका पत्रकार संघाने एका प्रसिद्धी पत्रकारद्वारे दिली आहे.
दि.१४ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० वाजता येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास फलटण तालुक्यातील पत्रकारांच्यावतीने अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर १०:३० वाजता डेक्कन चौक येथील हॉटेल अशोकामधील सांस्कृतिक सभागृहात स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा, नोटरी व सरकारी वकीलपदी नियुक्त झालेल्या वकिलांचा सत्कार प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत केला जाणार आहे.
या कार्यक्रमासाठी फलटण उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, तहसीलदार डॉ.अभिजीत जाधव, फलटण ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्यासह फलटण शहर व तालुक्यातील विविध वृत्तपत्रातील पत्रकार उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन फलटण शहर व तालुका पत्रकार संघाच्यावतीने करण्यात आले आहे.
Sponsored
संबंधित बातम्या
लेखणी, वाणी आणि कृतीचा दुर्मीळ संगम : प्रा. रमेश आढाव
ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, लेखक आणि सामाजिक चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते प्रा. रमेश तुकाराम आढाव यांची १ ऑगस्ट रोजी साजरी होणारी जयंती म्हणजे त्यांच्या कार्याचा, विचारांचा आणि समाजासाठी...
लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे
एकता दर्शन (फलटण) : पत्रकारिता क्षेत्रात येणार्या नव्या पिढीतील पत्रकारांचा अभ्यास प्रगल्भ असणे आवश्यक आहे. आपल्या परिसराची ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक पार्श्वभूमी यांची सखोल...
डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान
एकता दर्शन (फलटण) : शिक्षण क्षेत्रातील प्रतिथयश व्यक्तिमत्त्व डॉ.वैशाली विजय शिंदे यांची भारत गौरव रत्न श्री सन्मान कौन्सिल (भारत सरकारमान्य संस्था) यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या...
पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन
एकता दर्शन (फलटण) : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस...
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम
एकता दर्शन (फलटण) : श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग असलेल्या (आळंदी-पुणे-पंढरपूर-मोहोळ राष्ट्रीय महामार्ग) सातारा-सोलापूर जिल्हा सरहद्दीवरील साधूबुवा ओढ्यानजिक पुणे...
