विविध मागण्यांसाठी फलटणमध्ये उपोषण
एकता दर्शन, फलटण : मराठा समाजाला १३ टक्के आरक्षण मिळावे, धनगर समाजाला एसटी प्रवर्गातील आरक्षण द्यावे, बार्टीमार्फत दोन हजार मागासवर्गीय विद्यार्थ्यांची परदेशी शिक्षणासाठी निवड व त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करावा, मुस्लिम समाजासाठीचे ५ टक्के मंजूर आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या आणि अशा विविध मागण्यांसाठी येथील प्रांत कार्यालयासमोर सेवानिवृत्त महसूल कर्मचारी संजय अहिवळे यांनी लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे.
शेतकऱ्यांना मोफत वीज द्यावी, थकित वीज बिल माफ करावे, राज्यातील महसूल विभागातील सर्व मंडल अधिकाऱ्यांचे वेतन वेळेवर व्हावे यासाठी लागणारी ग्रँड मंजूर करावी, पोलीस अधिकारी कर्मचारी यांची पगारवाढ करून त्यांच्यासाठी नवीन पक्की घरे बांधावीत, सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, मागासवर्गीय आयोग नेमावा आदी मागण्यांचा समावेश अहिवळे यांनी एका निवेदनात केला आहे.
या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अल्पसंख्याक राज्यमंत्री, समाजकल्याण मंत्री, सातारा जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, प्रांत अधिकारी फलटण आदींना पाठविण्यात आल्या असून अहिवळे यांनी स्वतः या निवेदनावर स्वाक्षरी केली आहे.
राज्य सरकारने या विविध मागण्यांचा विचार सहानभूतीपूर्वक करावा अन्यथा मंत्रालयासमोर अमरण उपोषणास बसणार असल्याचा निर्धार अहिवळे यावेळी व्यक्त केला आहे.
Sponsored
संबंधित बातम्या
लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे
एकता दर्शन (फलटण) : पत्रकारिता क्षेत्रात येणार्या नव्या पिढीतील पत्रकारांचा अभ्यास प्रगल्भ असणे आवश्यक आहे. आपल्या परिसराची ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक पार्श्वभूमी यांची सखोल...
डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान
एकता दर्शन (फलटण) : शिक्षण क्षेत्रातील प्रतिथयश व्यक्तिमत्त्व डॉ.वैशाली विजय शिंदे यांची भारत गौरव रत्न श्री सन्मान कौन्सिल (भारत सरकारमान्य संस्था) यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या...
पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन
एकता दर्शन (फलटण) : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस...
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम
एकता दर्शन (फलटण) : श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग असलेल्या (आळंदी-पुणे-पंढरपूर-मोहोळ राष्ट्रीय महामार्ग) सातारा-सोलापूर जिल्हा सरहद्दीवरील साधूबुवा ओढ्यानजिक पुणे...
डॉ.प्रसाद जोशी व प्रसन्न जोशी 'परशुराम' पुरस्काराने सन्मानित
एकता दर्शन, फलटण : अखिल ब्राह्मण मध्यवर्ती (नाशिक) संस्थेच्यावतीने देण्यात येणारा व वेदमूर्ती कै.काशिनाथपंत वादे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'परशुराम पुरस्कार' फलटण येथील...
