ब्रेकिंग न्यूज

12:00 AM लेखणी, वाणी आणि कृतीचा दुर्मीळ संगम : प्रा. रमेश आढाव

12:00 AM महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन

12:00 AM लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे

12:00 AM डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान

12:00 AM पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन 

12:00 AM समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन

12:00 AM षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही

12:00 AM ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार 

12:00 AM संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम

12:00 AM साताऱ्यात रंगणार सरस्वतांचा सोहळा ! ९९व्या मराठी साहित्य संमेलनाची 'ग्रंथदिंडी' ठरणार ऐतिहासिक

12:00 AM ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन

12:00 AM फलटणचा नवा शेर...समशेर ! समशेरसिंह नाईक निंबाळकर फलटणचे नवे नगराध्यक्ष

12:00 AM डॉ.प्रसाद जोशी व प्रसन्न जोशी 'परशुराम' पुरस्काराने सन्मानित

12:00 AM मुख्यमंत्र्यांच्या यंत्रणेवर विश्वास नसेल तर रामराजेंनीच माझी चौकशी करावी : डॉ. मुंडे आत्महत्या प्रकरणी रणजितसिंहांचे थेट आव्हान 

12:00 AM फलटण सुरक्षित ठेवण्यासाठी निर्भयपणे मतदान करा : श्रीमंत रामराजे यांचे आवाहन 

12:00 AM रणजितसिंह यांचा डॉ.मुंडे प्रकरणाशी दुरान्वये संबंध नाही ; शहराच्या परिवर्तनासाठी सत्ता द्या : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

12:00 AM फलटण येथे महायुतीचा आज जाहीर मेळावा

12:00 AM फलटणमधील नामांकित व्यापारी व जैन बांधवांचा भाजपामध्ये जाहीर प्रवेश

12:00 AM युवा लेखक सचिन गोसावी यांना पितृशोक 

12:00 AM ज्येष्ठ समाजसेवक डॉ.बाबा आढावा यांचे निधन 

12:00 AM महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा

12:00 AM दहशतमुक्त, सुरक्षित, सुसंस्कृत फलटण नगरी उभी करणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

12:00 AM माजी खासदार रणजितसिंह यांच्या विचारधारेवर आमचा विश्वास : मा.सरपंच मुनिष जाधव

12:00 AM महाराष्ट्रातील मतमोजणी २१ डिसेंबरलाच ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

12:00 AM संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारी उत्साहात

12:00 AM माँ रुद्रात्मिका गुरुमाई यांच्या 'फकिरीयत' चित्रपटाचा फलटणमध्ये भव्य शुभारंभ

12:00 AM काँट्रॅक्टर विशाल राजमाने यांचा भाजपमध्ये प्रवेश 

12:00 AM नगरपालिका निवडणुकीचा निकाल विधानसभेच्या धर्तीवर जाहीर करावा

12:00 AM प्रचाराची गाणी १९ डिसेंबर पर्यंत वाजणार 

12:00 AM नगरपालिका प्रचारासाठी '२४ तास' वाढले

12:00 AM आयुष्यमान भारत योजनेत १० लाखांपर्यत विमा संरक्षण : सिद्धाली शहा

03:13 PM सचिन यादव यांना "शरद कृषी उद्योजक" पुरस्कार जाहिर

01:18 PM दि .२९ रोजी फलटणमध्ये रक्तदान शिबीर

12:19 PM दि.6 जानेवारी रोजी पोंभुर्ले येथे 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण 

08:39 AM बौद्ध उमेदवारीची खासदार शरद पवार यांच्याकडे मागणी

02:00 PM गॅलेक्सी संस्थेच्या कार्यक्षेत्र विस्तारास परवानगी

10:56 PM महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघामुळे लघु वृत्तपत्रांवरील अन्याय दूर

02:06 PM राजे गटाचे विश्वासू माणिकराव सोनवलकर भाजपमध्ये

12:10 AM बौद्ध समाजाच्या उमेदवारीला माझा विरोध नाही ; पक्षाकडे रीतसर मागणी करा

12:16 AM मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते संत शिरोमणी श्री नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा

01:33 AM सुरक्षारक्षक भरतीस बेरोजगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

