संविधान दिंडीचे फलटणमध्ये स्वागत
एकता दर्शन : डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने आळंदीहून निघालेल्या संविधान दिंडीचे आगमन दि.२१ रोजी सकाळी झाल्यानंतर येथील डॉ.आंबेडकर चौकात संविधान दिंडीचे विविध सामाजिक संघटना व मान्यवरांनी स्वागत केले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर संविधान उद्देशिकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले. यावेळी आरपीआयचे मधुकर काकडे, विजय येवले, माजी नगरसेवक सनी अहिवळे, सुधीर अहिवळे, बापूसाहेब जगताप, प्राचार्य सावंत, ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव, अजय माळवे आदी मान्यवर उपस्थित होते.
बार्टी संस्थेच्या वतीने संविधान प्रत व उद्देशिकेचे उपस्थितांना वितरण करण्यात आले. याप्रसंगी बार्टीच्या अधिकाऱ्यांनी संविधान दिंडीचा उद्देश सांगुन शासन योजनेची माहिती देत जनजागृती विषयक कार्यक्रम विविध गीतांच्या माध्यमातून सादर केले.
Sponsored
संबंधित बातम्या
लेखणी, वाणी आणि कृतीचा दुर्मीळ संगम : प्रा. रमेश आढाव
ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, लेखक आणि सामाजिक चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते प्रा. रमेश तुकाराम आढाव यांची १ ऑगस्ट रोजी साजरी होणारी जयंती म्हणजे त्यांच्या कार्याचा, विचारांचा आणि समाजासाठी...
लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे
एकता दर्शन (फलटण) : पत्रकारिता क्षेत्रात येणार्या नव्या पिढीतील पत्रकारांचा अभ्यास प्रगल्भ असणे आवश्यक आहे. आपल्या परिसराची ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक पार्श्वभूमी यांची सखोल...
डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान
एकता दर्शन (फलटण) : शिक्षण क्षेत्रातील प्रतिथयश व्यक्तिमत्त्व डॉ.वैशाली विजय शिंदे यांची भारत गौरव रत्न श्री सन्मान कौन्सिल (भारत सरकारमान्य संस्था) यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या...
पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन
एकता दर्शन (फलटण) : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस...
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम
एकता दर्शन (फलटण) : श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग असलेल्या (आळंदी-पुणे-पंढरपूर-मोहोळ राष्ट्रीय महामार्ग) सातारा-सोलापूर जिल्हा सरहद्दीवरील साधूबुवा ओढ्यानजिक पुणे...
