नीरज चोप्राने रचला आणखी एक इतिहास ; जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत जिंकले ‘रौप्य’
एकता दर्शन : ओरेगॉन, (युनायटेड स्टेट्स, हेवर्ड फील्ड) येथे सुरु असलेल्या जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत पुरुष भालाफेक प्रकारात भारताच्या नीरज चोप्राने चौथ्या प्रयत्नात ८८.१३ मीटरचा सर्वोत्तम भालाफेक करून रौप्यपदक जिंकले. नीरज हा जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारा दुसरा भारतीय आणि पहिला पुरुष खेळाडू बनला. पॅरिसमध्ये २००३ रोजी झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत लांबउडीपटू अंजू बूबी जॉर्ज हि कांस्यपदक जिंकणारी पहिली भारतीय होती.
जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस आहे. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी पहिल्या प्रयत्नात फाऊल थ्रो करणाऱ्या नीरज चोप्राने दुसऱ्या प्रयत्नात ८२.३९ मीटर भालाफेक केली. तिसऱ्या प्रयत्नात त्याने ८६.३७ मीटर भालाफेक केली. चौथ्या प्रयत्नात ८८.१३ मीटर भालाफेक केली. नीरजचा पाचवा प्रयत्न फाऊल ठरला. चौथ्या प्रयत्नात केलेल्या ८८.१३ मीटरच्या भालाफेकीने नीरजने रौप्यपदकावर आपले नाव कोरले. अँडरसन पीटर्सने त्याच्या पहिल्या प्रयत्नात ९०.२१ मीटर भालाफेक केली. दुसऱ्या प्रयत्नात त्याने ९०.४६ मीटर भालाफेक करून पहिले स्थान कायम राखले.
ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज आशियातील पहिला भालाफेकपटू असून आज जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्यपदक जिंकणारा दुसरा भारतीय आणि पहिला पुरुष खेळाडू बनण्याचा बहुमान मिळवत त्याने इतिहास रचला आहे.

Sponsored
संबंधित बातम्या
फलटणची मिताली जिल्हास्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत अव्वल
जिल्हास्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत निंभोरे (ता.फलटण) येथील कु.मिताली अनिल महामुनी या विद्यार्थिनीने १३ वर्षीय गटात विजेतेपद पटकविले असून तालुक्यातील क्रीडाक्षेत्रात तिचे...
गुजरात विरुद्ध चेन्नई ; दोन्ही संघ विजेतेपदासाठी लढणार
एकता दर्शन: जगातील सर्वात मोठी समजली जाणारी क्रिकेट लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग जवळपास ५८ दिवसांपासून सुरू असून आज या हंगामातील अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर...
आजपासून रंगणार IPLचा थरार
एकता दर्शन : जगातील सर्वात मोठी समजली जाणारी क्रिकेट लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगचा १६ वा हंगाम विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत आजपासून सुरू होत आहे. यावर्षी १० संघांमध्ये...
फलटणमध्ये राष्ट्रीय खो-खो स्पर्धेची जय्यत तयारी
फलटण (एकता दर्शन) : दिनांक २८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान फलटण येथे ३२ वी राष्ट्रीय किशोर / किशोरी खो-खो स्पर्धा होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर फलटण मधील विविध संस्थांच्या सहभागातून या...
इंडिजला हरवून भारताचा मालिकेवर कब्जा ; अक्षर पटेल विजयाचा हिरो
एकता दर्शन : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतने इंडिजवर विजय मिळवत मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.
