ध्येयवादी वृत्ती उत्कर्षाला पुरक ठरते : श्रीरंग काटेकर
एकता दर्शन (लिंब, सातारा) : जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येयवादी वृत्ती उत्कर्षाला पूरक ठरते असे मत गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केले ते लिंब जि. सातारा येथील गौरीशंकर डी.फार्मसी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
याप्रसंगी प्राचार्य विजय राजे, प्रा.सविता मोरे, प्रा.सारिका लोखंडे, प्रा.स्वाती पवार, प्रा.रणजित थावरे, प्रा.स्नेहल माने, प्रा.उज्वला बाल्टे आदी उपस्थित होते.
श्रीरंग काटेकर पुढे म्हणाले, औषध निर्माण शास्त्र हे काळानुसार प्रगत व प्रगल्भ होत आहे. यामधील नाविन्यपूर्णतेचा ध्यास घेऊन विद्यार्थ्यांनी आपली भावी वाटचाल करावी.
प्राचार्य विजय राजे म्हणाले, आमचे महाविद्यालय नेहमी दर्जात्मक व गुणात्मकतेची कास धरून वाटचाल करीत आहे. या महाविद्यालयाचे सर्व प्रवेश दरवर्षी पूर्ण क्षमतेने भरले जातात याचा आम्हाला अभिमान वाटतो. यावेळी आरती पवार, प्रणिता भोईटे या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले.
Sponsored
संबंधित बातम्या
फलटणच्या जयदीपची मुंबई आयआयटीत इंट्री
गिरीधर सायन्स अकॅडमीतील जयदीप अभिनव कदम या विद्यार्थ्याची मॅकेनिकल इंजिनिअरींगसाठी मुंबई येथील आयआयटीमध्ये प्रवेश मिळाला असल्याची माहिती अकॅडमीचे संचालक शिवराज भोईटे यांनी एका...
महत्मा फुले ज्ञानविकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा.रमेश आढाव
फलटण: सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महात्मा फुले ज्ञान विकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश तुकाराम आढाव यांची संस्थेच्या विशेष सर्वसाधारण सभेत...
दहावी परीक्षेत कै.संजय गांधी विद्यालयाचा ९२ टक्के निकाल
फलटण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत गुणवरे (ता.फलटण) येथील श्री.भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित...
दहावी परीक्षेत प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचा शंभर टक्के निकाल
फलटण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड...
फलटण तालुक्यातील दहावीचा निकाल ९४.९६ टक्के
फलटण: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून फलटण तालुक्यातील इयत्ता दहावीचा निकाल ९४.९६% लागला...
