वारकऱ्यांच्या सेवेसाठी फलटणकरांचे शेकडो हात पुढे
एकता दर्शन : माऊलींचा पालखी सोहळा फलटणच्या श्री प्रभू रामचंद्राच्या नगरीत एक दिवसाच्या मुक्कामासाठी पालखी तळावर विसावला असून पालखी सोहळ्यातील वारकरी पाहुण्यांची सेवा करताना फलटणकरांचे शेकडो हात पुढे झाल्याचे चित्र ठिकठिकाणी पाहायला मिळत होते.
डेक्कन चौक येथील नंदकुमार भोईटे मित्र मंडळ, शंकर मार्केट व्यापारी युवक मंडळ, युवक गणेशोत्सव मंडळ, रविवार पेठ मित्र मंडळ, नवमहाराष्ट्र गणेशोत्सव मंडळ, शुक्रवार पेठ तालीम मित्र मंडळ, क्रांतिसिंह नाना पाटील चौक, विनायक इंजिनिअरिंग वर्क्स, मार्केट यार्ड व्यापारी असोसिएशन, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक, श्रीराम बझार, लायन्स क्लब, शिवाजीनगर मित्र मंडळ, जायंट्स ग्रुप, लोकमान्य नर्सिंग होम, बिल्डर्स असोसिएशन यांच्यासह शहरातील विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक संस्था संघटनांच्या वतीने वारकऱ्यांना मोफत चहा, अल्पोपहार, जेवण, मोफत वैद्यकीय तपासणी व उपचार, मोफत औषधे, नेत्र तपासणी, चष्म्यांचे वाटप, मोफत केस कर्तनालय, चप्पल दुरुस्ती आदी विविध प्रकारच्या सेवा पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना देण्यात येत होत्या.
एक दिवस मुक्काम असल्याने वारकऱ्यांच्या निवासाची सोय, पाणीपुरवठा, वीजपुरवठा आदी सोयी सुविधा विविध ठिकाणी देण्यासाठी फलटणकरांचे शेकडो हात पुढे येताना दिसत होते. मानवी सेवा हीच ईश्वर सेवा या भावनेतून फलटणकर वारकऱ्यांची सेवा करताना दिसत होते.
Sponsored
संबंधित बातम्या
लेखणी, वाणी आणि कृतीचा दुर्मीळ संगम : प्रा. रमेश आढाव
ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, लेखक आणि सामाजिक चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते प्रा. रमेश तुकाराम आढाव यांची १ ऑगस्ट रोजी साजरी होणारी जयंती म्हणजे त्यांच्या कार्याचा, विचारांचा आणि समाजासाठी...
लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे
एकता दर्शन (फलटण) : पत्रकारिता क्षेत्रात येणार्या नव्या पिढीतील पत्रकारांचा अभ्यास प्रगल्भ असणे आवश्यक आहे. आपल्या परिसराची ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक पार्श्वभूमी यांची सखोल...
डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान
एकता दर्शन (फलटण) : शिक्षण क्षेत्रातील प्रतिथयश व्यक्तिमत्त्व डॉ.वैशाली विजय शिंदे यांची भारत गौरव रत्न श्री सन्मान कौन्सिल (भारत सरकारमान्य संस्था) यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या...
पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन
एकता दर्शन (फलटण) : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस...
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम
एकता दर्शन (फलटण) : श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग असलेल्या (आळंदी-पुणे-पंढरपूर-मोहोळ राष्ट्रीय महामार्ग) सातारा-सोलापूर जिल्हा सरहद्दीवरील साधूबुवा ओढ्यानजिक पुणे...