12:26 PM फलटणच्या जयदीपची मुंबई आयआयटीत इंट्री

09:49 AM एकच निर्धार...बौध्द आमदार...अभियानास फलटण तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद

03:33 PM म्हसवडकरांच्या पिण्याच्या पाण्याची वणवण थांबण्यासाठी माण नदीत पाणी सोडावे

09:22 AM विधानसभा उमेदवारीसाठी बौद्ध समाज एकवटला

04:38 PM फलटणची मिताली जिल्हास्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत अव्वल

10:41 AM महत्मा फुले ज्ञानविकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा.रमेश आढाव

11:48 AM दहावी परीक्षेत कै.संजय गांधी विद्यालयाचा ९२ टक्के निकाल

10:19 AM दहावी परीक्षेत प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचा शंभर टक्के निकाल

12:21 AM फलटण तालुक्यातील दहावीचा निकाल ९४.९६ टक्के

Sunday, 02 August 2026

Follow Us:

रामराजेंना आता दिल्लीला जावेच लागेल ; जयंत पाटील

Share This Article:
रामराजेंना आता दिल्लीला जावेच लागेल ; जयंत पाटील

एकता दर्शन : फलटण नगरपालिका नगराध्यक्ष ते विधान परिषद सभापती अशा प्रदीर्घ राजकीय प्रवासात रामराजे यांनी समाजउपयोगी काम केले. यापुढे राज्याचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना देशपातळीवर जावे लागणार आहे. अशा अनुभवसंपन्न सक्षम नेत्याला दिल्लीच्या संसदेत पाठविण्यासाठी राष्ट्रवादीचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून मी प्रयत्न करेन अजितदादा सुद्धा याकडे दुर्लक्ष करणार नसल्याचा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित येथील मुधोजी क्लबच्या मैदानावर आयोजित केलेल्या ''अभिष्टचिंतन सोहळ्यात" जयंत पाटील बोलत होते. यावेळी महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार, सत्कारमूर्ती श्रीमंत रामराजे, माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर, आ.शशिकांत शिंदे, आ.बाळासाहेब पाटील, आ.मकरंद पाटील, आ.अनिल भुसारा, प्रभाकर घार्गे, जिल्हा बँक अध्यक्ष नितीन पाटील, प्रभाकर देशमुख, सुनील माने, अनिल देसाई, ज्येष्ठ नेते सुभाष शिंदे, दिलीप भोसले, श्रीमंत संजीवराजे, श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, अनिकेतराजे, सत्यजितराजे, विश्वजीतराजे, डी.के. पवार, श्रीमंत सुभद्राराजे, श्रीमंत शिवांजलीराजे, रेश्मा भोसले, ॲड.रमेशचंद्र भोसले, नितीनभैय्या भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

दुष्काळावर मात करणारे नेतृत्व म्हणून रामराजेंकडे पाहिले जाते याचा साक्षीदार मी स्वतः आहे तत्कालीन सरकारला कृष्णा खोरे महामंडळ स्थापन करायला त्यांनीच भाग पाडले असल्याचे सांगत खरा भगीरथ रामराजेच आहेत. राजेशाही त्यांनी कधी कुणाला दाखविली नाही. सतत शांत आणि संयमाने ते राज्यात काम करत राहिले. एक सक्षम कर्तृत्ववान नेता राज्याला मिळाला. अशा अनुभवसंपन्न नेत्याने राज्यात भरपूर काम केले आहे आता त्यांना दिल्लीला जावेच लागेल, यासाठी शरद पवार अजितदादा यांचेसह आपण सर्वांनी संधी दिली पाहिजे अशी अपेक्षा पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

