छत्रपती शिवरायांचे विचार युवकांनी आत्मसात करावेत : प्रा. रमेश आढाव
तांबेवाडी, (ता.माळशिरस) : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यातील राज्यकारभारामध्ये भारतीय लोकशाहीची बीजे रोवली होती. भारतीय स्वातंत्र्याची प्रेरणा हि छत्रपतींचीच होती. निःपक्ष निरपेक्ष राज्यपद्धतीतून त्यांनी राज्यकारभार केला असल्याचे सांगत आजच्या युवा पिढीने छ.शिवरायांचे विचार आत्मसात केले पाहिजेत अशी अपेक्षा ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांनी व्यक्त केली.
तांबेवाडी ता.माळशिरस येथे शिवसाम्राज्य प्रतिष्ठान, जय शिवराय तरुण मंडळ व गणेश तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवजयंती महोत्सव व्याख्यानमालेत "छत्रपती शिवाजी महाराज आणि आधुनिक युवा पिढी" या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून प्रा.आढाव बोलत होते. यावेळी सरपंच संताजी बोडरे, सोसायटीचे चेअरमन संजय साळुंखे, माजी उपसरपंच तुषार भोईटे, शेतकरी गटाचे अध्यक्ष राजेंद्र तांबे, हरिभाऊ सकट, माजी सरपंच मेघा साळुंखे, बचत गटाच्या माधुरी तांबे, विलास भोईटे, सुभाष साळुंखे आदी प्रमुख उपस्थित होते.
छ.शिवाजी महाराजांनी स्वकर्तृत्वाने स्वराज्य निर्माण केले. तत्कालीन अनेक राजांनी वारसा हक्काने राज्य चालविले मात्र छ.शिवाजी महाराजांनी लोककल्याणकारी राज्य चालविल्यामुळे रयतेला त्याकाळी स्वतःचे राज्य असल्याची भावना होती. तरुण वयात तोरणा किल्ला जिंकला असल्याचा पराक्रम व छ.शिवाजी महाराजांनी केलेले काम आधुनिक युवा पिढीला आदर्शवत असून युवकांनी महाराजांचे विचार आत्मसात केले पाहिजेत अशी अपेक्षा प्रा.आढाव यावेळी व्यक्त केली.

प्रारंभी छ.शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दरम्यान, शालेय विद्यार्थिनी सई भोसले, स्वरा चंकेश्वरा, स्वाती भापकर यांनी छ.शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी सोलापूर जिल्हा उद्योग केंद्रामार्फत दुग्धव्यवसाय प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
या व्याख्यानमालेस बाळासाहेब तांबे, सागर तांबे, हनुमंत शिंदे, ज्ञानदेव पवार, ज्ञानदेव तांबे, सतीश वाघमारे, बाळासाहेब धाईंजे, नमो इंगवले, अभिजीत शिंदे, स्वाती तांबे, अशोक देवकर, किशोर साळुंखे, रणजित साळुंखे, रोहिणी भोईटे, संगीता तांबे, रुपाली शिंदे, स्वप्नील साळुंखे, किसान चव्हाण, संतोष शिंदे यांच्यासह प्रतिष्ठानचे व तरुण मंडळाचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक पत्रकार विलास भोसले यांनी केले. आभार किशोर साळुंखे यांनी मानले.
Sponsored
संबंधित बातम्या
लेखणी, वाणी आणि कृतीचा दुर्मीळ संगम : प्रा. रमेश आढाव
ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, लेखक आणि सामाजिक चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते प्रा. रमेश तुकाराम आढाव यांची १ ऑगस्ट रोजी साजरी होणारी जयंती म्हणजे त्यांच्या कार्याचा, विचारांचा आणि समाजासाठी...
लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे
एकता दर्शन (फलटण) : पत्रकारिता क्षेत्रात येणार्या नव्या पिढीतील पत्रकारांचा अभ्यास प्रगल्भ असणे आवश्यक आहे. आपल्या परिसराची ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक पार्श्वभूमी यांची सखोल...
डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान
एकता दर्शन (फलटण) : शिक्षण क्षेत्रातील प्रतिथयश व्यक्तिमत्त्व डॉ.वैशाली विजय शिंदे यांची भारत गौरव रत्न श्री सन्मान कौन्सिल (भारत सरकारमान्य संस्था) यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या...
पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन
एकता दर्शन (फलटण) : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस...
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम
एकता दर्शन (फलटण) : श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग असलेल्या (आळंदी-पुणे-पंढरपूर-मोहोळ राष्ट्रीय महामार्ग) सातारा-सोलापूर जिल्हा सरहद्दीवरील साधूबुवा ओढ्यानजिक पुणे...
