जाईन गे माय तया पंढरपुरा। सातारा जिल्ह्याचा माऊलींना निरोप
अवघाचि संसार सुखाचा करीन। आनंदे भरीन तिन्हीं लोक ॥ जाईन गे माय तया पंढरपुरा। भेटेन माहेरा आपुलिया ॥
या अंभगवाणी प्रमाणे विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ असलेला संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा लाखो वैष्णव सागरासह फलटण तालुक्यातील अखेरचा मुक्काम आटोपून दि.२३ रोजी सकाळी बरड पालखी तळावरून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाला.
हरिनामाचा जयघोष, टाळ मृदूंगाचा गजर करत नाचत आनंद व्यक्त करीत विठ्ठलाकडे निघालेल्या माऊलींचा पालखी सोहळा बरडमधील गावकऱ्यांचा निरोप घेत सोलापूर जिल्ह्याच्या दिशेने मार्गस्थ झाला. दरम्यान बरड गाव व परिसरातील युवक, अबालवृद्ध, महिला, पुरूष अशा हजारो माऊली भक्तांसह फलटण पूर्व भागातील विविध संस्थाच्या पदाधिकाऱ्यांनी पालखी रथातील माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेवुन पालखी सोहळ्याला निरोप दिला.

पालखी सोहळा राजुरी गावच्या हद्दीतील साधु बुवा मंदिर परिसरात विसाव्यासाठी थांबविण्यात आला. या ठिकाणी पालखी सोहळा थांबविण्यात येत असल्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. यावेळी राजुरी पंचक्रोशीतील माऊली भक्तांनी माऊलींच्या दर्शनासाठी प्रंचड गर्दी करीत माऊलींच्या दर्शनाचा लाभ घेतला.
साधु बुवा मंदिर परिसरातील विसाव्यानंतर पालखी सोहळा पुढे मार्गस्थ झाला. चार-पाच किलोमीटर अंतरावर पालखी सोहळा पुढे सरकल्यानंतर सातारा जिल्ह्याची भौगोलिक हद्द समाप्त होते व सोलापूर जिल्ह्याची हद्द सुरू होते. सातारा जिल्हाच्या अखेरच्या सरहद्दीवर पालखी सोहळा पोहचल्यानंतर सातारा जिल्ह्यातील प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांच्यावतीने पालखी सोहळ्यास निरोप देण्यात आला. दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील प्रशासन व अन्य लोकप्रतिनिधींच्या वतीने पालखी सोहळ्याचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
Sponsored
संबंधित बातम्या
लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे
एकता दर्शन (फलटण) : पत्रकारिता क्षेत्रात येणार्या नव्या पिढीतील पत्रकारांचा अभ्यास प्रगल्भ असणे आवश्यक आहे. आपल्या परिसराची ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक पार्श्वभूमी यांची सखोल...
डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान
एकता दर्शन (फलटण) : शिक्षण क्षेत्रातील प्रतिथयश व्यक्तिमत्त्व डॉ.वैशाली विजय शिंदे यांची भारत गौरव रत्न श्री सन्मान कौन्सिल (भारत सरकारमान्य संस्था) यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या...
पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन
एकता दर्शन (फलटण) : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस...
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम
एकता दर्शन (फलटण) : श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग असलेल्या (आळंदी-पुणे-पंढरपूर-मोहोळ राष्ट्रीय महामार्ग) सातारा-सोलापूर जिल्हा सरहद्दीवरील साधूबुवा ओढ्यानजिक पुणे...
डॉ.प्रसाद जोशी व प्रसन्न जोशी 'परशुराम' पुरस्काराने सन्मानित
एकता दर्शन, फलटण : अखिल ब्राह्मण मध्यवर्ती (नाशिक) संस्थेच्यावतीने देण्यात येणारा व वेदमूर्ती कै.काशिनाथपंत वादे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'परशुराम पुरस्कार' फलटण येथील...
