वृक्ष लागवडीसोबत वृक्षसंवर्धन अनिवार्य : डॉ. वैशाली शिंदे
फलटण : पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड करण्याबरोबरच रोपण केलेल्या झाडांचे संवर्धन होणे अनिवार्य असल्याचे सांगत निसर्गाच्या संरक्षणासाठी प्रत्येक नागरिकाने प्रयत्न केले पाहिजेत असे आवाहन आयडियल किड्स इंटरनॅशनल स्कूलच्या प्रमुख डॉ. वैशालीताई शिंदे यांनी केले आहे.
जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव, प्रमुख पाहुणे म्हणून जाधववाडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच मनिष जाधव, विद्यार्थी, आदी मान्यवर उपस्थित होते.
देशातील जंगलाचे प्रमाण झपाट्याने कमी होत असून त्या जागेवर सिमेंटच्या इमारती उभारल्या जात आहेत, वृक्षतोड होत आहे. याचे निसर्ग व मानवी जीवनावर परिणाम होत आहे. वृक्षतोडीमुळे अस्तित्वातील नैसर्गिक जलसाठे कमी होणे, जागतिक तापमानवाढीला सामोरे जावे लागणे, अनियमित ऋतुचक्राचा सामना करावा लागणे आदी दुष्परिणामांच्या चक्रव्यूहात निसर्ग व मानव अडकला असल्याचे सौ. शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करताना ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव
निसर्गवाद्यांचे निसर्गरक्षणाचे प्रयत्न वाढत्या शहरीकरणात लुप्त होत असल्याची खंत व्यक्त करत 'झाडे लावा झाडे जगवा'चा जागर व्यापक करून प्रत्येकाने रोपण केलेली झाडे जगवली तरच वृक्षलागवड भविष्यात उपयुक्त ठरेल. असे मत सौ. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले. दरम्यान जागतिक संवर्धन दिनानिमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आयडियल किड्स इंटरनॅशनल स्कुलच्या परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली.
Sponsored
संबंधित बातम्या
लेखणी, वाणी आणि कृतीचा दुर्मीळ संगम : प्रा. रमेश आढाव
ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, लेखक आणि सामाजिक चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते प्रा. रमेश तुकाराम आढाव यांची १ ऑगस्ट रोजी साजरी होणारी जयंती म्हणजे त्यांच्या कार्याचा, विचारांचा आणि समाजासाठी...
लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे
एकता दर्शन (फलटण) : पत्रकारिता क्षेत्रात येणार्या नव्या पिढीतील पत्रकारांचा अभ्यास प्रगल्भ असणे आवश्यक आहे. आपल्या परिसराची ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक पार्श्वभूमी यांची सखोल...
डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान
एकता दर्शन (फलटण) : शिक्षण क्षेत्रातील प्रतिथयश व्यक्तिमत्त्व डॉ.वैशाली विजय शिंदे यांची भारत गौरव रत्न श्री सन्मान कौन्सिल (भारत सरकारमान्य संस्था) यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या...
पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन
एकता दर्शन (फलटण) : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस...
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम
एकता दर्शन (फलटण) : श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग असलेल्या (आळंदी-पुणे-पंढरपूर-मोहोळ राष्ट्रीय महामार्ग) सातारा-सोलापूर जिल्हा सरहद्दीवरील साधूबुवा ओढ्यानजिक पुणे...
