ब्रेकिंग न्यूज

12:00 AM लेखणी, वाणी आणि कृतीचा दुर्मीळ संगम : प्रा. रमेश आढाव

12:00 AM महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन

12:00 AM लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे

12:00 AM डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान

12:00 AM पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन 

12:00 AM समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन

12:00 AM षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही

12:00 AM ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार 

12:00 AM संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम

12:00 AM साताऱ्यात रंगणार सरस्वतांचा सोहळा ! ९९व्या मराठी साहित्य संमेलनाची 'ग्रंथदिंडी' ठरणार ऐतिहासिक

12:00 AM ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन

12:00 AM फलटणचा नवा शेर...समशेर ! समशेरसिंह नाईक निंबाळकर फलटणचे नवे नगराध्यक्ष

12:00 AM डॉ.प्रसाद जोशी व प्रसन्न जोशी 'परशुराम' पुरस्काराने सन्मानित

12:00 AM मुख्यमंत्र्यांच्या यंत्रणेवर विश्वास नसेल तर रामराजेंनीच माझी चौकशी करावी : डॉ. मुंडे आत्महत्या प्रकरणी रणजितसिंहांचे थेट आव्हान 

12:00 AM फलटण सुरक्षित ठेवण्यासाठी निर्भयपणे मतदान करा : श्रीमंत रामराजे यांचे आवाहन 

12:00 AM रणजितसिंह यांचा डॉ.मुंडे प्रकरणाशी दुरान्वये संबंध नाही ; शहराच्या परिवर्तनासाठी सत्ता द्या : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

12:00 AM फलटण येथे महायुतीचा आज जाहीर मेळावा

12:00 AM फलटणमधील नामांकित व्यापारी व जैन बांधवांचा भाजपामध्ये जाहीर प्रवेश

12:00 AM युवा लेखक सचिन गोसावी यांना पितृशोक 

12:00 AM ज्येष्ठ समाजसेवक डॉ.बाबा आढावा यांचे निधन 

12:00 AM महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा

12:00 AM दहशतमुक्त, सुरक्षित, सुसंस्कृत फलटण नगरी उभी करणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

12:00 AM माजी खासदार रणजितसिंह यांच्या विचारधारेवर आमचा विश्वास : मा.सरपंच मुनिष जाधव

12:00 AM महाराष्ट्रातील मतमोजणी २१ डिसेंबरलाच ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

12:00 AM संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारी उत्साहात

12:00 AM माँ रुद्रात्मिका गुरुमाई यांच्या 'फकिरीयत' चित्रपटाचा फलटणमध्ये भव्य शुभारंभ

12:00 AM काँट्रॅक्टर विशाल राजमाने यांचा भाजपमध्ये प्रवेश 

12:00 AM नगरपालिका निवडणुकीचा निकाल विधानसभेच्या धर्तीवर जाहीर करावा

12:00 AM प्रचाराची गाणी १९ डिसेंबर पर्यंत वाजणार 

12:00 AM नगरपालिका प्रचारासाठी '२४ तास' वाढले

12:00 AM आयुष्यमान भारत योजनेत १० लाखांपर्यत विमा संरक्षण : सिद्धाली शहा

03:13 PM सचिन यादव यांना "शरद कृषी उद्योजक" पुरस्कार जाहिर

01:18 PM दि .२९ रोजी फलटणमध्ये रक्तदान शिबीर

12:19 PM दि.6 जानेवारी रोजी पोंभुर्ले येथे 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण 

08:39 AM बौद्ध उमेदवारीची खासदार शरद पवार यांच्याकडे मागणी

02:00 PM गॅलेक्सी संस्थेच्या कार्यक्षेत्र विस्तारास परवानगी

10:56 PM महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघामुळे लघु वृत्तपत्रांवरील अन्याय दूर

02:06 PM राजे गटाचे विश्वासू माणिकराव सोनवलकर भाजपमध्ये

12:10 AM बौद्ध समाजाच्या उमेदवारीला माझा विरोध नाही ; पक्षाकडे रीतसर मागणी करा

12:16 AM मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते संत शिरोमणी श्री नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा

