इंडियन डेंटल असोसिएशन बारामती-फलटण शाखाध्यक्षपदी डॉ.प्रितेश दोशी
इंडियन डेंटल असोसिएशन अंतर्गत बारामती-फलटण शाखेच्या अध्यक्षपदी येथील डॉ.प्रितेश दोशी यांची निवड करण्यात आली आहे.
येथील अशोका हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत डॉ.दोशी यांची एकमताने अध्यक्षपदी निवड करून नवीन कार्यकारणीची स्थापना करण्यात आली.
बारामती-फलटण या संयुक्त शाखेच्या नवीन कार्यकारणीमध्ये डॉ.मनोज गांधी (सचिव) व डॉ.सोनिया शहा (खजिनदार), डॉ.नेत्रा सिकची, डॉ.शितल झारगड, डॉ.तेजस्विता देशपांडे, डॉ.विजय दीक्षित, डॉ.संदीप धायगुडे, डॉ.गौरी दीक्षित, डॉ.प्रज्ञा गांधी, डॉ.सौरभ दोशी, डॉ.नेहा दोशी, डॉ.केतकी नाळे, डॉ.स्वाती दोशी, डॉ.मयूर गायकवाड, डॉ.स्वप्नील निकम, डॉ.प्रदीप व्होरा, डॉ.वैशाली कोकरे, डॉ.विश्वराज निकम, डॉ.अशोक व्होरा, डॉ.राजेंद्र दोशी, डॉ.दीपक दोशी, डॉ.नरेंद्र पवार, डॉ.श्रेणीक शहा, डॉ.सुधा शिंदे, डॉ.शिल्पा दोशी, डॉ.प्रीती शहा, डॉ.मनीषा काकडे, डॉ.प्रीतम ललगुणकर, डॉ.सुशील राऊत, डॉ.चेतन गुंदेचा, डॉ.रोहित संघवी, डॉ.काजल शेंडे, डॉ.अमर अभंग, डॉ.मानसी अरोरा आदींचा समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान, दंतवैद्यकीय सेवेतील ५० वर्षं पूर्ण झाल्याबद्दल इंडियन डेंटल असोसिएशन संघटना बारामती-फलटण शाखेच्यावतीने प्रतिथयश डॉ.अशोक व्होरा यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
नूतन कार्यकारणीतील सर्व सदस्यांचे फलटण शहर व तालुक्यातील दंतवैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.
Sponsored
संबंधित बातम्या
लेखणी, वाणी आणि कृतीचा दुर्मीळ संगम : प्रा. रमेश आढाव
ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, लेखक आणि सामाजिक चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते प्रा. रमेश तुकाराम आढाव यांची १ ऑगस्ट रोजी साजरी होणारी जयंती म्हणजे त्यांच्या कार्याचा, विचारांचा आणि समाजासाठी...
लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे
एकता दर्शन (फलटण) : पत्रकारिता क्षेत्रात येणार्या नव्या पिढीतील पत्रकारांचा अभ्यास प्रगल्भ असणे आवश्यक आहे. आपल्या परिसराची ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक पार्श्वभूमी यांची सखोल...
डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान
एकता दर्शन (फलटण) : शिक्षण क्षेत्रातील प्रतिथयश व्यक्तिमत्त्व डॉ.वैशाली विजय शिंदे यांची भारत गौरव रत्न श्री सन्मान कौन्सिल (भारत सरकारमान्य संस्था) यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या...
पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन
एकता दर्शन (फलटण) : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस...
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम
एकता दर्शन (फलटण) : श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग असलेल्या (आळंदी-पुणे-पंढरपूर-मोहोळ राष्ट्रीय महामार्ग) सातारा-सोलापूर जिल्हा सरहद्दीवरील साधूबुवा ओढ्यानजिक पुणे...
