क्रीडा संस्काराचे मूल्य विद्यार्थ्यांच्या यशस्वी वाटचालीस उपयुक्त : श्रीरंग काटेकर
एकता दर्शन (लिंब) : स्पर्धेच्या युगात शारीरिक मानसिक तंदुरुस्तीला अधिक महत्त्व आहे. क्रीडा संस्काराचे मूल्य भविष्यातील यशस्वी वाटचालीस उपयुक्त ठरणार असल्याचे मत गौरीशंकर जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केले.
लिंब, जि.सातारा येथील गौरीशंकर डी.फार्मसी महाविद्यालयातील वार्षिक क्रीडा स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी प्राचार्य विजय राजे, प्रा.सारिका लोखंडे, प्रा.स्वाती पवार, प्रा.रणजित थावरे, प्रा.स्नेहल माने, चंद्रकांत बडदे, क्रीडा प्रतिनिधी गणेश घाडगे यांच्यासह आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
श्रीरंग काटेकर पुढे म्हणाले, आजच्या काळात बौद्धिक ज्ञानासोबत क्रीडा क्षेत्रातील कौशल्ये विद्यार्थी व खेळाडूंनी आत्मसात करण्याची आवश्यकता आहे.

क्रीडा स्पर्धेतून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता वाढते.आत्मविश्वास निर्माण होतो. विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्राची आवड निर्माण व्हावी यासाठीच आम्ही महाविद्यालयीन स्तरावर दरवर्षी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करत असल्याचे प्राचार्य विजय राजे यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, कबड्डी, खो-खो, क्रिकेट, व्हॉलीबॉल, ॲथलेटिक्स, बुद्धिबळ, कॅरम आदी खेळाच्या स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती पवार व प्रास्ताविक स्वाती पवार यांनी केले
Sponsored
संबंधित बातम्या
फलटणच्या जयदीपची मुंबई आयआयटीत इंट्री
गिरीधर सायन्स अकॅडमीतील जयदीप अभिनव कदम या विद्यार्थ्याची मॅकेनिकल इंजिनिअरींगसाठी मुंबई येथील आयआयटीमध्ये प्रवेश मिळाला असल्याची माहिती अकॅडमीचे संचालक शिवराज भोईटे यांनी एका...
महत्मा फुले ज्ञानविकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा.रमेश आढाव
फलटण: सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महात्मा फुले ज्ञान विकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश तुकाराम आढाव यांची संस्थेच्या विशेष सर्वसाधारण सभेत...
दहावी परीक्षेत कै.संजय गांधी विद्यालयाचा ९२ टक्के निकाल
फलटण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत गुणवरे (ता.फलटण) येथील श्री.भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित...
दहावी परीक्षेत प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचा शंभर टक्के निकाल
फलटण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड...
फलटण तालुक्यातील दहावीचा निकाल ९४.९६ टक्के
फलटण: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून फलटण तालुक्यातील इयत्ता दहावीचा निकाल ९४.९६% लागला...
