ब्रेकिंग न्यूज

12:00 AM लेखणी, वाणी आणि कृतीचा दुर्मीळ संगम : प्रा. रमेश आढाव

12:00 AM महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन

12:00 AM लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे

12:00 AM डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान

12:00 AM पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन 

12:00 AM समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन

12:00 AM षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही

12:00 AM ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार 

12:00 AM संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम

12:00 AM साताऱ्यात रंगणार सरस्वतांचा सोहळा ! ९९व्या मराठी साहित्य संमेलनाची 'ग्रंथदिंडी' ठरणार ऐतिहासिक

12:00 AM ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन

12:00 AM फलटणचा नवा शेर...समशेर ! समशेरसिंह नाईक निंबाळकर फलटणचे नवे नगराध्यक्ष

12:00 AM डॉ.प्रसाद जोशी व प्रसन्न जोशी 'परशुराम' पुरस्काराने सन्मानित

12:00 AM मुख्यमंत्र्यांच्या यंत्रणेवर विश्वास नसेल तर रामराजेंनीच माझी चौकशी करावी : डॉ. मुंडे आत्महत्या प्रकरणी रणजितसिंहांचे थेट आव्हान 

12:00 AM फलटण सुरक्षित ठेवण्यासाठी निर्भयपणे मतदान करा : श्रीमंत रामराजे यांचे आवाहन 

12:00 AM रणजितसिंह यांचा डॉ.मुंडे प्रकरणाशी दुरान्वये संबंध नाही ; शहराच्या परिवर्तनासाठी सत्ता द्या : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

12:00 AM फलटण येथे महायुतीचा आज जाहीर मेळावा

12:00 AM फलटणमधील नामांकित व्यापारी व जैन बांधवांचा भाजपामध्ये जाहीर प्रवेश

12:00 AM युवा लेखक सचिन गोसावी यांना पितृशोक 

12:00 AM ज्येष्ठ समाजसेवक डॉ.बाबा आढावा यांचे निधन 

12:00 AM महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा

12:00 AM दहशतमुक्त, सुरक्षित, सुसंस्कृत फलटण नगरी उभी करणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

12:00 AM माजी खासदार रणजितसिंह यांच्या विचारधारेवर आमचा विश्वास : मा.सरपंच मुनिष जाधव

12:00 AM महाराष्ट्रातील मतमोजणी २१ डिसेंबरलाच ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

12:00 AM संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारी उत्साहात

12:00 AM माँ रुद्रात्मिका गुरुमाई यांच्या 'फकिरीयत' चित्रपटाचा फलटणमध्ये भव्य शुभारंभ

12:00 AM काँट्रॅक्टर विशाल राजमाने यांचा भाजपमध्ये प्रवेश 

12:00 AM नगरपालिका निवडणुकीचा निकाल विधानसभेच्या धर्तीवर जाहीर करावा

12:00 AM प्रचाराची गाणी १९ डिसेंबर पर्यंत वाजणार 

12:00 AM नगरपालिका प्रचारासाठी '२४ तास' वाढले

12:00 AM आयुष्यमान भारत योजनेत १० लाखांपर्यत विमा संरक्षण : सिद्धाली शहा

03:13 PM सचिन यादव यांना "शरद कृषी उद्योजक" पुरस्कार जाहिर

01:18 PM दि .२९ रोजी फलटणमध्ये रक्तदान शिबीर

12:19 PM दि.6 जानेवारी रोजी पोंभुर्ले येथे 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण 

08:39 AM बौद्ध उमेदवारीची खासदार शरद पवार यांच्याकडे मागणी

02:00 PM गॅलेक्सी संस्थेच्या कार्यक्षेत्र विस्तारास परवानगी

10:56 PM महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघामुळे लघु वृत्तपत्रांवरील अन्याय दूर

02:06 PM राजे गटाचे विश्वासू माणिकराव सोनवलकर भाजपमध्ये

12:10 AM बौद्ध समाजाच्या उमेदवारीला माझा विरोध नाही ; पक्षाकडे रीतसर मागणी करा

12:16 AM मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते संत शिरोमणी श्री नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा

