गुणवरेतील आरोग्य तपासणी शिबीरास उत्स्फुर्त प्रतिसाद
एकता दर्शन (गुणवरे, ता. फलटण) : येथील दोशी गुणवरेकर चॅरिटेबल ट्रस्ट, जनसेवा डायग्नोस्टीक सेंटर, माऊली फाऊंडेशन (मुंबई), लायन्स क्लब, लायन्स मधोजी चॅरिटेबल आय हॉस्पीटल, फलटण ब्लड बँक, जैन सोशल ग्रुप, गुणवरे ग्रामपंचायत आदी संस्थांच्यावतीने गुणवरे येथे आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीरास गाव परिसरातील रुग्णांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देवुन शिबीराचा लाभ घेतला.
या शिबीरात बालरोग, दंतरोग, अस्थिरोग, स्त्रीरोग, नेत्ररोग, त्वचारोग अशा विविध प्रकारच्या आजारांची तपासणी व त्यावरील उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून करून रुग्णांना मोफत औषधे व चष्म्यांचे वाटप करण्यात आले. दरम्यान आयोजित रक्तदान शिबिरात जवळपास पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केले.
प्रारंभी शिबीराचे उद्घाटन हृदयरोग तज्ञ डॉ.जे.टी. पोळ, सरपंच सौ.अधिकाताई गावडे, दोशी गुणवरेकर चॅरिटेबल ट्रस्टचे मंगेश शेठ दोशी यांचेहस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव, ज्येष्ठ विधीज्ञ विश्वनाथ टाळकुटे, मॅग फायनान्स कंपनीचे अनिल मोहोटकर, अमोल दोशी, डॉ.त्रिंबक गावडे, डॉ.तुकाराम गावडे, जे.पी. गावडे, उत्तम गावडे, सविता आढाव आदी प्रमुख उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत मंगेश शेठ दोशी यांनी केले.

शिबीरात डॉ.राजस गांधी, डॉ.कल्याण नाळे, डॉ. गुंजन गांधी, डॉ. निखिल नाळे, डॉ.भारत पोंदकुले, डॉ.अशोक व्होरा, डॉ.चेतन गुंदेचा, डॉ.श्रीकांत गावडे, डॉ.तेजस गांधी, डॉ. प्रज्ञा गांधी, डॉ.मनोज गांधी, डॉ.आलोक गांधी, डॉ.चैत्राली खोमणे, डॉ. मिलींद दोशी, डॉ.इंद्रायणी नक्षणे, डॉ.सिद्धांत दोशी, डॉ.सुनिल गावडे, डॉ.आभिजीत गावडे, डॉ.अभिजीत गावडे यांचेसह विविध संस्थाचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सोसायटीचे सदस्य, ग्रामस्थ आदी सहभागी झाले होते.
Sponsored
संबंधित बातम्या
लेखणी, वाणी आणि कृतीचा दुर्मीळ संगम : प्रा. रमेश आढाव
ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, लेखक आणि सामाजिक चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते प्रा. रमेश तुकाराम आढाव यांची १ ऑगस्ट रोजी साजरी होणारी जयंती म्हणजे त्यांच्या कार्याचा, विचारांचा आणि समाजासाठी...
लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे
एकता दर्शन (फलटण) : पत्रकारिता क्षेत्रात येणार्या नव्या पिढीतील पत्रकारांचा अभ्यास प्रगल्भ असणे आवश्यक आहे. आपल्या परिसराची ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक पार्श्वभूमी यांची सखोल...
डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान
एकता दर्शन (फलटण) : शिक्षण क्षेत्रातील प्रतिथयश व्यक्तिमत्त्व डॉ.वैशाली विजय शिंदे यांची भारत गौरव रत्न श्री सन्मान कौन्सिल (भारत सरकारमान्य संस्था) यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या...
पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन
एकता दर्शन (फलटण) : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस...
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम
एकता दर्शन (फलटण) : श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग असलेल्या (आळंदी-पुणे-पंढरपूर-मोहोळ राष्ट्रीय महामार्ग) सातारा-सोलापूर जिल्हा सरहद्दीवरील साधूबुवा ओढ्यानजिक पुणे...