अजितदादा म्हणाले, मी ज्यावेळी खासदार झालो त्याचवेळी रामराजे फलटणचे नगराध्यक्ष झाले. रामराजे आमदार झाल्यानंतर फलटणच्या विकासाला चालना मिळाली. राजघराण्याचे राज्याच्या समाजकारण आणि राजकारणात मोठे योगदान असून श्रीमंत मालोजीराजे यांनी राज्य विकासात मोठी साथ दिल्याची नोंद इतिहासात असल्याचे सांगत अपक्ष आमदारांचे नेतृत्व करीत रामराजेंनी कृष्णाखोरे प्रत्यक्ष अस्तित्वात आणले. "५० खोके आणि एकदम ओके" असे न म्हणता दुष्काळी भागातील शेती पाण्याचा प्रश्न सोडविला. या भागातील शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नावरच त्यांनी तत्कालीन सरकारला पाठिंबा दिला होता तद्नंतर सातारा जिल्हा राष्ट्रवादीमय केला. धोम बलकवडी निरा देवघर धरणांच्या कामात त्याचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. कृष्णा खोऱ्यातील पाणी भीमा खोऱ्यात आणण्याचे कामही रामराजे यांच्या नेतृत्वात दिसुन आले असल्याचे पवार यांनी यावेळी निदर्शनास दिले. सध्याचे सरकार सुसंस्कृत महाराष्ट्राला कलंक लावण्याचे काम करीत आहे. राज्यातील महागाई, बेरोजगारी, अवकाळीतील पिडीत शेतकऱ्यांना मदत करणारे सरकार आणण्यासाठी सर्वांनीच कामाला लागावे असे सांगत जयंतराव पाटील यांनी रामराजे यांना दिल्लीला पाठविण्यासाठी केलेल्या सुचनेला मी अनुमोदन देत असल्याचे अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

सत्काराला उत्तर देताना श्रीमंत रामराजे म्हणाले, दुष्काळी भागातील शेती पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आपण सुरुवातीपासूनच आग्रही होतो. कृष्णा खोरे महामंडळ प्रत्यक्ष कृतीत आणण्यात यश मिळाले. खरंतर आज तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. दुष्काळी भागाला वरदान ठरणारी धरण झाली, प्रकल्पग्रस्तांची साथ मिळाली. त्यांचे प्रश्न सुटले. पाणीप्रश्नासह अन्य पायाभूत सुविधांचा विकास झाला. युती सरकारच्या काळात मंत्रीपद मागात बसलो असतो तर कृष्णाखोरे प्रकल्प अस्तित्वात आलाच नसता असे सांगत फलटणसह जिल्ह्याच्या विकासात शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाल्यामुळेच आपण सर्वकाही करू शकलो. आज आपण केलेल्या कामाचे श्रेय कोणीही घेत असेल तर ते जनतेलाच मान्य होणार नाही. तालुक्यातील आम जनता माझी राजकीय शक्ती आणि ताकद आहे या ताकदीवरच खूप काही आम्ही करू शकतो. आम्ही तिघे भाऊ एकत्र आलो म्हणूनच यशस्वी समाजकारण आणि राजकारण झाले. आता खूप काही केले असून माढा लोकसभा मतदारसंघातून एकतरी नाईक-निंबाळकर देशाच्या लोकसभेत पाठविणार असल्याची अपेक्षा रामराजे यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी आ.शशीकांत शिंदे, आ.बाळासाहेब पाटील, आ.मकरंद पाटील, बाळासाहेब सोळसकर आदींची भाषणे झाली.

प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीमंत रामराजे यांची ग्रंथ, जल, व धान्य तुला करण्यात आली. यानंतर अजित पवार व जयंत पाटील यांचेहस्ते रामराजेंचा कृष्णेच्या पाण्याचा कलश, मानपत्र देवुन यथोचित सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक आमदार दीपक चव्हाण यांनी केले. मानपत्राचे वाचन रविंद्र बेडकीहाळ यांनी केले. आभार सुभाषराव शिंदे यांनी मानले. सुत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले.

कार्यक्रमास राज्याच्या विविध भागांतील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sponsored
संबंधित बातम्या
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन

एकता दर्शन (बारामती) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीजवळ विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग...

समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन
समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन

एकता दर्शन (फलटण) : फलटण शहराच्या विकासासाठी जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला जाईल, असे सांगत फलटण शहराच्या...

षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही
षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही

एकता दर्शन (फलटण) : गेल्या ३४ वर्षांच्या सत्ताकाळात फलटणच्या विकासाऐवजी शहराच्या मातीचे नुकसान झाले असल्याने षडयंत्रकारी प्रवृत्तीला तालुक्यातील सत्तेतून दूर ठेवण्याची गरज होती, अशी...

ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार 
ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार 

एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी आज, गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील गजानन चौकात...

ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन
ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन

एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणूकीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेचा घोडा रोखत ऐतिहासिक विजय मिळवून भाजप-राष्ट्रवादी युतीने पालिकेवर सत्ता...