01:33 AM सुरक्षारक्षक भरतीस बेरोजगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

12:26 PM फलटणच्या जयदीपची मुंबई आयआयटीत इंट्री

09:49 AM एकच निर्धार...बौध्द आमदार...अभियानास फलटण तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद

03:33 PM म्हसवडकरांच्या पिण्याच्या पाण्याची वणवण थांबण्यासाठी माण नदीत पाणी सोडावे

09:22 AM विधानसभा उमेदवारीसाठी बौद्ध समाज एकवटला

04:38 PM फलटणची मिताली जिल्हास्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत अव्वल

10:41 AM महत्मा फुले ज्ञानविकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा.रमेश आढाव

11:48 AM दहावी परीक्षेत कै.संजय गांधी विद्यालयाचा ९२ टक्के निकाल

10:19 AM दहावी परीक्षेत प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचा शंभर टक्के निकाल

12:21 AM फलटण तालुक्यातील दहावीचा निकाल ९४.९६ टक्के

Sunday, 02 August 2026

Follow Us:

'धोबी पछाड' कथासंग्रह मराठी साहित्याची उंची वाढवेल

Share This Article:
'धोबी पछाड' कथासंग्रह मराठी साहित्याची उंची वाढवेल

फलटण : लेखक व साहित्यिक शिवाजीराव घोरपडे यांनी लिहिलेल्या 'धोबी पछाड' या ग्रामीण विनोदी कथा संग्रहाने मराठी साहित्यात आगमन केले असून हा कथासंग्रह साहित्य क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करेल असे सांगत 'धोबी पछाड' कथासंग्रह मराठी साहित्याची उंची वाढवेल असे मत पुणे येथील प्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक बबनराव पोतदार यांनी व्यक्त केले.

शिवाजीराव घोरपडे-गजेंद्रगडकर लिखित 'धोबी पछाड' या कथासंग्रहाचा प्रकाशन समारंभ येथील महाराजा मंगल कार्यालयात पार पडला, यावेळी पोतदार बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य विश्वासराव देशमुख होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य रविंद्र बेडकीहाळ, प्रसिद्ध लेखिका समाजशास्त्रज्ञ डॉ.अश्विनी घोरपडे-गजेंद्रगडकर, लेखक शिवाजीराव घोरपडे, सत्यजित घोरपडे, सौ.धनश्री घोरपडे उपस्थित होते.

श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, शिवाजीराव घोरपडे श्रीराम कारखान्यात प्रतिकूल परिस्थितीत काम करीत होते. श्रीमंत शिवाजीराजे यांच्या समवेत असणाऱ्या व्यक्तींपैकी ते एक होते. त्यांनी कथासंग्रह लिहिल्यामुळे त्यांचे साहित्य क्षेत्रातील आगमन व लेखन इतरांना आदर्शवत ठरेल. यापुढे चांगल्या लिखाणासह दर्जेदार साहित्याची निर्मिती त्यांच्या हातून होईल. त्यांचा कथासंग्रह साहित्य क्षेत्राला समृद्ध करण्यासाठी उपयुक्त ठरेल.

रविंद्र बेडकीहाळ म्हणाले, साहित्य हे देशातील विविध क्षेत्रांना ऊर्जा आणि प्रेरणा देते. 'धोबी पछाड' याला अपवाद राहणार नाही. समाज व राजकारण यांना दिशा देण्याचे काम साहित्य करीत असते. साहित्यातील सर्व प्रकार लिहिले पाहिजेत. मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून आम्ही अनेक साहित्यिकांना घडविले आहे. शिवाजीराव घोरपडे यांना आम्ही मराठी साहित्य परिषदेत आजच आमंत्रित करीत आहोत.

