धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विजयासाठी फलटणच्या विविध गटांनी कंबर कसली
फलटण : माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचाराला फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून विविध स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे राजकीय चित्र गेल्या काही दिवसांपासून दिसू लागले असून तालुक्यातील युवा नेत्यांनी त्यांच्या विजयासाठी कंबर कसली आहे.
फलटण तालुक्यातील शरद पवार यांना मानणारे विविध गट व दिग्गज नेते पायाला भिंगरी बांधून धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या विजयासाठी तालुकाभर फिरत आहेत. व्यक्तिगत गाठी-भेटी, घरगुती बैठका, घर टू घर मतदारांशी संपर्क, पदयात्रा, प्रचारसभा यावर सपाटा लावला असल्याचे तालुक्यातील सद्य चित्र आहे.
सह्याद्रीभैया कदम चिमणराव कदम गटाच्यावतीने तालुक्यातील मतदारांच्या दारोदारी भेटी देत आहेत. काँग्रेस पक्षाचे फलटण तालुकाध्यक्ष महेंद्रभैय्या सूर्यवंशी (बेडके) काँग्रेस पक्षाच्या टीमसह उमेदवारासोबत तालुक्याच्या ग्रामीण भागातील घर ना घर पिंजून काढत आहेत. चेतनभैय्या सुभाषराव शिंदे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.प्रतिभाताई शिंदे सुभाष शिंदे गटाच्यामाध्यमातून प्रचार करताना दिसत आहेत. शरद पवार यांचे कट्टर समर्थक व शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ निकम फलटण तालुक्यासह महाराष्ट्रातील विविध लोकसभा मतदारसंघात जावून सभा आणि पदयात्रांना हजेरी लावत आहेत. श्रीमंत रघुनाथराजे-नाईक निंबाळकर, श्रीमंत अनिकेतराजे, श्रीमंत विश्वजीतराजे, श्रीमंत सत्यजितराजे शहरातील प्रभाग निहाय दौरा करीत आहेत.

एकूणच शरद पवार यांच्या समर्थनार्थ श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या विजयासाठी युद्ध पातळीवर प्रचाराची यंत्रणा राबवली जात आहे.
Sponsored
संबंधित बातम्या
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
एकता दर्शन (बारामती) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीजवळ विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग...
समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन
एकता दर्शन (फलटण) : फलटण शहराच्या विकासासाठी जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला जाईल, असे सांगत फलटण शहराच्या...
षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही
एकता दर्शन (फलटण) : गेल्या ३४ वर्षांच्या सत्ताकाळात फलटणच्या विकासाऐवजी शहराच्या मातीचे नुकसान झाले असल्याने षडयंत्रकारी प्रवृत्तीला तालुक्यातील सत्तेतून दूर ठेवण्याची गरज होती, अशी...
ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी आज, गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील गजानन चौकात...
ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणूकीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेचा घोडा रोखत ऐतिहासिक विजय मिळवून भाजप-राष्ट्रवादी युतीने पालिकेवर सत्ता...
