विडणी सोसायटीवर राष्ट्रवादी प्रणित उत्तरेश्वर पॅनेलचे वर्चस्व
एकता दर्शन (विडणी, ता. फलटण) : अवघ्या तालुक्याचे लक्ष लागलेल्या विडणी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रणित उत्तरेश्वर पॅनेलने संचालकपदाच्या १३ जागांवर विजय मिळविला. भाजपच्या विरोधी गटाला एकही जागा जिंकता आली नसल्याने १३-० असा विजय प्राप्त करीत या सोसायटीवर उत्तरेश्वर पॅनेलने वर्चस्व सिध्द केले आहे.
विडणी सोसायटी कोट्यावधींची आर्थिक उलाढाल करणारी असल्याने या सोसायटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजप पुरस्कृत दोन पॅनेलमध्ये दुरंगी लढत झाली. निवडणूक प्रचारादरम्यान खासदार गटातील अनेक दिग्गजांनी निवडणुकीचे मैदान गाजवले असले तरी भाजपच्या गळाला एकही जागा लागली नाही.
सोसायटीच्या १९०७ सभासदांपैकी १६३३ सभासदांनी मतदान केले होते. यात ७८ मतदान बाद झाले. १५५५ मतदान वैद्य झाले. मतमोजणी सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित उत्तरेश्वर पॅनेलची विजयाच्या दिशेने घौडदौड सुरू झाली होती अखेर या पॅनेलने सर्वच्या सर्व १३ जागा जिंकत भाजप प्रणित विकास आघाडीतील सर्व उमेदवारांचा धुव्वा केला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी शेखर साळुंखे यांनी विजयी उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा केली.

संचालकपदाच्या विजयी उमेदवारांमध्ये रामदास नाळे, साहेबराव ननावरे, बाळू पवार, मारूती उर्फ श्रीनिवास पवार, किसन शेंडे, विलास अभंग, सोनबा आदलिंगे, जयश्री टिळकर, विजया पवार, मुरलीधर जगताप, लक्ष्मण कोकरे, मारूती नाळे यांचा समावेश आहे.
विजयी उमेदवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर, डॉ. बाळासाहेब शेंडे आदींनी अभिनंदन केले.
Sponsored
संबंधित बातम्या
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
एकता दर्शन (बारामती) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीजवळ विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग...
समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन
एकता दर्शन (फलटण) : फलटण शहराच्या विकासासाठी जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला जाईल, असे सांगत फलटण शहराच्या...
षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही
एकता दर्शन (फलटण) : गेल्या ३४ वर्षांच्या सत्ताकाळात फलटणच्या विकासाऐवजी शहराच्या मातीचे नुकसान झाले असल्याने षडयंत्रकारी प्रवृत्तीला तालुक्यातील सत्तेतून दूर ठेवण्याची गरज होती, अशी...
ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी आज, गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील गजानन चौकात...
ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणूकीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेचा घोडा रोखत ऐतिहासिक विजय मिळवून भाजप-राष्ट्रवादी युतीने पालिकेवर सत्ता...
