खा.रणजितसिंह यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री फडणवीस यांची फलटणमध्ये जाहीर सभा
प्रतिनिधी फलटण : माढा लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार व विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ दि. ५ मे रोजी फलटण येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात लोकसभा निवडणूक प्रचारातील शेवटची सभा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती फलटण-कोरेगाव विधानसभा प्रमुख सचिन कांबळे-पाटील यांनी दिली आहे.
लोकसभा निवडणूक २०२४ मधील महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचार व प्रसिद्धी कार्यक्रमाचा आढावा, प्रचाराची सांगता सभा नियोजन या संदर्भात सुरवडी (ता.फलटण) येथील निसर्ग हॉटेलमध्ये प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी सचिन कांबळे-पाटील, जयकुमार शिंदे बोलत होते. याप्रसंगी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड, महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश लोकसभा निवडणूक प्रमुख श्री.कर्जतकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील, श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, धनंजय साळुंखे-पाटील, अमरसिंह नाईक-निंबाळकर, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, जयकुमार शिंदे, अशोकराव जाधव, विक्रम आप्पा भोसले, पैलवान बजरंग गावडे उपस्थित होते.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार प्रसाद लाड म्हणाले, आपल्या मतदारसंघातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याबरोबरच विकासाची अनेक कामे मार्गी लावली असल्याने सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय झालेल्या खासदार रणजितसिंह यांच्या शब्दाला केंद्र व राज्य सरकारमध्ये मोठ्याप्रमाणात किंमत असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हृदयामध्ये त्यांच्यासाठी खास जागा निर्माण झाली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आशीर्वाद खासदार रणजितसिंह यांच्या पाठीशी असल्याने व मतदारसंघातील बहुसंख्य मतदार त्यांच्यावर मनापासून प्रेम करीत असल्याने त्यांच्या विजयाची आम्हाला निश्चित खात्री आहे. कार्यकर्त्यांनी आता सर्वाधिक मताधिक्य मिळवण्यासाठी प्रत्येक बुथवर मनापासून काम करून कमळ चिन्हाला जास्तीत जास्त मतदान कसे होईल यासाठी प्रयत्न करावेत.
दि. ५ मे रोजी होणाऱ्या फलटण येथील प्रचाराच्या सांगता सभेसाठी संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मतदार बंधू-भगिनी, तरुण वर्ग यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महायुतीच्यावतीने यावेळी करण्यात आले आहे. यावेळी महायुतीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Sponsored
संबंधित बातम्या
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
एकता दर्शन (बारामती) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीजवळ विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग...
समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन
एकता दर्शन (फलटण) : फलटण शहराच्या विकासासाठी जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला जाईल, असे सांगत फलटण शहराच्या...
षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही
एकता दर्शन (फलटण) : गेल्या ३४ वर्षांच्या सत्ताकाळात फलटणच्या विकासाऐवजी शहराच्या मातीचे नुकसान झाले असल्याने षडयंत्रकारी प्रवृत्तीला तालुक्यातील सत्तेतून दूर ठेवण्याची गरज होती, अशी...
ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी आज, गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील गजानन चौकात...
ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणूकीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेचा घोडा रोखत ऐतिहासिक विजय मिळवून भाजप-राष्ट्रवादी युतीने पालिकेवर सत्ता...