अध्यक्षीय भाषणात मा.प्राचार्य देशमुख म्हणाले, महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा सहवास लाभलेले फलटण भूमीतील अनेक लोक आपापल्या क्षेत्रात काम करीत आहेत. आजही आम्ही त्यांच्या विचारधारेवर चालत आहोत. फलटणला श्रीमंत घराण्याचा मोठा वारसा आहे. या शहरातील अनेक विचारवंत, लेखक, साहित्यिक यांनी आपल्या लेखनशैलीतून मार्गदर्शन केले तोच वसा आणि वारसा पुढे जाताना दिसतोय. साहित्य निर्माण व्हावे, साहित्यातून समाजाला दिशा मिळावी, तरुणांना मार्गदर्शन व्हावे, या सर्व कृती फलटण शहर व तालुक्यात घडताना दिसत आहेत. 'धोबी पछाड' कथासंग्रह सर्वांनी वाचावा व लेखकाला आशीर्वाद द्यावेत.

वाचन, मनन, चिंतन, व्यासंग आपला अंगभूत गुण असल्यामुळे आपल्या हातून लेखन होत गेले. ग्रामीण भागाचे सूक्ष्म निरीक्षण व परीक्षण लेखनास उपयुक्त ठरले आणि यातूनच पुस्तकाने आकार घेतला. प्रसिद्धी माध्यमातील अनेक मित्रांनी माझ्या कथारुपी लेखनाला प्रसिद्धी दिल्यामुळे आणखी लिहिण्याची प्रेरणा आणि ऊर्जा मिळाली. लेखन करतेवेळी घरातील वातावरण लेखनास पोषक ठेवण्यासाठी कुटुंबाचे सहकार्य मिळाले. साहित्य क्षेत्रातील मित्रांनी मार्गदर्शन केले, याचा परिपाक म्हणजे 'धोबी पछाड'ची निर्मिती असल्याच्या भावना लेखक शिवाजीराव घोरपडे यांनी यावेळी व्यक्त केल्या.

दरम्यान, लेखकाची नात कु.दिव्या आणि ज्येष्ठ सुपुत्र सत्यजित घोरपडे यांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या.

प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्याहस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर 'धोबी पछाड' कथासंग्रहाचे प्रकाशन श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्याहस्ते करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत घोरपडे कुटुंबाच्यावतीने करण्यात आले. प्रास्ताविक डॉ.प्रा.अशोक शिंदे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ.प्रा.संजय दीक्षित यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा.नीलम देशमुख यांनी केले. आभार सत्यजित घोरपडे यांनी मानले. प्रकाशन समारंभास फलटण एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी, मराठी साहित्य परिषदेचे सदस्य, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sponsored
संबंधित बातम्या
लेखणी, वाणी आणि कृतीचा दुर्मीळ संगम : प्रा. रमेश आढाव
लेखणी, वाणी आणि कृतीचा दुर्मीळ संगम : प्रा. रमेश आढाव

ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, लेखक आणि सामाजिक चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते प्रा. रमेश तुकाराम आढाव यांची १ ऑगस्ट रोजी साजरी होणारी जयंती म्हणजे त्यांच्या कार्याचा, विचारांचा आणि समाजासाठी...

लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे
लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे

एकता दर्शन (फलटण) : पत्रकारिता क्षेत्रात येणार्‍या नव्या पिढीतील पत्रकारांचा अभ्यास प्रगल्भ असणे आवश्यक आहे. आपल्या परिसराची ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक पार्श्वभूमी यांची सखोल...

डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान
डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान

एकता दर्शन (फलटण) : शिक्षण क्षेत्रातील प्रतिथयश व्यक्तिमत्त्व डॉ.वैशाली विजय शिंदे यांची भारत गौरव रत्न श्री सन्मान कौन्सिल (भारत सरकारमान्य संस्था) यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या...

पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन 
पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन 

एकता दर्शन (फलटण) : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस...

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम

एकता दर्शन (फलटण) : श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग असलेल्या (आळंदी-पुणे-पंढरपूर-मोहोळ राष्ट्रीय महामार्ग) सातारा-सोलापूर जिल्हा सरहद्दीवरील साधूबुवा ओढ्यानजिक पुणे...