प्रोग्रेसिव्हच्या वार्षिक स्नेहसंमेलनास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
एकता दर्शन (कोळकी,फलटण), येथील सरस्वती शिक्षण संस्थेच्या प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साही वातावरणात पार पडले. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमास फलटणकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
स्नेहसंमेलनाचे उदघाटन प्रांताधिकारी डॉ.शिवाजीराव जगताप, पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलित करून व सरस्वती प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आले. याप्रसंगी लघु चित्रपट दिग्दर्शक व निर्माते विशाल कुदळे, फलटण दूधसंघाचे अध्यक्ष धनंजय पवार, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, प्रा. रमेश आढाव, सरस्वती शिक्षण संस्थेचे संस्थापक भीमराव माने, पांडुरंग पवार (भाऊ), सौ. सुलोचना पवार, संस्थेचे सचिव विशाल पवार, संचालिका सौ. प्रियांका पवार, ग्रामविकास अधिकारी विकास गायकवाड, संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ.संध्या गायकवाड, कोळकीचे विद्यमान सरपंच, उपसपंच व ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरवात श्री गणेश वंदनेने झाली, त्यानंतर पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी ख्रिसमस साँग, वो कृष्णा है, जंगल-जंगल पता चला है, क्युटेस्ट बाबी या इंग्रजी गीतांवर नृत्याचे सादरीकरण करून उपस्थितांना मोहित केले. महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेची परंपरा जोपासणाऱ्या कोळीगीत, वाघ्या-मुरळी लाईव्ह परफॉर्मन्स, गोंधळीगीत, आदिवासी नृत्याचे सादरीकरण केले. ऑल इज वेल, सिंम्बा, गल्ला गुरिया, बरसो रे मेघा अशा हिंदी गीतांवर नृत्य सादरीकरण करून उत्कृष्ठ अभिनय दाखवला.

अनाथ मुलांच्या जीवनावर हृदयस्पर्शी नाटिका सादर करून पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांना आदरांजली अर्पण केली. देशभक्तीपर गीताद्वारे देशाच्या तिन्ही दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांना श्रद्धांजली अर्पण केली. माध्यमिक व उच्च माध्य. विभागातील विद्यार्थ्यांनी नाचो-नाचो, ढोलिडा, बाबा साँग, महाराष्ट्राची अस्सल मराठमोळी लावणी(चंद्रा) या गीतांवर उत्कृष्ठ नृत्याविष्कार सादर केला. हसना मना है या विनोदी नाटकाने प्रेक्षकांना खूप हसवले. त्यानंतर छ.शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आग्राहून सुटका या ऐतिहासिक प्रसंगाचे विद्यार्थ्यांने सादरीकरण केले, विश्व एकात्मता या नाटिकेद्वारे विश्वशांतीचा संदेश दिला. गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांनी गायलेल्या हिंदी गीतांवर विदयार्थ्यांनी नृत्य सादर करून लता दीदींना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सर्व सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला
प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत संस्थेचे सचिव विशाल पवार यांनी केले. संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती व्यवस्थापकीय संचालिका सौ. संध्या गायकवाड यांनी दिली. याप्रसंगी प्रांताधिकारी डॉ.शिवाजीराव जगताप यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुण व प्रशालेच्या गुणवत्तेचे कौतुक करीत शिक्षणाबरोबरच क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रामुळेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणार असल्याचे असे मत व्यक्त केले. यावेळी अरविंद मेहता यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करीत शाळा राबवत असलेल्या विविध उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य अमित सस्ते, पर्यवेक्षिका सौ. माधुरी माने, प्राथमिक विभागाच्या सौ. सुवर्णा निकम, माध्यमिक विभागाच्या श्रीमती योगिता सस्ते, नृत्य प्रशिक्षक प्रशांत भोसले यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.अमृता गोसावी व सौ.रेश्मा कदम यांनी केले, आभार सौ.क्षितिजा पंडित यांनी मानले.
Sponsored
संबंधित बातम्या
फलटणच्या जयदीपची मुंबई आयआयटीत इंट्री
गिरीधर सायन्स अकॅडमीतील जयदीप अभिनव कदम या विद्यार्थ्याची मॅकेनिकल इंजिनिअरींगसाठी मुंबई येथील आयआयटीमध्ये प्रवेश मिळाला असल्याची माहिती अकॅडमीचे संचालक शिवराज भोईटे यांनी एका...
महत्मा फुले ज्ञानविकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा.रमेश आढाव
फलटण: सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महात्मा फुले ज्ञान विकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश तुकाराम आढाव यांची संस्थेच्या विशेष सर्वसाधारण सभेत...
दहावी परीक्षेत कै.संजय गांधी विद्यालयाचा ९२ टक्के निकाल
फलटण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत गुणवरे (ता.फलटण) येथील श्री.भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित...
दहावी परीक्षेत प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचा शंभर टक्के निकाल
फलटण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड...
फलटण तालुक्यातील दहावीचा निकाल ९४.९६ टक्के
फलटण: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून फलटण तालुक्यातील इयत्ता दहावीचा निकाल ९४.९६% लागला...
