राज्यस्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेसाठी गौरीशंकर महाविद्यालयातील विद्यार्थिनींची निवड
एकता दर्शन (लिंब,सातारा) : डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरी अंतर्गत विद्यापीठ स्तरावर घेण्यात आलेल्या अविष्कार संशोधन स्पर्धेत गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी नेत्रदीपक कामगिरी करत सलग ११व्या वर्षी विजेतेपद प्राप्त केले असून या विद्यार्थिनींची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सातारा येथील अरविंद गवळी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे पार पडलेल्या स्पर्धेत विभागीय पातळीवरील सहा झोनल महाविद्यालयातील एकूण १४४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, त्यामध्ये गौरीशंकर फार्मसीच्या दोन विद्यार्थिनींनी विजयी यशाची परंपरा कायम ठेवून मेडिसिन व फार्मसी गटात एम.फार्मसीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या मोहिनी जागोजे व्दितीय तर शास्त्र गटातून एम.फार्मसीच्या अंतिम अंतिम वर्षातील उत्कर्षा यादव यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त करून महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवला असून या विद्यार्थिनींची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यशस्वी विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप, उपाध्यक्ष मिलिंद जगताप, संचालक डॉ.अनिरुद्ध जगताप, जयवंतराव साळुंखे, आप्पा राजगे, प्रशासकीय अधिकारी नितिन मुडलगीकर, जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर, प्राचार्य डॉ.अजित कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ.योगेश गुरव, रजिस्ट्रार निलेश पाटील यांनी अभिनंदन केले. अविष्कार संशोधन स्पर्धेसाठी महाविद्यालयातील प्रा.धैर्यशील घाडगे, प्रा.स्फूर्ती साखरे, प्रा.शुभम चव्हाण यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
औषध निर्माण शास्त्र शाखेत अविष्कार संशोधन स्पर्धा प्रतिष्ठेची मानली जाते. राज्यभरातील विद्यार्थी या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेत असतात. औषध निर्माण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संशोधन व मानवी जीवनात निर्माण होणाऱ्या विविध आजारावर प्रभावी औषध निर्मितीचे संशोधनाबाबतचे सादरीकरण या स्पर्धेत केले जाते. गौरीशंकर फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थी सलग ११ वर्षे या स्पर्धेत यश प्राप्त करत आहेत.
Sponsored
संबंधित बातम्या
फलटणच्या जयदीपची मुंबई आयआयटीत इंट्री
गिरीधर सायन्स अकॅडमीतील जयदीप अभिनव कदम या विद्यार्थ्याची मॅकेनिकल इंजिनिअरींगसाठी मुंबई येथील आयआयटीमध्ये प्रवेश मिळाला असल्याची माहिती अकॅडमीचे संचालक शिवराज भोईटे यांनी एका...
महत्मा फुले ज्ञानविकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा.रमेश आढाव
फलटण: सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महात्मा फुले ज्ञान विकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश तुकाराम आढाव यांची संस्थेच्या विशेष सर्वसाधारण सभेत...
दहावी परीक्षेत कै.संजय गांधी विद्यालयाचा ९२ टक्के निकाल
फलटण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत गुणवरे (ता.फलटण) येथील श्री.भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित...
दहावी परीक्षेत प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचा शंभर टक्के निकाल
फलटण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड...
फलटण तालुक्यातील दहावीचा निकाल ९४.९६ टक्के
फलटण: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून फलटण तालुक्यातील इयत्ता दहावीचा निकाल ९४.९६% लागला...
