मोफत कायदा सल्ला केंद्रामध्ये ८२ टक्के प्रकरणांत समझोता
एकता दर्शन, सातारा : दलित महिला विकास मंडळाच्या वतीने 'मुक्तांगण' नवविचार प्रेरणा केंद्रामध्ये जुलै २०२२ ते जून २०२३ दरम्यान २४४ प्रकरणे दाखल झाली होती. यामध्ये विवाह विषयक १९५ प्रकरणे, जमीन विषयक ४० प्रकरणे, सरकारी यंत्रणेविरुद्ध २, आर्थिक गुन्हे २, आणि फौजदारी प्रकरणांची दखल घेण्यासाठी ५ प्रकरणांमध्ये सहाय्य मागण्यात आले असल्याचे सांगत ८२ टक्के प्रकरणात समझोता झाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या ॲड.वर्षा देशपांडे यांनी सातारा येथील आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
ॲड.देशपांडे म्हणाल्या, विवाह विषयक १९५ प्रकरणांपैकी १३२ प्रकरणात समझोता करण्यात आला. १८३ प्रकरणात समुपदेशन करण्यात आले. दारूचे व्यसन सोडवण्यासाठी २७ जणांना मदत करण्यात आली. १२ प्रकरणात समंजस्याने घटस्फोट झाले. घटस्फोटासाठी ३९ प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत. कौटुंबिक हिंसाचारापासून स्त्रियांचे संरक्षण कायदा २००५ अंतर्गत १२ प्रकरणे न्यायालयात दाखल झाली. बालकांच्या हक्कासाठी ३ दाखल प्रकरण पैकी २ प्रकरणात आईला बालकांचा हक्क मिळवून देण्यात आला व वडिलांना भेटीसाठी सहकार्य देण्याचे ठरले. ६२ प्रकरणात जाब देणाऱ्या व्यक्तींना मुक्तांगणवर येण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी लागली. ४१ प्रकरणात तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षांची मदत घेण्यात आली. ४ प्रकरणे लिव इन रिलेशनशिप मधील अत्याचाराची आहेत. ३ प्रकरणांमध्ये स्त्रियांकडून होणाऱ्या लैंगिक व फसवणुकीच्या तक्रारी आहेत. ४ अंतरधर्मीय लग्नामधील अडथळे दूर करण्यात आले, यामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध मुला-मुलींचा सहभाग आहे.
जमीन, घराच्या संदर्भात म्हणजेच स्थावर मिळकतीच्या ४० प्रकरणाचे वाद केंद्रात दाखल झालेत. पैकी २० प्रकरणे केंद्रात समझोत्याने सोडविण्यात आली. ६ प्रकरणे कोर्टात दाखल झाली. ३ प्रकरणात ज्येष्ठ नागरिकांना (आई-वडील) हक्क मिळवून दिला, असे सांगत बहीण, विधवा, सून, वयस्कर आई यांना जमीन आणि घरांच्या हक्कांपासून वंचित ठेवण्याचे, त्यांचे हक्क डावलण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर असून महिला जमीन व घराच्या हक्कासाठी जागरूक होत आहेत, ही महत्त्वाची बाब असल्याचे ॲड.देशपांडे यांनी यावेळी सांगितले.
ॲड.देशपांडे पुढे म्हणाल्या, 'मुक्तांगण' केंद्र गेली ३३ वर्षे सातत्याने स्त्रिया, गरीब व गरजू लोकांना न्याय देण्याचे काम करत आहे. मानवी हक्कासाठी हे केंद्र आधारस्तंभ आहे. 'मुक्तांगण' प्रेरणा केंद्र महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाशी संलग्न असून महिला व बालविकास विभाग अंतर्गत कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्यांतर्गत मोफत कायद्याची माहिती, सल्ला व सहाय्य करणारी संस्था आहे. यामध्ये ॲड.वनराज पवार, ॲड.मनीषा कुपर, ॲड.चैत्रा व्ही.एस., ॲड.शैला जाधव, कैलास जाधव, रूपाली मुळे, स्वाती बल्लाळ, रूपाली मोहिते, उमा कांबळे, दिलीप भाटिया सामाजिक बांधिलकीने कार्यरत आहेत.
Sponsored
संबंधित बातम्या
लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे
एकता दर्शन (फलटण) : पत्रकारिता क्षेत्रात येणार्या नव्या पिढीतील पत्रकारांचा अभ्यास प्रगल्भ असणे आवश्यक आहे. आपल्या परिसराची ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक पार्श्वभूमी यांची सखोल...
डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान
एकता दर्शन (फलटण) : शिक्षण क्षेत्रातील प्रतिथयश व्यक्तिमत्त्व डॉ.वैशाली विजय शिंदे यांची भारत गौरव रत्न श्री सन्मान कौन्सिल (भारत सरकारमान्य संस्था) यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या...
पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन
एकता दर्शन (फलटण) : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस...
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम
एकता दर्शन (फलटण) : श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग असलेल्या (आळंदी-पुणे-पंढरपूर-मोहोळ राष्ट्रीय महामार्ग) सातारा-सोलापूर जिल्हा सरहद्दीवरील साधूबुवा ओढ्यानजिक पुणे...
डॉ.प्रसाद जोशी व प्रसन्न जोशी 'परशुराम' पुरस्काराने सन्मानित
एकता दर्शन, फलटण : अखिल ब्राह्मण मध्यवर्ती (नाशिक) संस्थेच्यावतीने देण्यात येणारा व वेदमूर्ती कै.काशिनाथपंत वादे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'परशुराम पुरस्कार' फलटण येथील...
