राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचा जल्लोष ; शरद पवारांचे आभार
बारामती: बुधवार दि. २० जुलै रोजी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने बांठिया आयोगाच्या शिफारसींना मान्यता दिल्याच्या पार्श्वभूमीवर बारामती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल व येथील नागरिकांनी एकत्र येत फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा केला.
बांठिया आयोगाने ओबीसींना २७ टक्के राजकीय आरक्षण देण्याची शिफारस केली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्या शिफारसींना मान्यता देत पुढील दोन आठवड्यात निवडणुका घोषित करण्याचे आदेश दिले. यावेळी ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करून अस्वस्थ असलेल्या समाजाला न्याय दिल्याबद्दल पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे कार्याध्यक्ष नितीनदादा शेंडे यांनी आदरणीय शरद पवार यांचे आभार मानून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले.
याप्रसंगी पुणे जिल्हा समता परिषदेचे अध्यक्ष अनिल लडकत, काँग्रेस (महाराष्ट्र) ओबीसी सेलचे उपाध्यक्ष रोहित बनकर, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे अध्यक्ष दादा राम झगडे, शहराध्यक्ष स्वप्निल भागवत, महिला तालुकाध्यक्ष सौ. वनिताताई बनकर, सौ. सीमाताई पांढरे, माळेगाव साखर कारखान्याचे संचालक सागर भोंगळे, शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे विश्वस्त दादा थोरात, बाळासाहेब चव्हाण पाटील, निलेश टिळेकर, बारामती समता परिषदेचे अध्यक्ष सोनू लोणकर, सागर देवकाते पाटील, तनवीर इनामदार, रियाज शेख, हरून बाबा शेख, नितीन थोरात, गणेश पवार, मोहन शेठ भटियानी, माऊली काळे, लालासाहेब गावडे, विशाल गायकवाड, नानासो गावडे, बाळासाहेब जराड आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
Sponsored
संबंधित बातम्या
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
एकता दर्शन (बारामती) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीजवळ विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग...
समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन
एकता दर्शन (फलटण) : फलटण शहराच्या विकासासाठी जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला जाईल, असे सांगत फलटण शहराच्या...
षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही
एकता दर्शन (फलटण) : गेल्या ३४ वर्षांच्या सत्ताकाळात फलटणच्या विकासाऐवजी शहराच्या मातीचे नुकसान झाले असल्याने षडयंत्रकारी प्रवृत्तीला तालुक्यातील सत्तेतून दूर ठेवण्याची गरज होती, अशी...
ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी आज, गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील गजानन चौकात...
ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणूकीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेचा घोडा रोखत ऐतिहासिक विजय मिळवून भाजप-राष्ट्रवादी युतीने पालिकेवर सत्ता...
