फलटण-बारामती, फलटण-पंढरपूर रल्वेमार्गातील अडथळे दूर
तब्बल २३ वर्षे रखडलेला फलटण-बारामती रेल्वेमार्ग आगामी काही दिवसात पूर्ण झालेला पाहायला मिळणार असून लवकरच फलटण-पंढरपूर रेल्वेमार्ग सुद्धा माढा लोकसभा मतदार संघातील जनतेला पाहायला मिळणार असल्याचे सांगत दक्षिणेमधून जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमधून या भागातील प्रवाशांना फलटण-दिल्ली असा रेल्वे प्रवास करता येणे शक्य होणार असल्याची माहिती माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पत्रकारांशी संवाद करताना दिली.
फलटण-बारामती रेल्वेमार्गाचे काम सुरू करण्याच्या स्थितीत असल्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक पाहणी करण्यासाठी फलटण येथील रेल्वे स्टेशनवर आले होते. या दरम्यान फलटण रेल्वे स्टेशनच्या परिसरात आयोजित पत्रकार परिषदेत खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर बोलत होते. यावेळी मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर रामकरण यादव यांच्यासह रेल्वेमार्ग पाहणी दौऱ्यातील रेल्वे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
फलटण-बारामती रेल्वेमार्गाच्या पहाणीनंतर या मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू होणार असून डिसेंबर २०२६ मध्ये काम पूर्ण होऊन प्रत्यक्ष या मार्गावर रेल्वे धावताना दिसेल. हा प्रकल्प तब्बल २३ वर्षे रखडला होता. पूर्वी या प्रकल्पाला तांत्रिक मंजुरी मिळाली नव्हती. अंतिम मंजुरीनंतर या मार्गाचे काम सुरू होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. फलटण-पंढरपूर रेल्वेमार्गाचा सर्व्हे पूर्ण झाला असून रेल्वे विभागाने या मार्गासाठी जमीन संपादित केली आहे. आर्थिक तरतूदही करण्यात आली आहे. केंद्र व राज्यसरकारचीही परवानगी मिळाली असून हा प्रकल्प एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमेचा असल्याने कबीनेटच्या मंजुरीनंतर फलटण-पंढरपूर रेल्वेर्गाचेही काम मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल अशी अपेक्षा खासदार रणजितसिंह यांनी यावेळी व्यक्त केली.
देशातील सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा बुलेट ट्रेनचा मुंबई-हैद्राबाद प्रकल्प फलटणच्या शिंदेवाडी कॉर्नरवरून जाणार असून बुलेट ट्रेनची सुविधा माढा लोकसभा मतदार संघात खेचून आणण्यात आपण यशस्वी झालो आहोत. बुलेट ट्रेनमुळे माझ्या मतदार संघातील जनतेला केवळ ४० मिनिटात मुंबई गाठता येईल. या सर्व रेल्वेमार्गांमुळे अनेक उद्योग या भागात निर्माण होण्यास मदत होईल. मोठ्या प्रमाणात दळण-वळण वाढेल. रोजगार उपलब्ध होऊन बेरोजगारी कमी होण्यास मदत होणार असल्याचे खासदार रणजितसिंह यांनी यावेळी स्पष्ट केले.

रेल्वे अधिकारी रामकरण यादव म्हणाले, फलटण-बारामती रेल्वेमार्गाची भूसंपादन प्रक्रिया, एजन्सी प्रक्रिया व अन्य तांत्रिक बाबींची प्रक्रिया पूर्ण झाल्याने या रेल्वेमार्गाचे काम सुरू करण्याची स्थिती निर्माण झाली आहे. प्रत्यक्ष या रेल्वेमार्गाच्या कामाचा शुभारंभ लवकरच प्रधानमंत्री यांचाहस्ते होणार आहे. उद्घाटनानंतर या मार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू होईल. फलटण-पंढरपूर रेल्वे प्रकल्प २ हजार कोटींचा असल्याने नीती आयोगाची मंजूरी आवश्यक आहे. या प्रकल्पाच्या दोन-तीन बैठक झाल्या आहेत. त्यामुळे हा प्रकल्प मंजूर होण्याच्या स्थितीत आहे. या पूर्वीच या रेल्वेमार्गासाठी जागा उपलब्ध करण्यात आली असून उपलब्ध जागेंवर रेल्वेचे फलक लावले आहेत. नीती आयोगाकडून क्लेरियन्स आला की या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे.
Sponsored
संबंधित बातम्या
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
एकता दर्शन (बारामती) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीजवळ विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग...
समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन
एकता दर्शन (फलटण) : फलटण शहराच्या विकासासाठी जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला जाईल, असे सांगत फलटण शहराच्या...
षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही
एकता दर्शन (फलटण) : गेल्या ३४ वर्षांच्या सत्ताकाळात फलटणच्या विकासाऐवजी शहराच्या मातीचे नुकसान झाले असल्याने षडयंत्रकारी प्रवृत्तीला तालुक्यातील सत्तेतून दूर ठेवण्याची गरज होती, अशी...
ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी आज, गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील गजानन चौकात...
ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणूकीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेचा घोडा रोखत ऐतिहासिक विजय मिळवून भाजप-राष्ट्रवादी युतीने पालिकेवर सत्ता...
