नांदेड येथील दलित युवक हत्या प्रकरणाचा फलटणमध्ये निषेध
एकता दर्शन : नांदेड जिल्ह्यातील बोंडारी हवेली गावातील दलित तरूणाच्या निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपींची उच्चस्तरीय चौकशी करुन संबधीत आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करणेत यावी अशी मागणी आरपीआय (आठवले गट) फलटण शाखेच्यावतीने एका निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून अक्षय भालेराव या दलित तरुणाची गावातील जातीयवादी गावगुंडांनी हत्या केली असल्याच्या घटनेचा निषेध करीत वरील मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) फलटण शाखेने एका निवेदनाव्दारे केली आहे.
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता अक्षय भालेराव यांनी डॉ.आंबेडकर जयंतीची मिरवणूक काढली होती, याची मनात खदखद व्यक्त करीत काही समाजकंटकांनी हत्या घडवत जातीयवादी मानसिकता पुन्हा एखदा दाखवून दिली असल्याने या देशातला जातीयवाद अद्यापही संयुष्टात आला नसल्याचे या निवेदनात नमुद केले आहे.
या हत्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, भालेराव कुटुंबास शासनाने योग्य न्याय द्यावा, आर्थिक मदत करावी, सदरचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा, विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती व्हावी, राज्यातील पुरोगामी समजणाऱ्या राज्यकर्त्यांनी या घटनेवर योग्य ते भाष्य करावे आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
सदरचे निवेदन प्रांतअधिकारी यांना दि. ५ रोजी सकाळी ११ वाजता आरपीआय कार्यकर्त्यांनी दिले असून या निवेदनावर आरपीआयचे विजय येवले, मधुकर काकडे, मुन्ना शेख, संजय निकाळजे, राजू मारूडा, तेजस काकडे, लक्ष्मण अहिवळे, सतीश अहिवळे, महिला आघाडीच्या विमलताई काकडे, मीना काकडे, अलका बनसोडे, राखी कांबळे, ज्योती अहिवळे, सारिका अहिवळे, जयश्री अहिवळे, आशा काकडे या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह अन्य कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
Sponsored
संबंधित बातम्या
लेखणी, वाणी आणि कृतीचा दुर्मीळ संगम : प्रा. रमेश आढाव
ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, लेखक आणि सामाजिक चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते प्रा. रमेश तुकाराम आढाव यांची १ ऑगस्ट रोजी साजरी होणारी जयंती म्हणजे त्यांच्या कार्याचा, विचारांचा आणि समाजासाठी...
लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे
एकता दर्शन (फलटण) : पत्रकारिता क्षेत्रात येणार्या नव्या पिढीतील पत्रकारांचा अभ्यास प्रगल्भ असणे आवश्यक आहे. आपल्या परिसराची ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक पार्श्वभूमी यांची सखोल...
डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान
एकता दर्शन (फलटण) : शिक्षण क्षेत्रातील प्रतिथयश व्यक्तिमत्त्व डॉ.वैशाली विजय शिंदे यांची भारत गौरव रत्न श्री सन्मान कौन्सिल (भारत सरकारमान्य संस्था) यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या...
पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन
एकता दर्शन (फलटण) : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस...
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम
एकता दर्शन (फलटण) : श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग असलेल्या (आळंदी-पुणे-पंढरपूर-मोहोळ राष्ट्रीय महामार्ग) सातारा-सोलापूर जिल्हा सरहद्दीवरील साधूबुवा ओढ्यानजिक पुणे...
