सरपंच, ग्रामसेवकांच्या प्रामाणिक कामातून भारत महासत्ता होईल
फलटण : सरपंच आणि ग्रामसेवक गावच्या ग्रामपंचायतमधील महत्त्वाचे घटक असून गावचा विकास याच दोन घटकांवर अवलंबून असतो, त्यामुळे या दोघांमध्ये योग्य समन्वय, सकारात्मक विचार, प्रामाणिक काम करण्याची इच्छाशक्ती असेल तर भारत महासत्ता होवू शकतो, असे प्रतिपादन भास्करराव पेरे पाटील यांनी केले.
श्रीमंत मालोजीराजे व श्रीमंत शिवाजीराजे स्मृती महोत्सवातील आयोजित कार्यक्रमात "ग्रामविकासाचा आदर्श" या विषयावर पेरे पाटील बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ.बाळासाहेब शेंडे, श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठानचे सचिव माजी प्राचार्य विश्वासराव देशमुख, माजी प्राचार्य अरविंद निकम, डि.के.पवार, शिवाजीराव घोरपडे, राजीव नाईक निंबाळकर, अर्जुन रुपनवर उपस्थित होते.
राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने पिण्याचे स्वच्छ पाणी, फळांची झाडे लावणे, स्वच्छता, संस्कारी शिक्षण, ज्येष्ठांचा संभाळ करणे या पाच गोष्टी केल्या पाहिजेत. पाऊस गरजेपेक्षा जास्त पडतो. मात्र, पडलेल्या पावसाच्या पाण्याचे नियोजन योग्य पद्धतीने केले जात नसल्याचे सांगत राज्यकर्ते फक्त राजकारण करतात, खरा विकास करायचा असेल तर प्रत्येकाने काम केले पाहिजे, अशी अपेक्षा पेरे पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

राज्यातील २८ हजार ग्रामपंचायतींची गटारे, संडास उघड्यावर आहेत. चारशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी शौचालयाचा वापर केला होता म्हणजे शौचालय संकल्पना ४०० वर्षांपूर्वीची असल्याचे सांगत ग्रामपंचायतीने गावातील मुला-मुलींना संस्कारी शिक्षण द्यावे, चांगल्या गोष्टी समाजाला सांगाव्यात, शेतकरी जगण्यासाठी मदत करावी, प्रत्येक घरातून कचरा गोळा करावा, असे विविध सल्ले पेरे पाटील यांनी यावेळी दिले.
ज्याप्रमाणे राष्ट्र विकास व निर्मितीसाठी महापुरुषांनी त्रास घेतला त्याप्रमाणे ग्रामस्थांनी त्रास घ्यावा. आजपर्यंत राज्यात ७ हजार आमदार झाले. मात्र, यातील ७ गावंही चांगली नाहीत. त्यामुळे राज्यकर्ते काय करत होते, असा प्रश्न उपस्थित करत सर्वोच्च न्यायालयही ग्रामपंचायतचे अधिकार तोडू शकले नाहीत एवढे चांगले अधिकार ग्रामपंचायतींना आहेत. तुमचे निर्णय तुम्ही घ्या, गरिबांसाठी चांगले काम करा, गरिबांचे जगणे सुकर करा, महापुरुषांचे स्वप्न साकार करा, अशी विनंती पेरे पाटील यांनी यावेळी सरकारकडे केली.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्याहस्ते श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक डॉ.प्रा.संजय दीक्षित यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.नीलम देशमुख यांनी केले. कार्यक्रमास फलटण एज्युकेशन सोसायटी व श्रीमंत मालोजीराजे प्रतिष्ठानचे पदाधिकारी, ग्रामीण भागातील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Sponsored
संबंधित बातम्या
लेखणी, वाणी आणि कृतीचा दुर्मीळ संगम : प्रा. रमेश आढाव
ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, लेखक आणि सामाजिक चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते प्रा. रमेश तुकाराम आढाव यांची १ ऑगस्ट रोजी साजरी होणारी जयंती म्हणजे त्यांच्या कार्याचा, विचारांचा आणि समाजासाठी...
लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे
एकता दर्शन (फलटण) : पत्रकारिता क्षेत्रात येणार्या नव्या पिढीतील पत्रकारांचा अभ्यास प्रगल्भ असणे आवश्यक आहे. आपल्या परिसराची ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक पार्श्वभूमी यांची सखोल...
डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान
एकता दर्शन (फलटण) : शिक्षण क्षेत्रातील प्रतिथयश व्यक्तिमत्त्व डॉ.वैशाली विजय शिंदे यांची भारत गौरव रत्न श्री सन्मान कौन्सिल (भारत सरकारमान्य संस्था) यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या...
पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन
एकता दर्शन (फलटण) : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस...
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम
एकता दर्शन (फलटण) : श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग असलेल्या (आळंदी-पुणे-पंढरपूर-मोहोळ राष्ट्रीय महामार्ग) सातारा-सोलापूर जिल्हा सरहद्दीवरील साधूबुवा ओढ्यानजिक पुणे...
