महिलांनी वाचन संस्कृती जोपासावी : सचिन मोरे
एकता दर्शन : विविध क्षेत्रात घडणाऱ्या घटनांची माहिती महिलांनी घेतली पाहिजे असे सांगत मुलांना घडविण्यासाठी त्यांनी स्वतः वाचन संस्कृती जोपासणे गरजेचे असल्याचे मत राज्यस्तरीय प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे सातारा जिल्हाध्यक्ष सचिन मोरे यांनी व्यक्त केले.
पिंपरद ता.फलटण येथे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सरपंच सौ.स्वाती गणेश भगत, ग्रामविकास अधिकारी महादेव बळीप, ग्रामपंचायत सदस्या सौ.कल्पना उदयसिंह शिंदे, सौ. रेश्मा उमेश मोरे, आरोग्यसेविका सौ.पी.बी. जाधव आदी प्रमुख उपस्थित होते.
सचिन मोरे म्हणाले, सध्या ग्रामीण भागातील महिला चूल आणि मूल या मानसिकतेतून बाहेर पडत असून सामाजिक व राजकीय क्षेत्रात यशस्वी योगदान देत आहेत. स्पर्धेच्या युगात मुलांना घडवत असताना महिलांनी विविध क्षेत्रात घडणाऱ्या घटनांच्या माहितीचे संकलन करून वाचन करणे गरजेचे आहे. मिळालेल्या समान संधीच्या आधारे अनेक महिलांनी राजकीय क्षेत्रात मोठी भरारी घेतली असून सरपंच सौ.भगत यांनीही अभ्यासपूर्ण कामातून आपल्या गावाचा कारभार निरपेक्ष व उल्लेखनीय करावा.

सौ.स्वाती भगत म्हणाल्या, महिला आता प्रत्येक क्षेत्रात पुढे येत यशस्वी होत आहेत, त्या यशस्वी महिलांचा व महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या गावातील महिलांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात पुढे आले पाहिजे.
प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दरम्यान, गावातील महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी ग्रामविकास अधिकारी महादेव बळीप, आरोग्य सेविका सौ.प्रतिभा जाधव, सौ.अनिता नितीन नाळे आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार सौ.प्रतिभा जाधव यांनी व्यक्त केले.
Sponsored
संबंधित बातम्या
लेखणी, वाणी आणि कृतीचा दुर्मीळ संगम : प्रा. रमेश आढाव
ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, लेखक आणि सामाजिक चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते प्रा. रमेश तुकाराम आढाव यांची १ ऑगस्ट रोजी साजरी होणारी जयंती म्हणजे त्यांच्या कार्याचा, विचारांचा आणि समाजासाठी...
लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे
एकता दर्शन (फलटण) : पत्रकारिता क्षेत्रात येणार्या नव्या पिढीतील पत्रकारांचा अभ्यास प्रगल्भ असणे आवश्यक आहे. आपल्या परिसराची ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक पार्श्वभूमी यांची सखोल...
डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान
एकता दर्शन (फलटण) : शिक्षण क्षेत्रातील प्रतिथयश व्यक्तिमत्त्व डॉ.वैशाली विजय शिंदे यांची भारत गौरव रत्न श्री सन्मान कौन्सिल (भारत सरकारमान्य संस्था) यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या...
पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन
एकता दर्शन (फलटण) : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस...
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम
एकता दर्शन (फलटण) : श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग असलेल्या (आळंदी-पुणे-पंढरपूर-मोहोळ राष्ट्रीय महामार्ग) सातारा-सोलापूर जिल्हा सरहद्दीवरील साधूबुवा ओढ्यानजिक पुणे...
