'प्रोग्रेसिव्ह'मधील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
फलटण: जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज (कोळकी, ता.फलटण) आणि लायन्स क्लब ऑफ फलटण गोल्डन यांच्या संयुक्त विद्यमाने फलटण येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास शहरातील अनेकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन शिबिराचा लाभ घेतला
या शिबिरात जवळपास ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती, राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन झाल्यानंतर शिबिराचे उद्घाटन राजनकाका देशमुख महाराज यांच्याहस्ते फित कापून करण्यात आले.
यावेळी सरस्वती शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या, समाजाप्रती सेवा करण्याचा संस्कार विद्यार्थ्यांमध्ये असला पाहिजे. त्यांनी आत्मसात केलेल्या ज्ञानसंपदाचा उपयोग सामाजिक कर्तव्य म्हणून समाजव्यवस्थेत केला पाहिजे. असे केल्याने दातृत्वाची भावना वाढीस लागेल. शाळांमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविले गेले पाहिजेत. शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्यात समन्वय असणे गरजेचे आहे.
राजनकाका देशमुख महाराज म्हणाले, रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. लोकांनी जीवनात आनंदी, समाधानी असणे गरजेचे आहे. समाजातील महिलांनी आलेल्या संकटांना सामोरे जाऊन परिस्थितीतून मार्ग काढावा व आनंदी जीवन जगावे.

नीलम देशमुख यांनी यावेळी महिला सक्षमीकरण विषयावर सखोल माहितीचे मार्गदर्शन केले.
दरम्यान, विशेष उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्तृत्वान महिला, हॉस्पिटल व शाळांमधील सेविका महिला, मुलगीरुपी एक अपत्य असणाऱ्या माता यांचा लायन्स क्लब ऑफ फलटण गोल्डन यांच्यावतीने सन्मान करण्यात आला.
या शिबिरात प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचे प्राचार्य अमित सस्ते, पर्यवेक्षिका सौ.माधुरी माने, सौ.सुवर्णा निकम, योगिता सस्ते, ज्ञानेश्वर जाधव, सौ.उज्ज्वला निंबाळकर, ऋषिकेश बिचुकले, पत्रकार नासिरभाई शिकलगार, राजू बनसोडे, उद्धव बोराटे यांच्यासह प्रोग्रेसिव्ह स्कूल व लायन्स क्लब ऑफ फलटण गोल्डनचे पदाधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
Sponsored
संबंधित बातम्या
लेखणी, वाणी आणि कृतीचा दुर्मीळ संगम : प्रा. रमेश आढाव
ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, लेखक आणि सामाजिक चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते प्रा. रमेश तुकाराम आढाव यांची १ ऑगस्ट रोजी साजरी होणारी जयंती म्हणजे त्यांच्या कार्याचा, विचारांचा आणि समाजासाठी...
लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे
एकता दर्शन (फलटण) : पत्रकारिता क्षेत्रात येणार्या नव्या पिढीतील पत्रकारांचा अभ्यास प्रगल्भ असणे आवश्यक आहे. आपल्या परिसराची ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक पार्श्वभूमी यांची सखोल...
डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान
एकता दर्शन (फलटण) : शिक्षण क्षेत्रातील प्रतिथयश व्यक्तिमत्त्व डॉ.वैशाली विजय शिंदे यांची भारत गौरव रत्न श्री सन्मान कौन्सिल (भारत सरकारमान्य संस्था) यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या...
पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन
एकता दर्शन (फलटण) : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस...
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम
एकता दर्शन (फलटण) : श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग असलेल्या (आळंदी-पुणे-पंढरपूर-मोहोळ राष्ट्रीय महामार्ग) सातारा-सोलापूर जिल्हा सरहद्दीवरील साधूबुवा ओढ्यानजिक पुणे...
