डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त फलटणमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन
गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे देशातील सर्वच सण, उत्सव, समारंभ, महापुरुषांचे जयंती महोत्सव साजरे करता आले नाहीत. मात्र, यावेळी कोरोनाला ब्रेक लागल्याने सर्व महोत्सव समारंभाना सुरवात झाली असून फलटणमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती २०२२च्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष ॲड. अनिकेत अहिवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
फलटण : गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे देशातील सर्वच सण, उत्सव, समारंभ, महापुरुषांचे जयंती महोत्सव साजरे करता आले नाहीत. मात्र, यावेळी कोरोनाला ब्रेक लागल्याने सर्व महोत्सव समारंभाना सुरवात झाली असून फलटणमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती २०२२च्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष ॲड. अनिकेत अहिवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर जयंती महोत्सव समितीच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत ॲड. अहिवळे बोलत होते. यावेळी जयंती महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष केतन सोरटे, सचिव सुशांत अहिवळे, उपाध्यक्ष ज्ञानरत्न अहिवळे, प्रतिक गायकवाड, कुणाल काकडे, सदस्य गौतम अहिवळे, सुशांत काकडे, अक्षय काकडे, उमेश कांबळे, अभि काकडे, निखिल अहिवळे आदी उपस्थित होते.
दिनांक ९ पासून सामाजिक विषयावर चित्रपट, नृत्य स्पर्धा, रक्तदान शिबीर, डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावरील "गरूडझेप भिमाची" मराठी भीम गीतांसह विविध कार्यक्रम आयोजित केले असून दि. १३ रोजी रात्री १२ वाजता येथील डॉ. आंबेडकर पुतळ्याला मान्यवरांच्या उपस्थितीत सामुदायिक बुध्दवंदना, अभिवादन कार्यक्रम होणार आहे.
दि. १४ रोजी सकाळी ८ वाजता जिंती नाका (फलटण) येथे भीमज्योत स्वागत करून सायंकाळी ७ वाजता डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. दि. १६ एप्रिल ते २३ एप्रिल दरम्यान एकपात्री नाटक "मी सावित्रीबाई बोलतेय", व्याख्यान, महिला जनजागृती, युपीएससी, एमपीएससी, बँकिंग टेस्ट स्पर्धा, करियर कौन्सिलिंग व मार्गदर्शन, आंबेडकरी प्रजा परिषद आदी कार्यक्रम होणार आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिरवणूक शुभारंभ महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार दिपकराव चव्हाण, श्रीमंत संजीवराजे, श्रीमंत रघुनाथराजे, माजी नगराध्यक्षा सौ. निताताई नेवसे, समशेर नाईक निंबाळकर, नितीन (भैया) भोसले, मिलींद नेवसे, नगरसेविका वैशाली अहिवळे, सनी अहिवळे, सचिन अहिवळे, विक्रम जाधव यांच्यासह प्रांतअधिकारी डॉ. शिवाजी जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, तहसिलदार समीर यादव, गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे, मुख्याधिकारी संजय गायकवाड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
Sponsored
संबंधित बातम्या
लेखणी, वाणी आणि कृतीचा दुर्मीळ संगम : प्रा. रमेश आढाव
ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, लेखक आणि सामाजिक चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते प्रा. रमेश तुकाराम आढाव यांची १ ऑगस्ट रोजी साजरी होणारी जयंती म्हणजे त्यांच्या कार्याचा, विचारांचा आणि समाजासाठी...
लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे
एकता दर्शन (फलटण) : पत्रकारिता क्षेत्रात येणार्या नव्या पिढीतील पत्रकारांचा अभ्यास प्रगल्भ असणे आवश्यक आहे. आपल्या परिसराची ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक पार्श्वभूमी यांची सखोल...
डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान
एकता दर्शन (फलटण) : शिक्षण क्षेत्रातील प्रतिथयश व्यक्तिमत्त्व डॉ.वैशाली विजय शिंदे यांची भारत गौरव रत्न श्री सन्मान कौन्सिल (भारत सरकारमान्य संस्था) यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या...
पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन
एकता दर्शन (फलटण) : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस...
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम
एकता दर्शन (फलटण) : श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग असलेल्या (आळंदी-पुणे-पंढरपूर-मोहोळ राष्ट्रीय महामार्ग) सातारा-सोलापूर जिल्हा सरहद्दीवरील साधूबुवा ओढ्यानजिक पुणे...