01:33 AM सुरक्षारक्षक भरतीस बेरोजगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

12:26 PM फलटणच्या जयदीपची मुंबई आयआयटीत इंट्री

09:49 AM एकच निर्धार...बौध्द आमदार...अभियानास फलटण तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद

03:33 PM म्हसवडकरांच्या पिण्याच्या पाण्याची वणवण थांबण्यासाठी माण नदीत पाणी सोडावे

09:22 AM विधानसभा उमेदवारीसाठी बौद्ध समाज एकवटला

04:38 PM फलटणची मिताली जिल्हास्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत अव्वल

10:41 AM महत्मा फुले ज्ञानविकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा.रमेश आढाव

11:48 AM दहावी परीक्षेत कै.संजय गांधी विद्यालयाचा ९२ टक्के निकाल

10:19 AM दहावी परीक्षेत प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचा शंभर टक्के निकाल

12:21 AM फलटण तालुक्यातील दहावीचा निकाल ९४.९६ टक्के

Sunday, 02 August 2026

Follow Us:

प्राचार्य शिवाजीराव भोसले वक्तृत्वाच्या क्षेत्रातील विठ्ठल होते : डॉ. यशवंत पाटणे

Share This Article:
प्राचार्य शिवाजीराव भोसले वक्तृत्वाच्या क्षेत्रातील विठ्ठल होते : डॉ. यशवंत पाटणे

फलटण : पैसा, वेळ आणि ऊर्जा या जीवनाच्या खर्‍या गरजा आहेत. पण आजच्या समाजाची धावपळ केवळ पैसा मिळवण्यासाठी सुरू असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत समाजाला त्याच्या भौतिक गतीची जाणीव करून देण्याची जबाबदारी वक्त्यांवर आली आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी महाराष्ट्राचे संस्कार मन घडवले. वक्तृत्वाच्या क्षेत्रातील ते विठ्ठल होते, असे मत लेखक, वक्ते प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी व्यक्त केले.

एस.एम.जोशी फाउंडेशन सभागृह पुणे येथे प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीच्या वतीने यंदाचा प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान डॉ. यशवंत पाटणे यांना खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. श्रवणसंस्कृती समृद्ध करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल चतुरंग प्रतिष्ठान (मुंबई) व वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी केलेल्या कामाबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेचे कार्यवाह अमर शेंडे यांचा गौरव करण्यात आला. यावेळी समितीचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे चिरंजीव संजीव भोसले, स्नुषा सौ. रंजना भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डॉ. पाटणे म्हणाले, आज वाढता धर्मद्वेष बघितल्यानंतर समाजजीवन दुभंगत चालल्याचे दिसून येते. एका बाजूला अतिरेकी चंगळवाद बघितल्यानंतर संस्कृतीला आणि दुसरीकडे मूल्यहीन राजकारणामुळे राज्यघटनेला तडे जात आहेत. यामुळे पोटा-पाण्याचा प्रश्‍न दुर्लक्षित होत असल्याने अशा परिस्थितीत तरुणांनी कोणाकडे पहायचे? कोणाचा आदर्श घ्यायचा? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. आजचा समाज विवेकानंद आणि ज्ञानोबांच्या विचारांना विसरत चालला असून तो चंगळवादाकडे जास्त आकर्षित झाला असल्यामुळेच आज बोलणार्‍या वक्त्यांची समाजाला गरज असून अशा परिस्थितीतून समाजाला जागे करण्याची वेळ आली आहे. 

खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे वक्तृत्व म्हणजे मनन आणि चिंतन यांचा सुरेख मिलाप होता. त्यांच्या तालमीत तयार झालेले आणि त्यांचा वारसा समर्थपणे पुढे नेणारे प्राचार्य यशवंत पाटणे आणि प्रा. मिलिंद जोशी म्हणजे नव्या पिढीला मार्गदर्शन करणारे खंदे वक्त्याचे प्रतीक आहेत. मी आजही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा पाईक असून त्यांचे संस्कार व विचारांचे बोट सोडले नसल्यामुळेच मी उभा आहे. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील यांनी ते जिल्हाधिकारी असताना पुण्यातील साहित्य क्षेत्रातील आठवणींना उजाळा दिला.

