संघर्ष करण्याची क्षमता युवा पिढीत असली पाहिजे : भरत शिंदे उर्फ बाळासाहेब
एकता दर्शन : देशातील महापुरुषांचे आचार विचार संस्कार आणि कार्यकर्तृत्व अधुनिक युवा पिढीला दिशादर्शक असून युवकांनी महापुरुषांच्या विचारांचे आचरण प्रत्यक्ष आपल्या जीवनप्रवासात केल्यास देशाच्या समाजव्यवस्थेत एकता व अखंडता सुखाने नांदेल असा विश्वास व्यक्त करीत महापुरुषांनी युवा अवस्थेत क्रांती केली देश घडविला क्रांती तरुणपणातच करता येते मात्र त्याग व संघर्ष करण्याची क्षमता युवा पिढीत असली पाहिजे असे प्रतिपादन "चांडाळ चौकडीच्या करामती" या विनोदी वेबसिरिज मधील कलाकार भरत शिंदे उर्फ बाळासाहेब यांनी केले.
दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित संत गाडगेबाबा व्याख्यानमालेत "आजचे युवक दशा व दिशा" या विषयावर भरत शिंदे बोलत होते. यावेळी सरपंच सौ.भावना माणिकराव सोनवलकर, ठाणे येथील गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोपट नाळे, ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव, चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसिरीज मधील कलाकार रामभाऊ जगताप, सुभाष मदने, प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन बलवंत पाटील, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अरगडे, उजनी प्रकल्पाचे रावसाहेब मोरे यांच्यासह आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
युवकांनी क्रांतिकारकांचा आदर्श घ्यावा
युवक राष्ट्राचा कणा आणि बाणा आहे राष्ट्र घडविण्यासाठी युवकांनीच पुढे आले पाहिजे. आजचा ग्रामीण युवक गावातल्या पारावर, मोबाईलमधील ऑनलाईन गेमिंग व सोशल मिडियावरील मनोरंजन करणाऱ्या साधनात अडकला असल्याचे भयावह चित्र असल्याची खंत व्यक्त करीत युवकांनी क्रांतिकारकांचा आदर्श घेत महिलांचा आदर करण्याची प्रेरणा महापुरुषांकडून घ्यावी अशी अपेक्षा शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.
राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण
दरम्यान, प्रतिष्ठानच्यावतीने भरत शिंदे यांना राज्यस्तरीय समाजरत्न, सुभाष मदने व रामभाऊ जगताप यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत सोनवलकर यांनी केले. सुत्रसंचालन विजयकुमार नाळे यांनी केले. कार्यक्रमास पोलीस पाटील संघटना पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष हनुमंतराव सोनवलकर, दुधेबावी प्रतिष्ठानचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सोसायटीचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गौतमी पाटील असत्या तर बसायला खुर्च्या पुरल्या नसत्या
गौतमी पाटील यांचा कार्यक्रम असता तर युवकांची तुडुंब गर्दी झाली असती, मात्र विचार देणाऱ्या व्याख्यानमालांना युवकांचा प्रतिसाद कमी असल्याचे आपल्याला जाणवते. ज्यांच्यासाठी आपण व्याख्यान द्यायला आलो ते युवकच घरी बसले असतील तर देशाचं भवितव्य काय राहणार असा सवाल करीत पालकांनी आपल्या मुलांना योग्य-अयोग्य काय याची शिकवण निटपणे देणे अनिवार्य आहे. युवकांनी व्यसन, आळस, भांडण आणि जुगार यापासून अलिप्त राहिले पाहिजे असा सल्लाही शिंदे यांनी यावेळी दिला.
Sponsored
संबंधित बातम्या
लेखणी, वाणी आणि कृतीचा दुर्मीळ संगम : प्रा. रमेश आढाव
ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, लेखक आणि सामाजिक चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते प्रा. रमेश तुकाराम आढाव यांची १ ऑगस्ट रोजी साजरी होणारी जयंती म्हणजे त्यांच्या कार्याचा, विचारांचा आणि समाजासाठी...
लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे
एकता दर्शन (फलटण) : पत्रकारिता क्षेत्रात येणार्या नव्या पिढीतील पत्रकारांचा अभ्यास प्रगल्भ असणे आवश्यक आहे. आपल्या परिसराची ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक पार्श्वभूमी यांची सखोल...
डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान
एकता दर्शन (फलटण) : शिक्षण क्षेत्रातील प्रतिथयश व्यक्तिमत्त्व डॉ.वैशाली विजय शिंदे यांची भारत गौरव रत्न श्री सन्मान कौन्सिल (भारत सरकारमान्य संस्था) यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या...
पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन
एकता दर्शन (फलटण) : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस...
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम
एकता दर्शन (फलटण) : श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग असलेल्या (आळंदी-पुणे-पंढरपूर-मोहोळ राष्ट्रीय महामार्ग) सातारा-सोलापूर जिल्हा सरहद्दीवरील साधूबुवा ओढ्यानजिक पुणे...
