ब्रेकिंग न्यूज

12:00 AM लेखणी, वाणी आणि कृतीचा दुर्मीळ संगम : प्रा. रमेश आढाव

12:00 AM महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन

12:00 AM लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे

12:00 AM डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान

12:00 AM पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन 

12:00 AM समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन

12:00 AM षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही

12:00 AM ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार 

12:00 AM संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम

12:00 AM साताऱ्यात रंगणार सरस्वतांचा सोहळा ! ९९व्या मराठी साहित्य संमेलनाची 'ग्रंथदिंडी' ठरणार ऐतिहासिक

12:00 AM ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन

12:00 AM फलटणचा नवा शेर...समशेर ! समशेरसिंह नाईक निंबाळकर फलटणचे नवे नगराध्यक्ष

12:00 AM डॉ.प्रसाद जोशी व प्रसन्न जोशी 'परशुराम' पुरस्काराने सन्मानित

12:00 AM मुख्यमंत्र्यांच्या यंत्रणेवर विश्वास नसेल तर रामराजेंनीच माझी चौकशी करावी : डॉ. मुंडे आत्महत्या प्रकरणी रणजितसिंहांचे थेट आव्हान 

12:00 AM फलटण सुरक्षित ठेवण्यासाठी निर्भयपणे मतदान करा : श्रीमंत रामराजे यांचे आवाहन 

12:00 AM रणजितसिंह यांचा डॉ.मुंडे प्रकरणाशी दुरान्वये संबंध नाही ; शहराच्या परिवर्तनासाठी सत्ता द्या : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

12:00 AM फलटण येथे महायुतीचा आज जाहीर मेळावा

12:00 AM फलटणमधील नामांकित व्यापारी व जैन बांधवांचा भाजपामध्ये जाहीर प्रवेश

12:00 AM युवा लेखक सचिन गोसावी यांना पितृशोक 

12:00 AM ज्येष्ठ समाजसेवक डॉ.बाबा आढावा यांचे निधन 

12:00 AM महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा

12:00 AM दहशतमुक्त, सुरक्षित, सुसंस्कृत फलटण नगरी उभी करणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

12:00 AM माजी खासदार रणजितसिंह यांच्या विचारधारेवर आमचा विश्वास : मा.सरपंच मुनिष जाधव

12:00 AM महाराष्ट्रातील मतमोजणी २१ डिसेंबरलाच ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

12:00 AM संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारी उत्साहात

12:00 AM माँ रुद्रात्मिका गुरुमाई यांच्या 'फकिरीयत' चित्रपटाचा फलटणमध्ये भव्य शुभारंभ

12:00 AM काँट्रॅक्टर विशाल राजमाने यांचा भाजपमध्ये प्रवेश 

12:00 AM नगरपालिका निवडणुकीचा निकाल विधानसभेच्या धर्तीवर जाहीर करावा

12:00 AM प्रचाराची गाणी १९ डिसेंबर पर्यंत वाजणार 

12:00 AM नगरपालिका प्रचारासाठी '२४ तास' वाढले

12:00 AM आयुष्यमान भारत योजनेत १० लाखांपर्यत विमा संरक्षण : सिद्धाली शहा

03:13 PM सचिन यादव यांना "शरद कृषी उद्योजक" पुरस्कार जाहिर

01:18 PM दि .२९ रोजी फलटणमध्ये रक्तदान शिबीर

12:19 PM दि.6 जानेवारी रोजी पोंभुर्ले येथे 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण 

08:39 AM बौद्ध उमेदवारीची खासदार शरद पवार यांच्याकडे मागणी

02:00 PM गॅलेक्सी संस्थेच्या कार्यक्षेत्र विस्तारास परवानगी

10:56 PM महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघामुळे लघु वृत्तपत्रांवरील अन्याय दूर

02:06 PM राजे गटाचे विश्वासू माणिकराव सोनवलकर भाजपमध्ये

12:10 AM बौद्ध समाजाच्या उमेदवारीला माझा विरोध नाही ; पक्षाकडे रीतसर मागणी करा

12:16 AM मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते संत शिरोमणी श्री नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा

01:33 AM सुरक्षारक्षक भरतीस बेरोजगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

12:26 PM फलटणच्या जयदीपची मुंबई आयआयटीत इंट्री

09:49 AM एकच निर्धार...बौध्द आमदार...अभियानास फलटण तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद

03:33 PM म्हसवडकरांच्या पिण्याच्या पाण्याची वणवण थांबण्यासाठी माण नदीत पाणी सोडावे

09:22 AM विधानसभा उमेदवारीसाठी बौद्ध समाज एकवटला

04:38 PM फलटणची मिताली जिल्हास्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत अव्वल

10:41 AM महत्मा फुले ज्ञानविकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा.रमेश आढाव

11:48 AM दहावी परीक्षेत कै.संजय गांधी विद्यालयाचा ९२ टक्के निकाल

10:19 AM दहावी परीक्षेत प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचा शंभर टक्के निकाल

12:21 AM फलटण तालुक्यातील दहावीचा निकाल ९४.९६ टक्के

Sunday, 02 August 2026

Follow Us:

महापुरुषांना जातीय बंधनात अडकवू नका : सुभाषराव शिंदे

Share This Article:
महापुरुषांना जातीय बंधनात अडकवू नका : सुभाषराव शिंदे

एकता दर्शन : महाराष्ट्र हि साधू, संत, महात्मे, व महापुरुषांची भूमी असून या भूमीतील छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रासाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी काम केले. तरीही आपण या महापुरुषांना जाती धर्माच्या चौकटीत अडकवीत असल्याची खंत व्यक्त करीत यापुढे महापुरुषांचे जयंती महोत्सव सर्व जातीधर्माच्या लोकांनी एकत्र येवुन गाव व शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी साजरे करण्यासाठी आपण स्वतः प्रयत्नशील राहणार असल्याचे मत ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांनी व्यक्त केले.

