प्रोग्रेसिव्ह स्कूलमधील दहावीचा निकाल शंभर टक्के
एकता दर्शन, फलटण : येथील सरस्वती शिक्षण संस्थेच्या प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या इंग्रजी माध्यम शाळेतील इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. दहावीचा शंभर टक्के निकाल सलग चार वर्षे लागत असल्याने यावर्षीही शंभर टक्के निकालाची परंपरा या स्कूलने राखली आहे.
वरद जयवंत कर्वे ९६%, दिग्विजय अनिल कुमार घोरपडे ९५%, आदित्य अजित नांदले ९४.८०% या विद्यार्थ्यांनी दहावी बोर्ड परीक्षेत अनुक्रमे प्रथम, द्वितीय, व तृतीय क्रमांक मिळवला आहे.
वेदा विठ्ठल सोनवलकर ९४.४०%, प्रणव यशवंत ठाणे ९३%, क्षितिजा प्रसाद पारवे ९१.८०%, श्रेया प्रमोद पोतदार ९१% या विद्यार्थ्यांनी दहावी बोर्ड परीक्षेत विशेष गुण संपादित केले आहेत.
प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज इंग्रजी माध्यमाची शाळा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबत विद्यार्थ्यांच्या मानसिक, शारीरिक, व सामाजिक विकासाच्यादृष्टीने नाविन्यपूर्ण उपक्रमांवर भर देत असून क्रीडा क्षेत्रातही या शाळेतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादित केले आहे.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप माने, सचिव विशाल पवार, व्यवस्थापकीय संचालिका सौ.संध्या गायकवाड, कोषाध्यक्ष सविता माने, संचालिका प्रियंका पवार, प्राचार्य अमित सस्ते, पर्यवेक्षिका माधुरी माने, समन्वयक सुवर्ण कदम, योगिता सस्ते यांच्यासह शिक्षक, शिक्षिकेतर कर्मचारी, पालक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
Sponsored
संबंधित बातम्या
फलटणच्या जयदीपची मुंबई आयआयटीत इंट्री
गिरीधर सायन्स अकॅडमीतील जयदीप अभिनव कदम या विद्यार्थ्याची मॅकेनिकल इंजिनिअरींगसाठी मुंबई येथील आयआयटीमध्ये प्रवेश मिळाला असल्याची माहिती अकॅडमीचे संचालक शिवराज भोईटे यांनी एका...
महत्मा फुले ज्ञानविकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा.रमेश आढाव
फलटण: सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महात्मा फुले ज्ञान विकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश तुकाराम आढाव यांची संस्थेच्या विशेष सर्वसाधारण सभेत...
दहावी परीक्षेत कै.संजय गांधी विद्यालयाचा ९२ टक्के निकाल
फलटण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत गुणवरे (ता.फलटण) येथील श्री.भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित...
दहावी परीक्षेत प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचा शंभर टक्के निकाल
फलटण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड...
फलटण तालुक्यातील दहावीचा निकाल ९४.९६ टक्के
फलटण: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून फलटण तालुक्यातील इयत्ता दहावीचा निकाल ९४.९६% लागला...
