श्रीमंत मालोजीराजे व श्रीमंत शिवाजीराजे स्मृती महोत्सवाचे आयोजन
एकता दर्शन : श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांची ४५ वी पुण्यतिथी व श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांची ९८ वी जयंती या घटनांचे औचित्य साधून श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने दि.१४ ते २५ मे या कालावधीत "श्रीमंत मालोजीराजे व श्रीमंत शिवाजीराजे स्मृती महोत्सव-२०२३" अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.१४ रोजी सायंकाळी ६ वाजता स्मृती महोत्सवाचे उद्घाटन विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे हस्ते होणार आहे. यानंतर "श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार" प्रदान समारंभ होणार असून नवी दिल्ली येथील केंद्रीय माहिती आयोगाचे आयुक्त उदय माहूरकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
दि.१५ रोजी 'स्वरश्री' निर्मित, पराग माटेगांवकर प्रस्तृत "सांज सरगम" हा हिंदी व मराठी चित्रपट गीत, सुगम भावगीत, गझल, लावणी कार्यक्रम होणार आहे. दि.१६ रोजी हवामान तज्ञ डॉ.बी.एन. शिंदे (अहमदनगर) यांचे "नफ्याच्या शेतीतून पर्जन्य नियमन" या विषयावर व्याख्यान होणार आहे. अध्यक्षस्थान श्रीमंत रामराजे भूषविणार आहेत.
दि.१७ रोजी सांगलीचे सुप्रसिद्ध कथाकथनकार हिंमत पाटील यांचे कथाकथन होणार आहे, अध्यक्षस्थान प्रा.शरद इनामदार भूषविणार आहेत. दि.१८ रोजी आंतरराष्ट्रीय राजकीय विश्लेषक व ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई यांचे अफगाणिस्तान, पाकिस्तान व जागतिक शांतता या विषयावर व्याख्यान होणार आहे, अध्यक्षस्थान ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता भूषविणार आहेत.
दि.१९ रोजी "तुमचा आमचा इतिहास व पुरातत्व" या विषयावर लेखक व पुरातत्व अभ्यासक आशुतोष पाटील (पुणे) यांचे व्याख्यान होणार आहे, अध्यक्षस्थान माजी प्राचार्य विश्वासराव देशमुख भूषविणार आहेत. दि.२० रोजी प्रा.डॉ. प्रतिभा जाधव (नाशिक) यांचा "मी अरुणा बोलतेय" असा एकपात्री कार्यक्रम होणार आहे.
दि.२४ रोजी फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत विविध शाखांमधील विद्यार्थी कलावंताचा कलाविष्कार मनोरंजन कार्यक्रम होणार आहे, दि.२५ मे रोजी स्मृती महोत्सव समारोप, बक्षीस वितरण, व सत्कार समारंभ श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
सर्व कार्यक्रम मुधोजी हायस्कूलच्या रंगमंचावर रोज सायंकाळी ६ वाजता होणार असून या कार्यक्रमांना शहर व तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.
Sponsored
संबंधित बातम्या
लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे
एकता दर्शन (फलटण) : पत्रकारिता क्षेत्रात येणार्या नव्या पिढीतील पत्रकारांचा अभ्यास प्रगल्भ असणे आवश्यक आहे. आपल्या परिसराची ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक पार्श्वभूमी यांची सखोल...
डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान
एकता दर्शन (फलटण) : शिक्षण क्षेत्रातील प्रतिथयश व्यक्तिमत्त्व डॉ.वैशाली विजय शिंदे यांची भारत गौरव रत्न श्री सन्मान कौन्सिल (भारत सरकारमान्य संस्था) यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या...
पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन
एकता दर्शन (फलटण) : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस...
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम
एकता दर्शन (फलटण) : श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग असलेल्या (आळंदी-पुणे-पंढरपूर-मोहोळ राष्ट्रीय महामार्ग) सातारा-सोलापूर जिल्हा सरहद्दीवरील साधूबुवा ओढ्यानजिक पुणे...
डॉ.प्रसाद जोशी व प्रसन्न जोशी 'परशुराम' पुरस्काराने सन्मानित
एकता दर्शन, फलटण : अखिल ब्राह्मण मध्यवर्ती (नाशिक) संस्थेच्यावतीने देण्यात येणारा व वेदमूर्ती कै.काशिनाथपंत वादे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'परशुराम पुरस्कार' फलटण येथील...