शिंदेवाडी ता.फलटण येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शरद प्रतिभा शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा सौ.प्रतिभाताई शिंदे, सरपंच सौ.निर्मला शिंदे, ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ, प्रा.रमेश आढाव, माजी प्राचार्य रविंद्र येवले, साहित्यिक तानाजी जगताप, संजय अहिवळे, उपसरपंच अनिल शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात लाखो भाविक एकत्र येतात त्यावेळी कुणीही जात धर्म विचारत नाहीत मात्र अलीकडे महापुरुषांचे जयंती उत्सव जाती निहाय साजरे होताना दिसत असून हे चित्र सामाजिक दृष्ट्या धक्कादायक आहे. सामाजिक समता निर्माण होण्यासाठी या महापुरुषांचे जयंती उत्सव समाजातील  सर्व घटकांनी एकत्र येवुन साजरे केले पाहिजेत अशी अपेक्षा सुभाषराव शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील प्रत्येक समाज घटकासाठी काम केले. हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवुन आपण समाजव्यवस्थेत काम करीत असून डॉ.आंबेडकर यांची जयंती गावाच्यावतीने साजरी करण्याचा निर्णय घेतला. देशातील प्रत्येक समाजघटकांसाठी काम करणाऱ्या महापुरूषांच्या प्रती आपल्या भावना भारतीयत्वाचा असल्या पाहिजेत असे सुभाषराव शिंदे यांनी यावेळी सांगितले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सर्व समाजाचे नेते होते. त्यांनी भारताला संविधान देवून प्रगतीची नवी दिशा दिली. त्यामुळे अशा आदर्श व्यक्तिमत्वाची जयंती सर्व समाजानेच साजरी केली पाहिजे. ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांनी शिंदेवाडी येथे सर्व ग्रामस्थांना एकत्र करून डॉ.आंबेडकर यांची जयंती साजरी केली, हा शिंदेवाडी पॅटर्न तालुक्यातील परिवर्तन व प्रबोधनाची दिशा ठरेल अशी अपेक्षा महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी यावेळी व्यक्त केली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त देशाला राज्यघटनाच दिली असे नव्हे तर सामान्य वंचित घटकांना न्याय व स्वाभिमानाने जगण्याचा आत्मविश्वास व अन्याय विरुद्ध लढण्याचे बळ दिले. शालेय विद्यार्थी व तरुण पिढीसमोर पुन्हा नव्याने डॉ.बाबासाहेबांचे विचार देण्याची आवश्यकता असल्याचे माजी प्राचार्य रविंद्र येवले यांनी यावेळी सांगितले. 

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक तानाजी जगताप, प्रा.रमेश आढाव आदींनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटातील विविध पैलूंवर विचार व्यक्त केले.

प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
 
शरद प्रतिभा शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. युवा उद्योजक महेश शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमास विविध संस्थाचे पदाधिकारी, ग्रामसेवक, शिंदेवाडी, खुंटे, कांबळेश्वर, पाटणेवाडी, वडजल या गावातील ग्रामस्थ, शरद प्रतिभा हायस्कूलचे शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sponsored
संबंधित बातम्या
लेखणी, वाणी आणि कृतीचा दुर्मीळ संगम : प्रा. रमेश आढाव
लेखणी, वाणी आणि कृतीचा दुर्मीळ संगम : प्रा. रमेश आढाव

ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, लेखक आणि सामाजिक चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते प्रा. रमेश तुकाराम आढाव यांची १ ऑगस्ट रोजी साजरी होणारी जयंती म्हणजे त्यांच्या कार्याचा, विचारांचा आणि समाजासाठी...

लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे
लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे

एकता दर्शन (फलटण) : पत्रकारिता क्षेत्रात येणार्‍या नव्या पिढीतील पत्रकारांचा अभ्यास प्रगल्भ असणे आवश्यक आहे. आपल्या परिसराची ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक पार्श्वभूमी यांची सखोल...

डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान
डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान

एकता दर्शन (फलटण) : शिक्षण क्षेत्रातील प्रतिथयश व्यक्तिमत्त्व डॉ.वैशाली विजय शिंदे यांची भारत गौरव रत्न श्री सन्मान कौन्सिल (भारत सरकारमान्य संस्था) यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या...

पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन 
पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन 

एकता दर्शन (फलटण) : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस...

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम

एकता दर्शन (फलटण) : श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग असलेल्या (आळंदी-पुणे-पंढरपूर-मोहोळ राष्ट्रीय महामार्ग) सातारा-सोलापूर जिल्हा सरहद्दीवरील साधूबुवा ओढ्यानजिक पुणे...