२५ मार्च रोजी गुणवरे येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीर
एकता दर्शन : गुणवरे, ता.फलटण येथे दि.२५ रोजी येथील विकास सोसायटीच्या हॉलमध्ये मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दोशी गुणवरेकर चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे देण्यात आली आहे.
फलटण येथील दोशी गुणवरेकर चॅरीटेबल ट्रस्ट, जनसेवा डायग्नोस्टीक सेंटर, माऊली फाऊंडेशन मुंबई, लायन्स मुधोजी चॅरिटेबल आय हॉस्पिटल, फलटण ब्लड बँक, जैन सोशल ग्रुप आणि गुणवरे ग्रामपंचायत आदी संस्थाच्या संयुक्त विद्यमाने सदरचे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीर आयोजित करण्यात आले असून या शिबिरादरम्यान मोफत चेष्मे वाटप, माफक दारात मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रक्तदान शिबीर आयोजित केले आहे.
शिबीराचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांचे हस्ते होणार आहे. याप्रसंगी एमडी मेडिसिन डॉ.जे.टी पोळ, डॉ.राजस गांधी, डॉ.कल्याण नाळे, बालरोग तज्ञ डॉ.गुंजन गांधी, डॉ.अमोल नाळे, डॉ.निखिल गावडे, सर्जन डॉ.भारत पोंदुकले, दंतरोग तज्ञ डॉ.अशोक व्होरा, डॉ.चेतन गुदेंचा, डॉ.श्रीकांत गावडे, डॉ. मनोज गांधी सौ.प्रज्ञा गांधी, अस्थिरोग तज्ञ डॉ.प्रवीण आगवणे, डॉ.तेजस गांधी स्त्रीरोग तज्ञ डॉ.संतोष गांधी, डॉ.अलोक गांधी

नेत्ररोग तज्ञ डॉ.इंद्रायणी नक्षणे, डॉ.अमृता कामठे, पॅथॉलॉजी तज्ञ डॉ.दिव्या रसाळ, त्वचारोग तज्ञ डॉ.चैत्राली खोमणे, ब्लड बँक डॉ.श्रीकांत करवा, जनरल फिजिशियन डॉ.मिलिंद दोशी, डॉ.ऋषिकेश राजवैद्य, डॉ.श्री.हेमंत व सौ.आश्विनी अब्दागिरे, डॉ.सिद्धांत दोशी, डॉ.गणेश शिंदे, डॉ.त्रिंबक गावडे, डॉ.तुकाराम गावडे, डॉ.सागर तेली, डॉ.वर्षा नाळे, डॉ.सुनिल गावडे, डॉ.संदिप नाळे, डॉ.अभिजीत गावडे, डॉ.जयवंत गावडे आदी उपस्थित राहणार आहेत.
गुणवरे पंचक्रोशीतील शालेय विद्यार्थी, महिला, पुरुष, ग्रामस्थांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन मंगेश शेठ दोशी यांनी केले आहे.
Sponsored
संबंधित बातम्या
लेखणी, वाणी आणि कृतीचा दुर्मीळ संगम : प्रा. रमेश आढाव
ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, लेखक आणि सामाजिक चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते प्रा. रमेश तुकाराम आढाव यांची १ ऑगस्ट रोजी साजरी होणारी जयंती म्हणजे त्यांच्या कार्याचा, विचारांचा आणि समाजासाठी...
लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे
एकता दर्शन (फलटण) : पत्रकारिता क्षेत्रात येणार्या नव्या पिढीतील पत्रकारांचा अभ्यास प्रगल्भ असणे आवश्यक आहे. आपल्या परिसराची ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक पार्श्वभूमी यांची सखोल...
डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान
एकता दर्शन (फलटण) : शिक्षण क्षेत्रातील प्रतिथयश व्यक्तिमत्त्व डॉ.वैशाली विजय शिंदे यांची भारत गौरव रत्न श्री सन्मान कौन्सिल (भारत सरकारमान्य संस्था) यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या...
पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन
एकता दर्शन (फलटण) : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस...
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम
एकता दर्शन (फलटण) : श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग असलेल्या (आळंदी-पुणे-पंढरपूर-मोहोळ राष्ट्रीय महामार्ग) सातारा-सोलापूर जिल्हा सरहद्दीवरील साधूबुवा ओढ्यानजिक पुणे...
