स्नेहसंमेलने उत्साह व चैतन्याचे प्रतिक : विश्वजीत घोडके
शैक्षणिक ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांची सांस्कृतिक जडणघडण होणे आवश्यक असल्याचे मत सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी व्यक्त केले. ते गौरीशंकरच्या सातारा कॉलेज ऑफ फार्मसी देगाव महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
देगाव (सातारा) : शैक्षणिक ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांची सांस्कृतिक जडणघडण होणे आवश्यक असल्याचे मत सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी व्यक्त केले. ते गौरीशंकरच्या सातारा कॉलेज ऑफ फार्मसी देगाव महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष मिलिंद जगताप, संचालक डॉ. अनिरूध्द जगताप, जयवंतराव साळुंखे, जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर, सातारा कॉलेज ऑफ फार्मसी देगावचे प्राचार्य नागेश अलूरकर, प्राचार्य डॉ. अजित कुलकर्णी, प्राचार्य विजय राजे, प्रा. नयना पिपोडकर प्रा. डॉ. जयप्रकाश सूर्यवंशी, हेमंत काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके पुढे म्हणाले, स्नेहसंमेलनातून येणारे अनुभव जीवनाला नवी दिशा देण्यासाठी उपयुक्त ठरतात. संचालक जयवंतराव साळुंखे म्हणाले, विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना संधी देणे व त्यांच्यामधील ऊर्जेला चालना देणे यासाठी हे स्नेहसंमेलन उपयुक्त ठरते. प्रारंभी कोरोना महामारीच्या कालावधीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाअविष्काराने उपस्थितांची मने जिंकली. स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख प्रा. मंजिरी जाधव, प्रा.सारंग महामुनी, प्रा. प्रियांका खाडे, महाविद्यालयाचे जनरल सेक्रेटरी लक्षदीप काळे, कुमार राजगे, ओमकार काळंगे, गिरनार जगताप या सर्वांचा सहभाग महत्वाचा होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. नागेश अलूरकर यांनी केले. सूत्रसंचालन सोनाली शिंदे, ऋत्विक धायगुडे यांनी केले. व आभार प्रा. मंजिरी जाधव यांनी मानले.
Sponsored
संबंधित बातम्या
फलटणच्या जयदीपची मुंबई आयआयटीत इंट्री
गिरीधर सायन्स अकॅडमीतील जयदीप अभिनव कदम या विद्यार्थ्याची मॅकेनिकल इंजिनिअरींगसाठी मुंबई येथील आयआयटीमध्ये प्रवेश मिळाला असल्याची माहिती अकॅडमीचे संचालक शिवराज भोईटे यांनी एका...
महत्मा फुले ज्ञानविकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा.रमेश आढाव
फलटण: सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महात्मा फुले ज्ञान विकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश तुकाराम आढाव यांची संस्थेच्या विशेष सर्वसाधारण सभेत...
दहावी परीक्षेत कै.संजय गांधी विद्यालयाचा ९२ टक्के निकाल
फलटण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत गुणवरे (ता.फलटण) येथील श्री.भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित...
दहावी परीक्षेत प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचा शंभर टक्के निकाल
फलटण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड...
फलटण तालुक्यातील दहावीचा निकाल ९४.९६ टक्के
फलटण: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून फलटण तालुक्यातील इयत्ता दहावीचा निकाल ९४.९६% लागला...