प्रा. मिलींद जोशी म्हणाले, विचारांचा अखंड तेवणारा नंदादीप व वक्तृत्वाचा मानबिंदू म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते त्या प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी महाराष्ट्राचे समाजमन घडविण्याचे व महाराष्ट्राची श्रवणसंस्कृती समृद्ध करण्याचे कार्य आयुष्यभर मनोभावे केले. या श्रवणसंस्कृतीमध्येच आम्ही समृद्धपणे वाढलो. या वाटचालीत प्राचार्यांच्या वक्तृत्वाची शैली आम्ही आत्मसात केल्याची टीका आमच्यावर झाली असली तरी आम्हाला ती मान्य होती, कारण प्राचार्य शिवाजीराव भोसले हे प्रबोधनाचे विद्यापीठ असून या विद्यापीठातील मी एक विद्यार्थी आहे असेच मी आजही समजतो.

अमर शेंडे म्हणाले, वाचन संस्कृतीमध्ये योगदान दिल्याबद्दल माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याचा केलेला सन्मान हा निश्‍चितच प्रेरणादायी असून माझे मार्गदर्शक गुरुवर्य रवींद्र बेडकिहाळ यांच्या साठ वर्षांच्या पत्रकारिता, साहित्य, शैक्षणिक, व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाचा हा सन्मान आहे.

याप्रसंगी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकीहाळ, साहित्य परिषद पुणे शाखेच्या कोषाध्यक्ष सौ. सुनीताराजे पवार, सदस्य अ‍ॅड. प्रमोद आडकर, पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई, डोंबिवली येथील सतीश फौजदार यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनया देसाई यांनी केले. उपस्थितांचे स्वागत प्रा. मिलिंद जोशी व सौ. रंजना भोसले यांनी केले.

Sponsored
संबंधित बातम्या
साताऱ्यात रंगणार सरस्वतांचा सोहळा ! ९९व्या मराठी साहित्य संमेलनाची 'ग्रंथदिंडी' ठरणार ऐतिहासिक
साताऱ्यात रंगणार सरस्वतांचा सोहळा ! ९९व्या मराठी साहित्य संमेलनाची 'ग्रंथदिंडी' ठरणार ऐतिहासिक

एकता दर्शन (सातारा) : ऐतिहासिक सातारा नगरीत होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे काऊंटडाऊन सुरू झाले असून, या महासोहळ्यातील ग्रंथदिंडी व भव्य शोभायात्रा हे प्रमुख आकर्षण...

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा

एकता दर्शन (पोंभुर्ले, ता. देवगड) मराठी वृत्तपत्रसृष्टीत सलग ३४ वर्षे पत्रकारिता करणारे आणि त्यानंतर पुणे पत्रकार प्रतिष्ठान, पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूट मध्ये कार्यरत...

महाराष्ट्रातील मतमोजणी २१ डिसेंबरलाच ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
महाराष्ट्रातील मतमोजणी २१ डिसेंबरलाच ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

एकता दर्शन (फलटण) : राज्यात विविध ठिकाणी नगरपालिका व नगरपंचायतच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत, त्यांची मतमोजणी २१ डिसेंबर रोजीच करण्यात यावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे....

संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारी उत्साहात
संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारी उत्साहात

एकता दर्शन (फलटण) : संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने श्री क्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) सुमारे ५ हजार किलोमीटर लांब असणारी व ३१ दिवस...

दि.6 जानेवारी रोजी पोंभुर्ले येथे 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण 
दि.6 जानेवारी रोजी पोंभुर्ले येथे 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण 

फलटण : ‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी’तर्फे देण्यात येणार्‍या राज्यपातळीवरील प्रतिष्ठित 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री ना.नितेश...