फलटण-पंढरपूर रेल्वे मार्गासाठी निधी उपलब्ध करून देणार : केंद्रीय रेल्वेमंत्री
एकता दर्शन : फलटण-पंढरपूर प्रलंबित रेल्वेमार्गाच्या कामासाठी आर्थिक निधी उपलब्ध करून देण्याची लेखी मागणी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्याकडे केली असता केंद्रीय रेल्वेमंत्री यांनी फलटण- पंढरपूर रेल्वेमार्गाच्या कामासाठी आर्थिक निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही दिली असल्याने या मार्गावरील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
सध्या लोभसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु असून खासदार निंबाळकर यांनी वरील मागणीचे निवेदन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांना दिले. फलटण-पंढरपूर रेल्वेमार्ग कसा फायदेशीर आहे, हे पटवून देताना खासदार रणजितसिंह निंबाळकर आपल्या निवेदनात म्हणाले आहेत, कि फलटण-पंढरपूर रेल्वेमार्गाचे काम १०० वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असून त्यासाठी प्रयत्नही करण्यात आले होते. या मार्गासाठी लागणाऱ्या जमिनीचे अधिग्रहण इंग्रज राजवट असताना केले होते. सध्या भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष चालू आहे, त्याचे औचित्य साधून सदर मार्गाचे काम सुरू केले पाहिजे असे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी केंद्रिय रेल्वेमंत्र्यांच्या निदर्शनात आणून दिले. यावेळी केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते.
विकासाला चालना मिळेल :
फलटण-पंढरपूर रेल्वेमार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर कर्नाटक, गोवा, तेलंगणा, आंध्रप्रदेश या राज्यांसह संपूर्ण देशभरातले विठ्ठलभक्त आषाढी कार्तिकीला पंढरपूरमध्ये येतील, दळण-वळण वाढेल, रोजगार उपलब्ध होऊन तरुणांच्या हाताला काम मिळेल, शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध होईल, फलटण-पंढरपूर रेल्वेमार्गावर येणाऱ्या प्रत्येक घटकाच्या विकासाला गती येईल, असे खासदार निंबाळकर यांनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले.

महाविकास आघाडीकडून दखल नाही :
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारने ५० टक्के व केंद्र सरकारने ५० टक्के असा आर्थिक निधी सदर मार्गासाठी उपलब्ध करून देण्याचे पत्र केंद्र सरकारला दिले होते, मात्र त्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर फलटण-पंढरपूर मार्गासाठी जमिनीचे अधिग्रहण होऊनसुद्धा त्यावर कोणतीही कार्यवाही केली नसल्याचे मत खासदार नाईक-निंबाळकर यांनी दिलेल्या निवेदनात व्यक्त केले आहे.
निवेदन दिल्यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी तातडीने संबंधित विभागाला निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या असल्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.
Sponsored
संबंधित बातम्या
साताऱ्यात रंगणार सरस्वतांचा सोहळा ! ९९व्या मराठी साहित्य संमेलनाची 'ग्रंथदिंडी' ठरणार ऐतिहासिक
एकता दर्शन (सातारा) : ऐतिहासिक सातारा नगरीत होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे काऊंटडाऊन सुरू झाले असून, या महासोहळ्यातील ग्रंथदिंडी व भव्य शोभायात्रा हे प्रमुख आकर्षण...
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा
एकता दर्शन (पोंभुर्ले, ता. देवगड) मराठी वृत्तपत्रसृष्टीत सलग ३४ वर्षे पत्रकारिता करणारे आणि त्यानंतर पुणे पत्रकार प्रतिष्ठान, पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूट मध्ये कार्यरत...
महाराष्ट्रातील मतमोजणी २१ डिसेंबरलाच ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
एकता दर्शन (फलटण) : राज्यात विविध ठिकाणी नगरपालिका व नगरपंचायतच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत, त्यांची मतमोजणी २१ डिसेंबर रोजीच करण्यात यावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे....
संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारी उत्साहात
एकता दर्शन (फलटण) : संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने श्री क्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) सुमारे ५ हजार किलोमीटर लांब असणारी व ३१ दिवस...
दि.6 जानेवारी रोजी पोंभुर्ले येथे 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण
फलटण : ‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी’तर्फे देण्यात येणार्या राज्यपातळीवरील प्रतिष्ठित 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री ना.नितेश...
