माणच्या दुष्काळी भागात रयत शिक्षण संस्थेने ज्ञानवैभव उभे केले
एकता दर्शन, माण : कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या मुलांसाठी ज्ञानदानाचे कार्य रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केले. त्याला माणचा दुष्काळी भाग अपवाद नाही. पळशीच्या समृद्ध मातीला शिक्षणाचा सुगंध आल्याने पळशीतील रयतच्या शाखेत शिक्षण घेणारे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दुष्काळी भागात ज्ञान वैभव निर्माण केले असल्याचे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी केले.
पळशी (ता.माण) येथील रयत शिक्षण संस्थेच्या हनुमान माध्यमिक विद्यालयातील सेवक मुरलीधर बबन सावंत यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित सेवापूर्ती कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रतिथयश उद्योजक रामदास माने, सुरेश गोडसे, प्राचार्य बी.एस. खाडे, प्राचार्य संभाजीराव देसाई, ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव, सरपंच शांताबाई खाडे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
मुरलीधर सावंत शालेय सेवेबरोबरच काव्य लेखन करीत आहेत. सामाजिक क्षेत्रातही कार्यरत आहेत. एका शिक्षण संस्थेमध्येही संचालक म्हणून काम करतात. अशा सर्व क्षेत्रात काम करणारा गुणी कर्मचारी या शाळेला मिळाला. त्यांनी एकाच शाखेत आपल्या सेवेची सुरुवात आणि समाप्ती केली. तब्बल २५ वर्षे एकाच शाखेत काम करण्याची त्यांना संधी मिळाली. ती संधी त्यांनी इमाने इतबारे पार पाडली असल्याचे सांगत मनुष्य कोणत्या पदावर काम करतो हे महत्त्वाचे नसून त्याचे कार्य कर्तृत्व महत्त्वाचे असते. भविष्यात सावंत यांनी आमच्याबरोबर सामाजिक क्षेत्रात काम करावे. अशा व्यक्तींची समाजाला आजही गरज असल्याचे गौरवोद्गार देशमुख यांनी काढले.
यावेळी उद्योजक रामदास माने, प्राचार्य संभाजी देसाई, प्रा.रमेश आढाव, डॉ.ज्ञानेश्वर शेडगे, गंगाराम भोसले, यशवंत खाडे, महादेव खाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य केशवराव वणवे, माण पंचायत समिती माजी सदस्य शिवदास खाडे, राजेंद्र भोसले (गुरुजी), विद्यालयातील विद्यार्थी आदींनी सावंत यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. मुरलीधर सावंत यांचा सपत्नीक सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात आठवीतील विद्यार्थिनींच्या स्वागत गीतांनी झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.आर. ननावरे यांनी केले. आभार एन.डी. खाडे सर यांनी मानले. कार्यक्रमास माजी मुख्याध्यापक भोसले, उपसरपंच केशव मुगदे, सुनील गंबरे, यशवंत गंबरे, ग्रामपंचायत सोसायटीचे पदाधिकारी व कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, सावंत यांचे नातेवाईक, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Sponsored
संबंधित बातम्या
फलटणच्या जयदीपची मुंबई आयआयटीत इंट्री
गिरीधर सायन्स अकॅडमीतील जयदीप अभिनव कदम या विद्यार्थ्याची मॅकेनिकल इंजिनिअरींगसाठी मुंबई येथील आयआयटीमध्ये प्रवेश मिळाला असल्याची माहिती अकॅडमीचे संचालक शिवराज भोईटे यांनी एका...
महत्मा फुले ज्ञानविकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा.रमेश आढाव
फलटण: सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महात्मा फुले ज्ञान विकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश तुकाराम आढाव यांची संस्थेच्या विशेष सर्वसाधारण सभेत...
दहावी परीक्षेत कै.संजय गांधी विद्यालयाचा ९२ टक्के निकाल
फलटण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत गुणवरे (ता.फलटण) येथील श्री.भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित...
दहावी परीक्षेत प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचा शंभर टक्के निकाल
फलटण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड...
फलटण तालुक्यातील दहावीचा निकाल ९४.९६ टक्के
फलटण: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून फलटण तालुक्यातील इयत्ता दहावीचा निकाल ९४.९६% लागला...
