सामाजिक कार्यात महिलांना प्रोत्साहन दिले पाहिजे : सौ.संजीवनी सावंत
एकता दर्शन : ग्रामीण भागातील समाज व्यवस्थेत काम करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देणे ही भारतीय परंपरा असून ती कायम राहण्यासाठी पुरुष वर्गाने पुढे आले पाहिजे. स्वातंत्र्य समता बंधुत्व याची जोपासना होण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत ग्रामीण भागातील साधन केंद्रे कार्यरत असून महामंडळाचे उपक्रम स्फूर्ती व प्रेरणा देणारे असल्याचे गौरवोद्गार नायब तहसीलदार सौ.संजीवनी सावंत यांनी काढले.
राज्य शासन अंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ संचलित ओम साई व ज्ञानज्योती साधन केंद्र, नव तेजस्विनी उद्यम विकास प्रकल्प यांच्यावतीने तालुक्यातील सामाजिक पुरुष कार्यकर्त्यांना सुधारक सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले याप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक नितीन किनेकर, म.आ.वि.महामंडळाचे जिल्हा समन्वयक विजय डोके, जिल्हा सहाय्यक अधिकारी अशोक चव्हाण, पंचायत समिती अधीक्षक जालिंदर शिंदे, तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय सरक, मुमताज पठाण, ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव आदी प्रमुख उपस्थित होते.
फलटण तालुक्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिला वर्गाला प्रोत्साहन देणे, त्यांच्या कामात सहकार्य व मार्गदर्शन करणे, महिलांचा सन्मान करणारे उपक्रम राबवणे अशा विविध कार्यक्रमात उल्लेखनीय काम करणाऱ्या तालुक्यातील ४६ गावातील सामाजिक पुरुष कार्यकर्त्यांना म.आ.वि.म.च्यावतीने तालुकास्तरावर "सुधारक सन्मान पुरस्कार" देऊन गौरविण्यात आले.
दरम्यान, जिल्हा समन्वयक विजय डोके यांनी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. नितीन किनेकर दत्तात्रय सरक किशन काशीद यांची भाषणे झाली.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत रेश्मा मोरे यांनी केले, प्रास्ताविक व सूत्रसंचालन ओम साई लोकसंचलित साधन केंद्राच्या सौ.शीला घाडगे त्यांनी केले. आभार सुवर्णा नाळे यांनी मानले. कार्यक्रमास तालुक्यातील विविध साधन केंद्राच्या महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Sponsored
संबंधित बातम्या
लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे
एकता दर्शन (फलटण) : पत्रकारिता क्षेत्रात येणार्या नव्या पिढीतील पत्रकारांचा अभ्यास प्रगल्भ असणे आवश्यक आहे. आपल्या परिसराची ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक पार्श्वभूमी यांची सखोल...
डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान
एकता दर्शन (फलटण) : शिक्षण क्षेत्रातील प्रतिथयश व्यक्तिमत्त्व डॉ.वैशाली विजय शिंदे यांची भारत गौरव रत्न श्री सन्मान कौन्सिल (भारत सरकारमान्य संस्था) यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या...
पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन
एकता दर्शन (फलटण) : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस...
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम
एकता दर्शन (फलटण) : श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग असलेल्या (आळंदी-पुणे-पंढरपूर-मोहोळ राष्ट्रीय महामार्ग) सातारा-सोलापूर जिल्हा सरहद्दीवरील साधूबुवा ओढ्यानजिक पुणे...
डॉ.प्रसाद जोशी व प्रसन्न जोशी 'परशुराम' पुरस्काराने सन्मानित
एकता दर्शन, फलटण : अखिल ब्राह्मण मध्यवर्ती (नाशिक) संस्थेच्यावतीने देण्यात येणारा व वेदमूर्ती कै.काशिनाथपंत वादे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'परशुराम पुरस्कार' फलटण येथील...
