महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे राज्यस्तरीय 'दर्पण' पुरस्कार जाहीर
एकता दर्शन : महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी, फलटण या संस्थेच्यावतीने मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक 'दर्पण'कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या ३० व्या राज्यस्तरीय प्रतिष्ठेच्या 'दर्पण' पुरस्कारांची घोषणा संस्थेचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी दि.१७ रोजी पोंभुर्ले, ता.देवगड, जि.सिंधुदुर्ग येथे संस्थेने उभारलेल्या 'दर्पण' सभागृहात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या १७७ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात केली.
याप्रसंगी कणकवली येथील गोपुरी आश्रमाचे संचालक प्रा.राजेंद्र मुंबरकर, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा फलटणचे कार्यवाह ताराचंद्र आवळे, मधुकर जांभेकर, सुधाकर जांभेकर, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे विश्वस्त अलका बेडकिहाळ, गजानन पारखे, अमर शेंडे उपस्थित होते.
प्रारंभी प्रा.राजेंद्र मुंबरकर यांच्या हस्ते जांभेकरांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर, मराठी पत्रकारांच्या कार्याचा सन्मान म्हणून संस्थेच्यावतीने प्रतिवर्षी राज्यस्तरीय 'दर्पण' पुरस्कारांचे वितरण सन १९९३ पासून केले जात असल्याचे सांगत बेडकिहाळ यांनी यंदाचे पुरस्कार जाहीर केले.
२,५०० रुपये रोख व सन्मानपत्र, जांभेकर चरित्र, ग्रंथ व माहितीपट, शाल, श्रीफळ असे 'दर्पण' पुरस्काराचे स्वरूप असून या पुरस्कारांचे वितरण दि.६ जानेवारी २०२४ रोजी पोंभुर्ले, ता.देवगड येथील संस्थेच्या 'दर्पण' सभागृहात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे बेडकिहाळ यांनी यावेळी सांगितले.
'दर्पण' पुरस्कारांचे मानकरी :
पुरस्काराचे हे ३० वे वर्ष असून 'दर्पण'कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर 'जीवन गौरव पुरस्कार' सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार माधव कदम यांना, 'साहित्यिक गौरव दर्पण पुरस्कार' नांदेड येथील नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन व अभ्यास केंद्राचे संचालक ज्येष्ठ पत्रकार भगवान लक्ष्मणराव अंजनीकर यांना, ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील पुरस्कृत 'धाडसी पत्रकार दर्पण पुरस्कार' डोंबिवली येथील 'धावती मुंबई' व 'सन्मान महाराष्ट्र न्यूज'च्या मुख्य संपादिका कृतिका (श्वेता) पालव यांना घोषित करण्यात आला आहे.
'दर्पण' पुरस्कार जाहीर झालेल्या अन्य पत्रकारांमध्ये एबीपी माझाचे नवी दिल्ली विशेष प्रतिनिधी प्रशांत कदम, पुणे येथील जडण घडण मासिकाचे मुख्य संपादक डॉ.सागर देशपांडे, दैनिक प्रभात सातारा आवृत्ती प्रमुख श्रीकांत कात्रे, फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष शशिकांत सोनवलकर, दैनिक सत्य सह्याद्रीचे फलटण तालुका प्रतिनिधी विक्रम चोरमले यांचा समावेश आहे.
Sponsored
संबंधित बातम्या
लेखणी, वाणी आणि कृतीचा दुर्मीळ संगम : प्रा. रमेश आढाव
ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, लेखक आणि सामाजिक चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते प्रा. रमेश तुकाराम आढाव यांची १ ऑगस्ट रोजी साजरी होणारी जयंती म्हणजे त्यांच्या कार्याचा, विचारांचा आणि समाजासाठी...
लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे
एकता दर्शन (फलटण) : पत्रकारिता क्षेत्रात येणार्या नव्या पिढीतील पत्रकारांचा अभ्यास प्रगल्भ असणे आवश्यक आहे. आपल्या परिसराची ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक पार्श्वभूमी यांची सखोल...
डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान
एकता दर्शन (फलटण) : शिक्षण क्षेत्रातील प्रतिथयश व्यक्तिमत्त्व डॉ.वैशाली विजय शिंदे यांची भारत गौरव रत्न श्री सन्मान कौन्सिल (भारत सरकारमान्य संस्था) यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या...
पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन
एकता दर्शन (फलटण) : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस...
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम
एकता दर्शन (फलटण) : श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग असलेल्या (आळंदी-पुणे-पंढरपूर-मोहोळ राष्ट्रीय महामार्ग) सातारा-सोलापूर जिल्हा सरहद्दीवरील साधूबुवा ओढ्यानजिक पुणे...
